मानवी भूगोल

MPSC TECH
0








                               Human Geography

मानवी
भूगोल : व्याख्या व व्याप्ती



सर्व मानवजात एकच
असली तरी जगातील नाना देशांत नाना प्रकारचे लोक राहतात. त्यांचा आहार
, विहार, निवारा, वस्त्रप्रावरण
या गोष्टी भिन्न असतात. या सर्व जीवनावश्यक गोष्टी मिळवण्यासाठी ते विविध प्रकारचे
व्यवसाय करतात. मुंबईतील मलबारहिलसारख्या भागातील लोक गगनचुंबी इमारतीत राहातात
,
हॉकी क्रिकेट, चित्रपट इत्यादींनी आपली करमणूक
करतात
, तर मुंबईपासून 120 कि.मी. अंतरावरील
डहाणू
, बोर्डीसारख्या खेड्यांतील आदिवासी शाकारलेल्या
झोपड्यांत राहातत व तारपे( एक वाद्य) वाजवून आपली करमणूक करतात. त्याचप्रमाणे एखाद्या
महाविद्यालयीन प्राध्यापकाचे जीवन हे भटकळ पशुपालकापेक्षा वेगळे असते. हा फार
जैविक आहे. लोकांना तो जन्मतः प्राप्त होतो. थोडक्यात
, पर्यावरणाच्या
भिन्नतेमुळे अशाच प्रकारची विसंगती अनेक ठिकाणी आढळून येते. उदा
, कोकणात आर्थिकदृष्ट्या किफायतशीर रीतीने सफरचंदाच्या वाड्या करता येणार
नाहीत.पुण्या-मुंबईच्या लोकांचा रेल्वे किंवा बसस्थानकानजीक अगर मध्यवर्ती
बाजारपेठे- नजीक राहण्याची जागा पसंत करण्याकडे कल राहील तर राशीनसारख्या(नगर जिल्हा)
गावी अक्षय पाणीपुरवठा असणाऱ्या ठिकाणीच कायमची वस्ती केली जाईल.अशी विविधता आणि
तिची कारणमीमांसा यांचा अभ्यास मानवी भूगोलात करतात.






व्याख्या



मानवी भूगोलाची
व्याख्या तयार करताना त्यातील विविध दृष्टिकोण लक्षात घेतले पाहिजेत. या विषयाच्या
अभ्यासकांनी जसे हे विविध दृष्टिकोण विकसित केले तसा या विषयाचा आशय व व्याख्या
बदलत गेली. या विविध व्याख्या समजून घेताना एक मध्यवर्ती कल्पना निश्चितपणे सांगता
येईल.
`मानव व निसर्गसंबंधांचा मानवी विकसनाच्या दृष्टिकोणातून केलेला अभ्यास
म्हणजे मानवी भूविज्ञान.
' ही ती कल्पना होय. निरनिराळ्या
शास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या पुढे दिलेल्या आहेत



रॅटझेल
:
"मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या पर्यावरणाच्या
घटकांचा



अभ्यास म्हणजे मानवी
भूगोल होय." रॅटझेल हे जर्मन भूवैज्ञानिक मानवी भूगोलाच्या अभ्यासात मानव हा
केंद्रबिंदू मानून पर्यावरणाच्या परिणामांची गुंतागुंत समजून घेण्याची आवश्यकताही
त्यांनी प्रतिपादन केली
, कु. सेंपल : "अविश्रांत
मानव व अस्थायी पृथ्वीवरील बदलत्या पर्यावरण यांच्या परस्परसंबंधाचा अभ्यास म्हणजे
मानवी भूगोल." कु. सेंपल या रॅटझेल यांच्या शिष्या. पृथ्वी आणि मानव या
दोघांचा परामर्श मानवी भूगोलात घेणे कसे आवश्यक आहे हे त्यांनी पटवून दिले. हंटिंग्टन
यांच्या मते "भौगोलिक पर्यावरण व मानवी व्यवसायगुण यांचे स्वरूप व
परस्परसंबंध यांचा अभ्यास म्हणजे मानवी भूगोल." हंटिंग्टन यांच्या मते मानवी
भूगोलाच्या अभ्यासात नैसर्गिक परिस्थितीच्या घटकांना खूपच महत्त्व आहे. भू-रूप
,
समुद्रापासूनचे अंतर, जमिनी, हवामान इत्यादी



नैसर्गिक परिस्थितीचे
घटक मानवाच्या आर्थिक जीवनावर व मानवी संस्कृतीच्या दर्जावर आपले नियंत्रण ठेवतात.
विविध भागांत नैसर्गिक परिस्थिती भिन्न असल्याने तेथे राहाणाऱ्या मानव समाजांना
सारख्याच प्रकारचे यश आर्थिक विकासात येत नाही. डेव्हिस यांच्या मते
, मानवी भूगोल म्हणजे नैसर्गिक पर्यावरण व मानवाची भौतिक प्रगती यांमधील
कार्यकारणभावाचे संशोधन होय. प्राध्यापक इभ्रे जोन्स यांनी पुढीलप्रमाणे मानवी
भूगोलाची व्याख्या केलेली आहे. :



"मानवी
जीवनाच्या बहुविध अंगांपैकी जी अंगे सतत बदलणाऱ्या मानव व निसर्ग यांच्यातील
परस्परसंबंधामुळे एखाद्या प्रदेशात एक विशिष्ट प्रकारचे चित्र निर्माण करतात
, त्यांचा अभ्यास म्हणजे मानवी भूगोल होय. "



कॉक्स यांच्या मते,
"भूपृष्ठावरील मानवनिर्मित स्थिर व अस्थिर घटनांच्या स्थानिक
आकृतिबंधनाचे वर्णन व विश्लेषण म्हणजे मानवी भूगोल."



