मिर्झा गालीब
(२७
डिसेंबर १७९७–१५ फेब्रुवारी १८६९).
● पूर्ण
नाव मिर्झा असदुल्ला खान व टोपणनाव ‘गालिब’.त्याचे वडील मिर्झा अब्दुल्ला बेग खान हे लष्करात अधिकारी होते. गालिब पाच
वर्षांचा असतानाच ते एका लढाईत मारले गेले. त्यानंतर त्याचा सांभाळ आग्र्यास
त्याच्या आजोबांनी केला. तेथे तो ऐष-आरामात वाढला.
● तो
मुळातच बुद्धिमान आणि प्रतिभासंपन्न होता. वयाच्या तेराव्या वर्षी त्याचा उमराव
बेगमशी विवाह झाला आणि सतराव्या वर्षी (१८१४) तो दिल्लीस स्थायिक झाला.
●१८२८ च्या
सुमारास तो वर्षासनाच्या खटल्यानिमित्त कलकत्त्यास गेला. तेथे तो सु. दोन वर्षे
होता तथापि ह्या खटल्याचा निकाल त्याच्या विरुद्ध गेला आणि तो दिल्लीस परतला.
● ह्या
खटल्यात त्याचे सर्वत्र प्रयत्न अपेशी ठरून त्याला फार मनस्ताप झाला व कर्जही बरेच
झाले तथापि त्याने वर्षासनासाठी आपले प्रयत्न मोठ्या चिकाटीने चालूच ठेवले.
● त्याचे
बहुतांश आयुष्य दिल्लीतच व्यतीत झाले. मिळणारे तुटपुंजे वर्षासन तसेच अयोध्येच्या
नबाबाकडून आणि दिल्ली दरबारातून त्याला जे काही थोडेफार वेतन मिळे, त्यावरच अतिशय तंगीत तो आपला निर्वाह करू लागला.
● उत्पन्नाच्या
मानाने त्याचा खर्च बराच होता व त्याला दारूचेही व्यसन होते. त्यामुळे तो अतिशय
कर्जबाजारी बनला. त्याला जुगाराचाही नाद होता व त्याबाबत त्याला तुरुंगातही जावे
लागले. या घटनेचा त्याच्या मनावर
खोलवर परिणाम
झाल्याचे त्याच्या काव्यातून आणि पत्रव्यवहारातून दिसते.
● त्याचे
फार्सीवर विशेष प्रेम होते. आपली उत्कृष्ट रचना उर्दूऐवजी फार्सीतच आहे, असे त्याने म्हटले आहे तथापि त्याची विशेष ख्याती मात्र उर्दू काव्यामुळेच
झाली.
● १८५०
पासून पुढे बहादूरशाह जफर (१८३७–५७) ह्या मोगल बादशहाच्या
सांगण्यावरून तो परत उर्दूत रचना करू लागला. ह्या काळातील त्याची उर्दू रचना
दर्जेदार व परिपक्क आहे.
● १८५७
च्या उठावाच्या वेळी तो दिल्लीतच होता.
"दस्तंबू"
ह्या रोजनिशीवजी फार्सी गद्यग्रंथात त्याने १८५७ उठावाची हकीगत लिहून ठेवली आहे.
लेखन संपदा
:-
१) मिहर-इ-नीमरोज
(१८५४, तैमूर वंशाचा हुमायूनपर्यंतचा इतिहास, पहिला खंड)
२)
कुल्लियात-इ-नस्र (१८६८, गद्यलेखांचा संग्रह)
३) दस्तंबू (१८५७
च्या उठावाची हकीगत)
४) पंज-गंज-इ-आहंग
(फार्सी व्याकरण व शैलीवरील प्रबंध)
५) कातिअ-इ-बुर्हान
(१८६१, बुर्हान-इ-कातिअ या फार्सी शब्दकोशावरील टीका)
६)त्याच्या उर्दू
गद्यग्रंथांत ऊद-इ-हिंदी (१८६८) आणि उर्दू-इ-मुंअल्ला (१८६९) ह्या दोन
पत्रसंग्रहांचा अंतर्भाव होतो.
गालिबला दिल्ली
दरबारातून ‘नज्मुद्दौला दबीरुल्मुल्क निजामगंज’ हा मानाचा
किताब मिळाला होता.
style="display:block"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="4356803321"
data-ad-format="auto"
data-full-width-responsive="true">