खनिजद्रव्य
व त्याचे उपयोग
शरीरातील प्रक्रियेचे
नियंत्रण व संरक्षण करण्याकरिता शरीराला खनिजाची गरज असते.
आपल्या शरीराची निगा
राखण्यामध्ये खालील खनिजे महत्वाचे आहेत.
खनिज
- फॉस्फरस
उपयोग - दातांच्या
आणि हाडांच्या विकासासाठी.
अभावी होणारे परिणाम – हायपो-फॉस्फटेमिया - यात रक्तातील फॉस्फरस चे प्रमाण कमी होते. त्यामुळे
ऊर्जानिर्मिती वर परिणाम होतो. तसेच हाडे ठिसुळ होतात, चयापचय
क्रियेत अडथळे निर्माण होतात अशक्तपणा, स्नायूंचे कुपोषण,
रक्तक्षय इ परिणाम.
अतिसेवनाने होणारे
परिणाम –
हायपर-फॉस्फटेमिया - यात रक्तातील फॉस्फरस चे प्रमाण वाढते.
त्यामुळे अतिअवटुता तसेच वृक्कनाश होऊ शकतो.
सरोत - शेंगा, काजू, बदाम, घेवडा, गाजर, अळंबी, मांस, मासे, ब्रेड, तांदूळ, अंडी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, तसेच हिरव्या पालेभाज्या.
खनिज
–
पोटॅशियम
उपयोग – चेतापेशीच्या पोषणाकरिता
अभावी होणारे परिणाम – हायपो-कॅलेमिया यामुळे रक्तातील पोटॅशियम चे प्रमाण कमी होते, स्नायूंना अशक्तपणा, पॅरालिसिस, चेतापेशीवर परिणाम होतो
अतिसेवनाने होणारे
परिणाम –
हायपर-कॅलेमिया - रक्तातील पोटॅशियम चे प्रमाण वाढते. त्यामुळे
स्नायूंना अशक्तपणा, नाडीचे ठोके वाढणे, हृदयविकार, अडीसन्सचा रोग इ. परिणाम आढळतात.
सत्रोत – सुकी फळे, कडधान्ये, बटाटे,
केळी, पपई, तीळ, घेवडा, तृणधान्ये, सोयाबीन,
पालक, रताळ, हळद इ.
खनिज
–
कॅल्शियम
उपयोग – हाडे, दात, रक्त, मज्जातंतू व हृदय यांच्या पोषणाकरिता
अभावी होणारे परिणाम – हाडे कामकूवत व नरम होतात. कॅल्शियमच्या अभावी ऑस्टीओमॅलेशिया हा विकार
होतो.
सत्रोत – तीळ
व पालेभाज्या
खनिज – लोह
उपयोग – रक्त
संवर्धन व हिमोग्लोबिनच्या पोषणाकरिता, ऑक्सीजन व
हिमोग्लोबीन याचा संयोग घडवून आणते व प्रतिरोध संस्थेला मदत करते.
अभावी होणारे परिणाम – लोहाच्या कमतरतेचा परिणाम हिमोग्लोबिनवर होतो. लोहाच्या अभावी रक्तक्षय व
पंडूरोग होतो.
सत्रोत – मांस,
मासे, अंडी, सी फूड,
यकृत, सोयाबीन, सुका
मेवा, गूळ-शेंगदाणे, घेवडा, पालक, खजूर, मनुके, तीळ, हळद, हिरव्या पालेभाज्या
व मेथीची भाजी
खनिज – तांबे
उपयोग – हिमोग्लोबिनचे
संवर्धन करणे
1"
अभावी होणारे परिणाम – तांब्याच्या आभावी हिमोग्लोबिनची निर्मिती होत नाही.
सत्रोत – पालेभाज्या
खनिज – सल्फर
उपयोग – प्रथिनांची
निर्मिती करणे अस्थी व नखे यांचे आरोग्य
अभावी होणारे परिणाम – केस, हाडे कमकूवत होतात
खनिज – फ्लोरिन
उपयोग – दातांचे
रक्षण करण्याकरिता,
अभावी होणारे परिणाम – याच्या अभावी दंतक्षय होतो.
खनिज – सोडीयम
उपयोग – रक्तामधील
आम्ल व अल्क यांचा समतोल साधला जातो.
अभावी होणारे परिणाम – रक्तदाबावर परिणाम होतो.
स्रोत - मीठ
खनिज – आयोडीन
उपयोग – थायराईड
ग्रथीच्या पोषणाकरिता
अभावी होणारे परिणाम – गलगंड नावाचा आजार होतो.
सरोत - आयोडिनयुक्त मीठ
खनिज - मॅग्नेशियम
उपयोग : ATP रेणूच्या निर्मितीमध्येतसेच हाडांच्या विकासासाठी
अभावी होणारे परिणाम – हायपो-मॅग्नेशिया - यामध्ये अशक्तपणा, स्नायूंना
पेटके, हृदयाच्या कार्यात अडथळा, चिडचिड,
अतिताण, धनुर्वात इ परिणाम
सरोत - सोयाबीन, कोकोआ, शेंगदाणे, पालक,
टोमॅटो, घेवडा, अद्रक,
लवंग, पालेभाज्या इ.