या सर्व व्याख्यांचा
अभ्यास केल्यानंतर असे आढळून येईल की
,



1) मानव हा
नैसर्गिक पर्यावरणाचा आविष्कार आहे.






2) मानवी
भूगोलाच्या अभ्यासात मानव हा केंद्रबिंदू मानून मानवी हिताच्या दृष्टीने अभ्यास
करणे आवश्यक आहे.( हे विदाल द ला ब्लाश यांनी पटवून दिलेले होते.)



3) मानवी
कार्यासही महत्त्व असल्याने व सभोवताच्या परिस्थितीत मानवी कर्तृत्वाचे परिणाम
दिसून येत असल्याने त्याचाही अभ्यास मानवी भूगोलात करणे आवश्यक आहे. हे डेमान जिऑन
यांचे म्हणणे पटते.



4.) व्हाईट व
रेनर यांच्या मते
, मानवी भूगोल म्हणजे परिस्थितीविज्ञान. विविध
प्रकारच्या नैसर्गिक परिस्थितीशी एकरूप होत असलेल्या मानव-समूहांचा अभ्यास म्हणजे
मानवी भूगोल.



5) डिकन्स व
पिटस यांच्या मते मानव आणि त्याचे कार्य यांचा अभ्यास म्हणजे मानवी भूगोल.



6) लेबॉन
यांच्या मते मानवी भूगोल म्हणजे साकलीय भूगोल.



7) जगाच्या
पाठीवर वेगवेगळ्या काळी व स्थळी झालेली मानवी प्रगती



म्हणजे स्थानिक
नैसर्गिक परिस्थितीशी मिळतेजुळते घेण्याची प्रक्रिया होय
, असे जीन्स ब्रून्स म्हणतात. मानवी संस्कृतीचा विकास व ऱ्हास या मानवी घटना
किंवा क्रिया- प्रक्रिया क्रियाप्रक्रिया स्थलकालरूप असतात
, कारण
निश्चित अशा ठिकाणी त्या वेगवेगळ्या काळी घडलेल्या असतात
, त्यामुळे
स्थळाच्या प्राकृतिक व सांस्कृतिक वैशिष्ट्याचे मानवी विकासावर झालेले परिणाम
मानवी भूगोलात अभ्यासले जातात. अशा अभ्यासात पर्यावरणाच्या सर्व घटकांचा एकत्रित
परिणाम पाहाणे हा प्रमुख उद्देश असतो. त्यालाच स्थलीय एकता(
Terrestrial
unity) असे म्हणतात.



