17 जून रोजी भारताची
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिदेच्या (UNSC) च्या
तात्पुरत्या सदस्यपदी निवड करण्यात आली.
दरम्यान, या विजयानंतर भारत २०२१-२२ या वर्षासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या
सुरक्षा परिषदेचा तात्पुरता सदस्य बनला आहे.
भारत आठव्यांदा
सुरक्षा परिषदेचा तात्पुरता सदस्य बनला आहे.
१९३ सदस्यीय संयुक्त
राष्ट्र महासभेनं आपल्या ७५ व्या सत्रासाठी अध्यक्ष, सुरक्षा
परिषदेचे तात्पुरते सदस्य आणि आर्थिक तसंच सामाजिक परिषदेच्या सदस्यांसाठी निवडणूक
प्रक्रिया पार पाडली होती.
भारतासोबतच आयर्लंड, मॅक्सिको आणि नॉर्वे या देशांनाही सुरक्षा परिषदेत स्थान मिळालं आहे.
विजयानंतर संयुक्त
राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी टीएस तिरूमूर्ती यांनी प्रतिक्रिया दिली. भारत
नेतृत्व कायम ठेवणार असून उत्तम बहुपक्षीय प्रणालीला नवीन दिशा देणार असल्याचं ते
म्हणाले.
"भारताला
१९२ पैकी १८४ मतं मिळाली. भारताची २०२१-२२ या वर्षासाठी संयुक्त राष्ट्राच्या
तात्पुरत्या सदस्यपदी निवड झाल्यामुळे मी खुश आहे. आम्हाला सर्वांचं उत्तम समर्थन
मिळालं. तसंच संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्यांनी जो विश्वास दाखवला त्याप्रती आदर
व्यक्त करतो," असंही ते म्हणाले.
Teligram Link
https://t.me/mpsc_tech