परमाणु ऊर्जा

MPSC TECH
0

परमाणु
ऊर्जा







परमाणु
ऊर्जा मुख्य बिंदू 
विशिष्ट
पदार्थांच्या प्रत्येक अणूमध्ये असलेल्या ऊर्जेला आण्विक किंवा परमाणु ऊर्जा
म्हणतात. ही ऊर्जा मिळवण्याचे दोन मार्ग आहेत
 – एक
म्हणजे फ्यूजन म्हणजे अणूंचे संयुजन आणि दुसरा म्हणजे फिशन उर्फ अणूंचे विभाजन.
फिशन पद्धतीचा अधिक वापर केला जातो.परमाणु ऊर्जा मिळवण्यासाठी लागणारा मुख्य कच्चा
माल म्हणजे युरेनियम हा धातू. जगात अनेक ठिकाणी युरेनियमच्या खाणी आहेत. मात्र
समृद्ध युरेनियम
 – ज्याला रेडिओऍक्टिव आयसोटोप
म्हणतात
 – मिळवण्यासाठी ह्यावर प्रक्रिया करून
छोट्या गोळ्या (पेलेट्स) बनवल्या जातात. ह्या गोळ्या लांबलचक दांड्यांमध्ये भरून
ते ऊर्जा-संयंत्राच्या अणुभट्टीत म्हणजे रिऍक्टरमध्ये हळूहळू ढकलले जातात.
नियंत्रित साखळी-प्रक्रियेद्वारे ह्या युरेनियमच्या अणूंचे विभाजन केले जाते. असाच
प्रक्रियेने प्लुटोनियम आणि थोरियम ह्या मूलद्रव्यांपासूनही परमाणु ऊर्जा मिळवता
येते.


साखळी
प्रक्रियेमध्ये अणूच्या विभाजनामुळे मुक्त झालेले कण युरेनियमच्या इतर अणूंना धडका
मारून त्यांचेही विभाजन करतात व ह्यामुळे बाहेर पडलेले कण पुन्हा इतर अणूंचे
विभाजन करतात. अशाप्रकारे ही साखळी प्रक्रिया चालूच राहते. मात्र ही साखळी
प्रक्रिया हाताबाहेर जाऊ नये ह्यासाठी अणुभट्टीमध्ये नियंत्रक दांडे बसवलेले
असतात. ह्यांना दमनक म्हणजे मॉडरेटर्स म्हणतात.






ह्या
साखळी प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणात ऊष्णता बाहेर पडते. अणुभट्टीच्या केंद्रस्थानी
असलेले जड पाणी तापवण्यासाठी तिचा उपयोग होतो. म्हणजे आपल्या अंतर्गत प्रक्रिया
पार पाडण्यासाठी अणुभट्टीला वेगळे इंधन जाळावे लागत नाही तर साखळी प्रक्रियेतील
ऊर्जेचाच वापर करून अणूंच्या ऊर्जेचे रूपांतर ऊष्णतेमध्ये केले जाते. अणुभट्टीच्या
केंद्रस्थानी असलेले जड पाणी ऊर्जा-संयंत्राच्या एका वेगळ्या विभागाकडे पाठवले
जाते. तिथे त्याचा वापर करून पाण्याने भरलेले पाइप तापवले जातात व वाफ निर्माण
केली जाते. ही वाफ एका टर्बाइनवर सोडून वीजनिर्मिती केली जाते.



Related image











परमाणु
ऊर्जेचे फायदे 






परमाणु
ऊर्जेच्या निर्मितीमधून बाहेर टाकल्या जाणा-या कार्बनडायऑक्साइड वायूचे प्रमाण
तुलनेने कमी असल्याने जागतिक तापमानवाढीस ती फारशी कारणीभूत ठरत नाही.
अशा
एका वीजनिर्मिती केंद्रातून पुष्कळच वीज मिळते.






परमाणु
ऊर्जेचे तोटे






किरणोत्सर्गी
राख कोठे टाकता येईल ही मोठी समस्या आहे. 
अपघात
झालाच तर होणारे नुकसान व दुष्परिणाम मोठे असते. 
युरेनियम
फार मोठ्या प्रमाणात सापडत नाही. पुढील ३० ते ६० वर्षे पुरेल इतकेच युरेनियम
आपल्याकडे आहे.










टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)