मानवी
भूगोलाच्या अभ्यासाची आवश्यकता






प्रचंड वेगाने
होणाऱ्या पृथ्वीच्या
`मानवीकरणा' मुळे पर्यावरणाच्या म्हणजे परिसराच्या संरक्षणाची गरज जगात वाढत आहे.
मानवाच्या विविध आकृतिबंध पर्यावरणाची कळत-नकळत हानी करीत असतात. मानवाच्या विविध क्रियाप्रकिया
सुरू असताना त्याच्या परिसराच्या संरक्षणाचे स्मरण त्याला करून देणे
, त्याबद्दल जागृती निर्माण करणे हे मानवी भूगोलतज्ज्ञांचे अंतराळयुगातील महत्त्वाचे
कर्तव्य आहे. अनेक प्राचीन संस्कृतींनी आपल्या परिसराचा नाश केला. चुकीच्या
पद्धतीने शेती केल्याने जमिनींचा कस व पाणीपुरवठा यांचे नुकसान झाले. अशा प्रकारचे
दुरूपयोग किंवा अतिरिक्त उपयोग टाळण्यासाठी मानवी भूगोलातील संशोधनाचे निष्कर्ष
सामान्य जनतेपर्यत नेणे हेदेखील आवश्यक आहे. त्याचप्रमाणे भूपृष्ठाचा दुरूपयोग
केल्यामुळे निर्माण झालेले परिसरविषयक दोष टाळणे
, सुधारणे व
निसर्ग- व्यवस्थेत सुधारणा घडवून आणणे यासाठीही मानव
, निसर्ग-सहजीवनाचा
अभ्यास व संशोधन यांची आवश्यकता आहे. तंत्रविज्ञानावर भर असणाऱ्या समाजात
निरूपयोगी घन पदार्थाचे साठे जमतात. त्यांचा दुरूपयोग करणयाचे तंत्र अजून अवगत
नाही. अनेक औद्योगिक देशांत घन अवशेषांचा प्रश्न गंभीर झाला आहे. विकसनशील
देशांतही मुंबई-कलकत्त्यासारख्या शहरांत त्याने उग्ररूप धारणे केलेले आहे. आपण
पूर्वीपेक्षा अधिक अवशेष तयार करतो
, त्यांपैकी बरेच नैसर्गिक
परिस्थितीरचनात न आढळणारे असे रासायनिक घडणीचे असतात. उत्क्रांतीच्या इतिहासात अशी
पूर्वीची उदाहरणे नव्हती. त्यामुळे त्यांच्याशी कसा मुकाबला करायचा हे निसर्गाला
ठाऊक नाही. त्यासाठी नवीन तंत्रपद्धती हव्यात व स्थलकालपरत्वे त्यांचा विविध
घटकांशी असलेला संबंध अभ्यासणे आवश्यक आहे. हे कार्य मानवी भूगोलात केले
जाते.निसर्ग-संरक्षण ही एक नवी चळवळ निर्माण झालेली आहे. ती एक काळाची गरज श्रीमंत
व गरीब अशा दोन्ही देशांत आहे. भारतासारख्या अर्धविकसित देशात दारिद्र्य व प्रदूषण
अशा दोन्बी बाजूंनी पर्यावरणाची किंवा स्थानिक परिसराची अवनती होते. तिचा अभ्यास
करून हानीचे प्रमाण कमी करण्यासाठीही मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाचा अभ्यास करणे
आवश्यक आहे. आपली संस्कृती कोणतीही असो
, आपण जीवन कसे जगतो,
आपल्या स्थानिक परिसराच्या बाबत आपली कर्तव्ये आपण पार पाडतो की
नाही हे समजणे आवश्यक आहे. आपल्या भोवतालच्या सृष्टीशी आपण असा चैतन्यपूर्ण व
अभिनव समतोल साधला पाहिजे. आपल्या सांस्कृतिक व सामाजिक वागणुकीची पर्यावरणाच्या
संदर्भात खोलवर तपासणी केली पाहिजे. अमेरिकन माणसाने मोटारगाडी व प्लॅस्टिक
यांवरचे आपले प्रेम कमी करणे आवश्यक आहे. तर भारतीयांनी गाईची अतिरिक्त पैदास व
तिचे वाजवीपेक्षा जास्त धार्मिक
, भावनिक लाड करणे व झाडांचा
जळण म्हणून बेसुमार उपयोग करणे या गोष्टी हळूहळू कमी करायला हरकत नाही. आपल्या
देशात ग्रामीण भागांची पुनर्रचना सुरू आहे. परंतु परिसराबद्दल जर आपण विधायक व
मिशनरी वृत्ती ठेवली तरच आपल्या ग्रामीण भागांचा उद्धार होईल. निसर्गसंरक्षणात
लोकांची संस्कृती व चालीरीती यांचाही अंतर्भाव हवा. कारण आपले हे आकर्षक करण्यात
त्यांचाही वाटा आहे. तांत्रिक प्रगतीमुळे व प्रचंड औद्योगीकरणामुळे प्राचीन
काळापासून मानवसमूहांनी जोपासलेली अनेक कौशल्ये व कला यांचा ऱ्हास होत आहे
,
कारण त्यांना बाजारात मागणी नाही. त्याच- प्रमाणे अनेक पारंपारिक
रीतींनाही आपण मुकत आहोत. कारण त्यांचे मोल आपण शास्त्रीय दृष्टीने कधीच तपासून
पाहिलेले नाही. म्हैसूरपरमधील उपलिग व कुर्शबा जमाती व जुन्या काळची पक्कीन जमात
जनावरांच्या खुरावरून त्यांचा जंगलात मागोवा काढण्यात पटाईत होती. आजच्या
निसर्गाभ्यासकांना त्यासाठी यंत्रांची मदत घ्यावी लागते. यंत्रविज्ञानातील
प्रगतीमुळे माणसाच्या इंद्रियांची संवेदनाशक्ती क्षीण झाली तर संपूर्ण मानवजातीची
त्यामुळे हानीच होणार आहे. अनेक पारंपारिक कौशल्यांचा त्यांच्या परिसराच्या
संदर्भात अभ्यास करणे हे मानवी भूगोलतज्ञांचे कर्तव्य आहे. या अभ्यासाचे उद्दिष्ट
आपल्या भूतकाळाची महती गाणे हे नाही. जुन्या चालीरीतींची शास्त्रीय चिकित्सा करून
त्यांचे तत्कालीन पर्यावरणसंबंधांचे परीक्षण करणे हे आहे. त्यातूनच बदलत्या
काळानुसार या संबंधांत कशा प्रकारे बदल करता येईल याचे ज्ञान होते. ग्रामीण
भागांचा विकास करताना शहरातील विकासाचे अंधानुकरण टाळणे आवश्यक आहे. विकासाची दिशा
ठरविताना ग्रामीण भागांतील उपलब्ध नैसर्गिक साधनांचा विचार करून त्यांचा विनियोग
कशा प्रकारे करता येईल हे अभ्यासणे जरूरीचे आहे
, यामुळेच
तेथील निसर्ग वा परिसर सुरक्षित राखणे सोपे जाईल. या अभ्यासाचे उद्दिष्ट आपल्या
भूतकाळाची महती गाण्याचे नसून
, जुन्या चालीरीतींची शास्त्रीय
चिकित्सा करून त्यांचे तत्कालीन पर्यावरणसंबंधांचे परीक्षण करणे हे आहे. त्यातूनच
बदलत्या काळानुसार या संबंधात कशा प्रकारे बदल करता येईल याचे ज्ञान होऊ शकेल. मानवी
क्रिया-प्रक्रिया चालू असताना निसर्ग-मानव संबंध बदलत जातात. जलचक्र
, नत्रचक्र इत्यादी निसर्ग-नियमांच्या विरूद्ध दिशेने मानवी क्रिया चालू असतात.
त्यामुळे त्या निसर्गचक्रांत अडथळे येतात
, यालाच प्रदूषण असे
म्हणतात. प्रदूषणामुळे एकेकाळी अनुकूल असलेला निसर्ग प्रतिकूल बनू शकतो. तेव्हा
असे प्रदूषण टाळून
, निसर्गसंवर्धन करून मावनी विकास कसा
साधता येईल याचा विचार करणे हे मानवी भूगोलाचे महत्त्वाचे अंग आहे.






विविध वाद:- मानवी
भूगोलाचा अभ्यास विकसित होत असताना त्यात अनेक दृष्टिकोण व वाद यांची भर पडत गेली.
या विषयाचा अर्थपूर्ण अभ्यास करण्यासाठी हे विविध वाद
, त्यांचे विविध शास्त्रज्ञांनी सांगितलेले दृष्टिकोण आणि त्यांतील संकल्पना
समजून घेणे आवश्यक आहे. मानवी भूगोलाच्या अभ्यासकांच्या दृष्टीने आधुनिक काळाच्या
सुरूवातीपासूनच मानव-निसर्ग संबंधांच्या संदर्भात दोन प्रश्न महत्त्वाचे ठरले.



1) मानवी
विकास सर्वस्वी नैसर्गिक पर्यावरणावर अवलंबून आहे का
?



2) मानवी
विकास घडविण्यामध्ये मानवी कार्याचे महत्त्व आहे का
?



या दोन्ही प्रश्नांची
होकारार्थी उत्तरे दोन वेगवेगळ्या गटांतील शास्त्रज्ञांनी दिलेली आहेत. त्यातून
निसर्गवाद व संभववाद या दोन प्रमुख विचारप्रणाली मानवी भूगोलामध्ये रूढ झाल्या.
त्यांचा सविस्तर विचार आपण आता करू.



निसर्गवाद
:
मानवी विकास सर्वस्वी निसर्गावरच अवलंबून असतो असे मानणारी
ही विचारसरणी होय यामध्ये मानवी विकासावर नैसर्गिक पर्यावरणाचा केवळ परिणामच होतो
असे न मानता मानवी विकसनामध्ये कार्यरत असलेल्या
`मानवा'ची इच्छा व स्फूर्तीसुद्धा निसर्गावर अवलंबून असते असे मानले जाते. अगदी
टोकाची भूमिका म्हणजे मानव हा निसर्गाचाच अविभाज्य भाग असून इतर
प्राणिमात्रांप्रमाणेच त्याच्या सर्व हालचाली नैसर्गिक घटकांनुसार होत असतात ही
होय. याच विचारांना निसर्गावाद असे म्हणतात. ही विचारसरणी
19
व्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात प्रचलित झाली. त्या काळात सभोवतालची  परिस्थिती म्हणजे केवळ नैसर्गिक पर्यावरण असेच
समीकरण मानले जात होते. म्हणूनच निसर्गवादास पर्यावरणवाद (
Environmentalism)
असेही संबोधले गेलेले आहे.






निसर्गवाद किंवा
पर्यावरणवाद खऱ्या अर्थाने
19 व्या शतकामध्ये
सांगण्यात आलेला असला तरी या प्रकारचा दृष्टीकोण अगदी प्राचीन काळातही मांडलेला दिसून
येतो. इ.स. पूर्व पाचव्या शतकामध्ये हिपोक्रॅटस या शास्त्रज्ञाने मानवी जीवन
नैसर्गिक घटकांवर कसे अवलंबून आहे हे सांगितले. त्याच्या
`On Airs, Wzters and Places' चा विवेचनामध्ये त्याने
आशियातील व युरोपमधील मानवी जीवनांची तुलना केली. पर्वतमय प्रदेशात उंच
, धिप्पाड व वीर पुरूष असतात तर सपाट प्रदेशात बुटके, आळशी,
अकार्यक्षम लोक असतात. आशिया व युरोप यांच्या मध्यस्थ स्थान असलेल्या
ग्रीक लोकांमध्ये दोन्ही प्रदेशांतील गुण आढळतात. या व अशा अनेक गोष्टी त्याने
आपल्या विवेचनात मांडून मानवी जीवनावर निसर्गाचा कितपत व कसा परिणाम होतो हे
सांगितले. याच प्रकारची उदाहरणे अँरिस्टॉट्लनेही सांगितली. त्याने नाईल नदीच्या
ईजिप्तवर होणाऱ्या परिणामांची शास्त्रीय चिकित्सा केली. स्टॅबोच्या
लिखाणामध्येसुद्धा निसर्गाचा मानवावर कसकसा परिणाम होतो हे दर्शविणारी तुलनात्मक
उदाहरणे आढळून येतात. उदा
, इटलींचा आकार, उंचसखलता, हवामान इ. घटकांचा रोमच्या उत्था-पनावर व
शक्तीवर कसा परिणाम होत गेला याचे विवेचन. अशा तऱ्हेने प्राचीन काळातील
शास्त्रज्ञांनी निसर्गवादामध्ये सामाविष्ट होऊ शकतील असे विचार त्या काळातील
निरीक्षणाद्वारे मांडले.






19 व्या
शतकामध्ये निसर्गावाद किंवा पर्यावरणवाद एक विशिष्ट वाद म्हणून प्रथम मांडला
,
तो रॅट्झेल (1844-1904) या शास्त्राने. अर्थात
त्याच्या अगोदर आधुनिक भूगोलाचे आधारस्तंभ मानले जाणारे रिटर व बुम्बोल्ट यांनी
पृथ्वीवरील अनेक घटकांचे
`कार्यकारणसंबंध' अभ्यासले होते. अशा कार्य- कारणसंबंधाची मीमांसा करताना रॅट्झेलला
नैसर्गिक घटकांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम अतिशय महत्त्वाचे वाटले. त्यातूनच
पर्यावरणवादाची विचार- प्रणाली उदयास आली. भूगोलाचा विविध अंगी अभ्यास करणाऱ्या या
जर्मन प्राध्यापकाने पर्यावरण मानवी जीवन कसे घडविते हे स्पष्ट केले. त्याने
भूगोलाच्या अनेकविध शाखांचा अभ्यास केलेला असला तरी त्यात एक महत्त्वाचे सूत्र
होते
, ते म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील घटकांचा मानवाशी
असलेले संबंध पाहाणे हे होय. उदा
, प्राकृतिक रचनेचा अभ्यास
त्याच्या अगोदर अनेक शास्त्रज्ञांनी केलेला होता. परंतु रॅट्झेलच्या कार्याचे
महत्त्व म्हणजे विविध प्राकृतिक रचना असलेल्या प्रदेशांत मानवी जीवनाची वैशिष्ट्ये
त्याने अभ्यासली व मानवी घटनांचे संबंध उंची
, उंचसखलता,
हवामान, वनस्पति-जीवन यांसारख्या प्राकृतिक
घटकांशी कसा आहे हे स्पष्ट केले. त्याच्या अँथ्रोपोजिओग्राफी ( भाग
1) या ग्रंथामध्ये त्याने पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मानवीसमूहांचे वितरण
नैसर्गिक शक्ती कशा प्रकारे नियंत्रित करतात हे सांगितले. अर्थात या ग्रंथामध्ये
रिटरने सांगितलेलीच संकल्पना आपण नव्या शास्त्रीय पद्धतीनुसार विकसित केलेली आहे
हे त्याने कबूल केले. रिटरपेक्षा रॅटझेल यांच्या विचारांमध्ये दोन मूलभूत फरक
होते. एक म्हणजे
, मानवी भूगोलाचा सूत्रबद्ध पद्धतीने अभ्यास
करणे रॅट्झेलला जास्त सयुक्तिक वाटत होते
, दुसरा डार्विनचा
उत्क्रांतीवादाच्या दृष्टिकोणावर आधारित होता. रिटरच्या मते
, मानव व निसर्ग एकमेकांवर अवलंबून आहेत, परंतु
रॅट्झेलने मानव हा उत्क्रांतीचा अंतिम आविष्कार आहे हा विचार मांडला डार्विनच्या सिद्धान्तानुसार
उत्क्रांती घडत असतानाच निसर्गनिवडीच्या पर्यावरणाशी मानव जुळवून घेत घेतच विकसित
होत असतो म्हणूनच मानव हा पर्यावरणाचा गुलाम आहे. पर्यावरणाच्या अनेकविध
शक्तींनुसार तो घडत असतो. या शक्तींबरोबर योग्य अशी सांगड घातली तरच मानवाचे
अस्तित्व अबाधित राहू शकेल. अशा तऱ्हेने मानवाची उत्क्रांती व त्यानुसार टिकून
राहिलेले मानवी अस्तित्व सर्वस्वी पर्यावरणावर अवलंबून आबे. रॅट्झेलच्या
विचारप्रणालीचा हा भाग होय.






19 व्या
शतकाच्या उत्तरार्धात जीवशास्त्राचा झालेला विकास व डार्विनच्या सिद्धांतांना
मिळालेली शास्त्रीय मान्यता यांचा भूगोलाच्या अभ्यासकांवर मोठा परिणाम झाला.
त्यामुळे पर्यावरणवादी दृष्टिकोणास विज्ञाननिष्ठता लाभली. याच काळात हेकेलने या
सिद्धांतांचा अभ्यास करून
Ecology हे नवीन शास्त्र
सांगितले.त्यामध्ये प्रामुख्याने एकाच जागी राहाणाऱ्या अनेक सजीवांमधील परस्पर
संबंध व पर्यावरणाशी असलेले नाते यांचा अभ्यास केला जातो. याच काळामध्ये
समाज-शास्त्राचाही विकास बऱ्याच अंशी झालेला होता. मानवी समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टींचा
सांख्यिक अभ्यास मांडण्यास सुरूवात झालेली होती. त्यातूनच पर्यावरण- वादास पोषक
असा एक सिध्दांत उदयास आला. तो म्हणजे "मानव त्याच्या प्रत्येक कृतीच्या
बाबतीत मुक्त नसून तो पूर्णपणे नैसर्गिक आणि आर्थिक नियमांचा गुलाम आहे." अशा
तऱ्हेने नवीन शास्त्रीय पद्धतींच्या साह्याने हेकेलप्रमाणे इतर शास्त्रज्ञांनी
विविध घटनांचा अभ्यास करून
, मानव कृतिशील (Active) नसून अकृतिशील (passive ) आहे हे सिद्ध केले. बकल या
शास्त्रज्ञाने इंग्लंडमधील सांस्कृतिक इतिहास (
History of Civilization
in England) या विषयावरील दोन ग्रंथांमध्ये पर्यावरणवादाचीच कास
धरलेली आढळते. त्याच्या मते
, मानवाच्या विविध क्रिया
त्याच्या इच्छा-शक्तीनुसार होतात. परंतु हीच इच्छाशक्ती मुळात विशिष्ट नियमांवर
अवलंबून असते. निसर्गातील विविध घडामोडींचा मानवी मनावर व मानवी मनाचा या घडामोंडीवर
परिणाम होत असतो. अशा तऱ्हेने प्रत्येक मानवी घटना ही निसर्गा-मुळे बदलेले जाणारे
मन व मानसिक क्रियांमुळे बदलला जाणारा निसर्ग यांच्या दृढसंबंधाचे द्योतक आहे.
मानवी प्रगती किंवा अधोगती
, सुख किंवा दुःख इ.या दुहेरी
क्रियांचेच फळ मानावे लागेल. म्हणूनच सभोवताली एका विशिष्ट प्रकारची परिस्थिती
जेथे जेथे आहे त्या प्रत्येक ठिकाणी मानवी विकसनामध्ये साम्य आढळते. हे साम्य
उपलब्ध माहितीच्या व शास्त्रीय पद्धतींच्या साह्याने शोधून काढणे ही
पर्यावरणवाद्यांची प्रमुख जबाबदारी होय. या प्रकारच्या सैद्धांतिक विवेचनानंतर
बकलने मानवाच्या वांशिक गुणधर्मावर हवामान
, अन्न, जमीन आणि निसर्गाचा सर्वसाधारण दृष्टिकोण या चार घटकांचा कसा परिणाम होतो हे
स्पष्ट केले. पहिले तीन घटक परस्परांवर परिणाम करून प्रामुख्याने संपत्तीचा संचय व
वितरण यांच्याशी निगडीत आहेत. अर्थात प्रत्येक घटकाच्या परिणामांचे महत्त्व व
प्रमाण वेगवेगळ्या प्रदेशांत वेगवेगळे असते. उदा. आफ्रिका व आशियातील सांस्कृतिक
विकासावर सुपीक जमिनींचा परिणाम जास्त महत्त्वाचा ठरतो
, तर
युरोपमध्ये हवामान हा घटक जास्त महत्त्वाचा आहे. हवामानाचा मजुरीच्या दरांवर कसा
परिणाम होतो हेही त्याने यात सांगितले. निसर्गाच्या सर्वसाधारण दृष्टिकोणामुळे
सामाजिक मन घडत असते व त्यातूनच राष्ट्रीय मतप्रवाह निश्चित होतात म्हणूनच
विकासाची एकूण दिशा ठरविण्याच्या दृष्टीने हा चौथा घटक अतिशय महत्त्वाचा आहे हे
बकलने स्पष्ट केले. जेथे निसर्ग कमकुवत असतो तेथे मानवी मनामध्ये आत्मविश्वास
निर्माण होतो व तो क्रियाशील बनवण्यास उद्युक्त होतो. याउलट जेथे निसर्ग अत्यंत
सामर्थ्यशाली असतो तेथे मानव नैसर्गिक चमत्करांपुढे नतमस्तक होतो. त्यामुळे तो
अंधश्रद्ध बनतो. आत्मविश्वासाचा अभाव असल्याने विकासाची गतीही कमी असते. यावरून हे
स्पष्ट होते की
, कोणत्याही प्रकारचे पर्यावरण असो, त्याचा मानवावर सतत वरचष्मा असतो. म्हणूनच इतिहासाचा अभ्यास करताना जड
विश्वाचा विचार करणे अटळ आहे. शेवटी निसर्ग-मानव एकमेकांवर परिणाम करतात हे मान्य
करून बकल आवर्जून सांगतो की
, मानव केव्हा व कसा क्रियाशील
बनतो हे सर्वस्वी निसर्गाधीन आहे.



20 व्या
शतकाच्या सुरूवातीस पर्यावरणवादाच्या विचारसणीमध्ये मौलिक भर टाकणारा शास्त्रज्ञ
म्हणजे एडमंड डेमॉलिश हा होय. याने लेप्ले (
1807 ते 1882
) या तज्ज्ञाने सांगितलेले विचार विकसित कले. लेप्लेने पर्यावरणाचा मानवी
जीवनावर होणारा परिणाम स्पष्ट करण्यासाठी जागा
, कार्य व समूह
असे सूत्र सांगितले. जागा म्हणजे पर्यावरण
, कार्य म्हणजे
मानवी कार्य आणि समूह म्हणजे मानवी संस्कृतीच्या विकसनानुसार अस्तित्वात असलेला
मानवी समाज होय. या सूत्राचा विचार करून डेमॉलिन्सने पर्यावरणातील अनेक शक्तींच्या
अभ्यासावर लक्ष केद्रित केले. त्याच्या ग्रंथामध्ये त्याने विविध मानवी समूहांचे स्थलांतराचे
मार्ग कसे निर्माण झाले हे स्पष्ट केले. त्याच्या मते
, स्थलांतराचे
मार्ग म्हणजे केवळ स्थलांतर कोणत्या प्रदेशातून मार्गक्रमण करते हे नसून
कालांतराने मानवी समूह आपणास योग्य अशी जागा कोणती निवडतात याचाही विचार ध्यानात
घेतला पाहिजे. ज्या विविध मार्गानी आपले पूर्वज भटकत होते त्यानुसार आजच्या
स्कॅन्डेनेव्हियन
,जर्मन, ग्रीक इटालीयन,
स्पॅनिश इ. प्रदेशांतील लोकांमध्ये विविधता आढळते. याच्याही पुढे
जाऊन तो म्हणतो
, "जर पृथ्वीचा पृष्ठभाग बदलला गेला नाही
आणि त्यवर मानवी इतिहास पुनश्च घडण्यास सुरूवात झाली तर त्या इतिहासाची
पुनरावृत्तीच होईल" यावरून पृथ्वीच्या पृष्ठभागा- वरील घटकांना डेमॉलिन्सच्या
दृष्टीने किती महत्त्वाचे स्थान आहे हे स्पष्ट होते. त्याने आपल्या विचारांना
पुष्टी देणारी अनेक उदाहरणे सांगितली. स्टेप प्रकारचे हवामान गवत निर्माण करते. या
गवताळी प्रदेशामध्ये एका विशिष्ट प्रकारचे मानवी जीवन आढळून येते. गवतावर आधारित
घोड्यांची पैदास व घोड्यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य असलेले मानवी जीवन तेथे दिसून
येते. मानवाचा आहार प्राणिजीवनावर अवलंबून असतो. हे प्राणिजीवन पर्यावरणावर
अवलंबून असते. त्याचप्रमाणे मानव ज्या वस्तूंचे उत्पादन करतो त्या वस्तूंचा कच्चा
माल ही निसर्गाचीच देणगी आहे. अशा तऱ्हेने मानवाच्या आहार-विहारावर निसर्गाचे प्रभुत्व
आहे. निसर्गवादी किंवा पर्यावरणवादी विचारसणीच्या विकसनातील शेवटचा टप्पा म्हणजे
एलन सेंपल या बिदूषीचे कार्य होय. तिने
1911 मध्ये `भौगोलिक पर्यावरणाचे परिणाम' हा ग्रंथ सादर केला.
रॅट्झेलची विद्यार्थिनी असल्याने तिने त्याच्या विचारांचीच कास धरली. अर्थात
शास्त्रीय प्रगतीनुसार रॅट्झेलच्या कल्पनां- मध्ये थोडा बदल करण्याची आवश्यकता
तिने मान्य केली. मानवाची संपूर्ण जडण-घडण सर्वस्वी निसर्गानुसार होत असते."
ही तिच्या विवेचनातील मध्यवर्ती कल्पना होय. अगदी टोकाची भूमिका घेताना मानवास
लाभलेली बुद्धी
, स्फूर्ती आणि कार्यक्षमता नैसर्गिक घटकांवरच
अवलंबून असते असे तिने आवर्जून सांगितले. तिच्याच शब्दांत सांगायचे तर "मानव
हा पृथ्वीच्याच धूलिकणांतील एक कण आहे (
dust of her dust) " असे म्हणावे लागेल. पृथ्वीने मानवाला जन्म देऊन त्याचे पालनपोषण केले.
एवढेच नव्हे तर पृथ्वीनेच मानवनापुढे जलसिंचन किंवा जलवाहतूक यासारखे प्रश्न
निर्माण केले आणि पृथ्वीनेच त्यांची उत्तरे शोधण्याच्या दृष्टिने मानवास सामर्थ्य
व बुद्धी बहाल केली. पर्वतमय प्रदेशात तिने मानवास डोंगर चढण्यासाठी जसे जास्त
शक्तिशाली पाय व स्नायू दिले तसे किनारपट्टीच्या प्रदेशात त्यास होडी
चालविण्यासाठी भरदार छाती आणि ताकदवान हात दिले. तेव्हा मानवाचे विविध प्रकारचे
सामर्थ्यसुद्धा निसर्गाची देणगी आहे. एखाद्या साच्यातून जशी प्लॅस्टिकची खेळणी
तयार केली जातात त्याप्रमाणे विविध नैसर्गिक प्रदेशांतून विविध प्रकारचे मानवी
समूह तयार केले गेले आहेत. अशा प्रकारे निसर्गवाद आवर्जून सांगणाऱ्या या विदूषीने
धर्म धार्मिक
, कल्पना व रूढी यांवरही निसर्गाचा परिणाम कसा
होतो ते स्पष्ट केले. पर्यावरणाच्या घटकांचे हे मानस-शास्त्रीय परिणाम किरशॉफ (
Kirchoff)
या रॅट्झेलच्याच विद्यार्थ्यानेही सांगितलेले आहेत. त्याच्या मते,
जंगलातील आणि सागरी विभागातील लोक अनेक देवतांची पूजा करतात तर
वाळवंटामध्ये प्रामुख्याने एकाच देवाची उपासना केली जाते. सेंपलच्या ते
, वाळवंटी प्रदेशात मैलौमैल पसरलेल्या वाळूमुळे प्रदेशास तोच तोपणा लाभतो व
त्यामुळेच एकाच देवाची उपासना करण्याकडे मानवाचा कल असतो. अशा तऱ्हेने शेती
,
उद्योग, व्यापार धर्म इत्यादींबाबत निसर्ग,मानवावर कसे प्रभुत्व गाजवीत असतो हे युरोप, आफ्रिका,
स्टेप प्रदेशांतील उदाहरणे देऊन तिने निसर्गवाद सांगितला.






रॅट्झेलपासून
किर्शॉफपर्यत निसर्गवादी विचारसरणी कशी विकसित होत गेली हे वरील विवेचनावरून
स्पष्ट होतेच. या तत्त्वज्ञाना मानवी भूगोलाची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने
फार महत्त्व आहे. किंबहुना या विचारसरणीमुळेच मानवी भूगोल या विषयास आधुनिक काळात
स्वतंत्र स्थान लाभले
, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही
निसर्ग मानवी जीवनांचा अभ्यास करून समान नैसर्गिक तत्त्व शोधून काढण्याचे
शास्त्रीय कार्य मोठ्या प्रमाणात घडू लागले. यामध्ये मानवी सामर्थ्यास दुय्यम
स्थान दिले देले असले तरी निसर्गाची नियमनशक्ती समजून घेण्याचे आव्हान
संशोधकांपुढे ठेवले गेले. त्यामुळे निसर्गताली शक्तींची जाणीव आपणास झाली. आजच्या
प्रगत मानवाचे सामर्थ्य वाढलेले आहे
, तो प्रतिकूल
परिस्थितीशी समर्थपणे झुंज देऊ शकतो
, व निसर्गास आपल्या
फायद्यासाठी वाकवू शकतो असे चित्र आज आपण पाहतो. त्यामुळे निसर्गवादी दृष्टिकोणाचे
महत्त्व यत्किंचितही कमी लेखून चालणार  ही.



निसर्गवादावरील
आक्षेप



निसर्गवादामध्ये
नैसर्गिक क्रियांना महत्त्व दिले जाते. परंतु नैसर्गिक क्रियांमध्ये दिसून
येणाऱ्या विरोधाभासाचे निरीक्षण करून निसर्गवाद अनेकांनी अमान्य केला.



1. निसर्गात
शिस्त नाही. शिस्त व कल्पकता मानवाने आणलेली आहे. सजीव पदार्थाच्या संख्यावाटणीत
बदल करून
, निर्जीव जमिनीतून अनेक प्रकारची पिके घेऊन मानवाने
पृथ्वीवर विविधता निर्माण केलेली आहे.



2. निसर्गाला
अनेक पदार्थाचा पुनरूपयोग करता येत नाही. कोळसा
, तेल ग्वानोचे
साठे यांच्यावरून ही गोष्ट दिसून येते. या पदार्थाचे साठे जमलेले आहेत. याचा अर्थ
हा की
, पुनरूपयोगाची प्रक्रिया त्यांच्याबाबत झालेली नाही. मानव
ही प्रक्रिया पुरी करतो. तेल
, कोळसा जळण म्हणून वापरतो.
ग्वानो गोळा करून शेतात मिसळतो. आणि तेथे ते वनस्पतिपोषक म्बणून पुन्हा एकदा उपयोगात
आणता येते.



3. निसर्ग हा
एकसुरी आहे. त्यातील विविधता मानवाने निर्माण केलेली आहे. माणसाचा हात लागेपर्यत
पृथ्वीचा बहुतेक भूभाग जंगलांनी आणि दलदलींनी व्यापलेला होता. त्या हिरव्या पाणथळ
आवरणात भव्यता होती
, पण विविधता नव्हती. प्राचीनकाळी
जंगलांनी पृथ्वीतील विविधता जवळजवळ झाकून टाकली होती. मानवाने पृथ्वीवर जी सृजनशील
परिवर्तने घडवून आणली त्यामुळे विविधता निर्माण झाली. सर्वात चित्तवेधक भू-प्रदेश
म्हणजे प्राचीन अरण्ये किंवा मानवस्पर्शविरहित निसर्ग नव्हे
, तर माणसाने फुलबागा, पायवाटा, कुरणे,
उद्याने, शेते, तलाव
यानिशी
`मानवीकरण' केलेली दृश्ये.
काश्मीर- मधील
`दाल सरोवर, '`उटकमंड
येथील
`उटीबाग' अशी पृथ्वीच्या
मानवीकरणाची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. निसर्गातील अनेक वैभवे जेथे माणसाचा स्पर्श
झालेला आहे अशा प्रदेशात नजरेला आली आहेत.



4. निसर्गनिर्मिती
जग हे आदर्श नाही
, कारण गारांचा पाऊस, पूर,
अवर्षम, वादळे, भूकंप,
ज्वालामुखी असले अनर्थ वारंवार होतात. या अनर्थाना मानव जबाबदार
नसतो.



5. मानवनिर्मित
परिसर निकोप ठेवणे हे निसर्गाला जमत नाही. पृथ्वीचे मानवीकरण प्रचंड वेगाने
झाल्यामुळे परिसराचे आरोग्य माणसाने घेतलेल्या काळजीवरच अवलंबून असते. शेतकऱ्यांनी
दुर्लक्ष केल्यास हजारो वर्षे उत्पन्न देणाऱ्या शेतजमिनी तणांनी आणि झुडपांनी
व्यापून जातात. दलदली साफ न ठेवल्यास मलेरियाचा प्रादुर्भाव होतो. म्हणजेच निसर्ग
माणसाने लक्ष दिल्याशिवाय आपली गुणवत्ता राखू शकत नाही.कुटुंबनियोजनाबद्दल
पक्ष्यांत उपजत प्रवृत्ती असतात. ग्रे जंगल
, फाउलसारखे पक्षी
विशिष्ट फुलांची संख्या कमी झाली की कमी अंडी घालतात
, तर
मॅगवाय-रॉबिन पक्षी
`लग्ना'चा हंगाम
चुकवितो. परंतु मानव मात्र दारिद्रय वाढले की
,प्रजोत्पादनही
वाढवतो. पक्ष्याच्या उलट क्रिया माणसात घडते. या निसर्गाच्या लहरीचे आकलन होत
नाही.ज्या दोन प्रदेशांत निसर्गातील साम्य खूपच आढळते. परंतु त्याच दोन प्रदेशां-तील
मानवी जीवनात साम्य आढळत नाही. कांगोखोऱ्यातील पिग्मी व जावा-मधील इंडोनिशिय
यांच्या सांस्कृतिक दर्जात बराच फरक आढळतो.



शक्यतावाद
(
Possibilism)



मानवी प्रयत्नामुळे
निसर्गाची बंधने खूपच शिथिल होऊन जीवन सुसह्य होऊ शकते. निसर्गात अनेक सुप्त घटक
आहेत. त्यांचा योग्य प्रकारे अभ्यास करून आपल्या अग्रक्रमानुसार विकास घडविणे हे
सर्वस्वी मानवी प्रयत्नावर अवलंबून असते अशी मतप्रणाली म्हणजे शक्यतावाद.



1. शक्यतावाद्यांनी
स्थलीय एकतेच्या तत्त्वापासून आपले भौगोलिक तत्त्व प्रतिपादन करण्यास सुरूवात
केली. स्थलीय एकता या तत्त्वानुसार (
Principal of
terrestrial unity) सर्व पृथ्वी ही एकच आहे व पृथ्वीवरील जडवादी व
सजीव पदार्थाचा परस्परसंबंध आहे. भूस्तरीय रचनेचा परिणाम भूपृष्ठाच्या ठेवणीवर व
भूपृष्ठाचा परिणाम हवामान
, जमीन, वनस्पतीवर
होतो. याचा परिणाम मानवाची शेती आणि इतर व्यवसाय यांवर होतो. त्यामुळे मानवाची आर्थिक
व सांस्कृतिक प्रगती ही स्थलीय एकतेशी निगडीत आढळते. ब्रून्स यांनी वरील
सिद्धांताचा आधार घेऊन असे प्रतिपादन केले- मानव वस्ती असलेली पृथ्वी किंवा तिचे
विविध भाग यांवर मानवी भूगोलात संशोधन व्हावे. निसर्गवादी प्रामुख्याने विविध
भागांतील नैसर्गिक पर्यावरणाचा अभ्यास करीत असत.



2. शक्यतावादी
पुढे असे म्हणतात की वारे
, नद्या, हिमनद्या
याप्रमाणे मानव हा भूपृष्ठावर प्रचंड वेगाने बदल घडवून आणणारा घटक आहे. इतर घटकांपेक्षा
मानवी क्रिया-प्रक्रियांमुळे फार वेगाने भूपृष्ठावर बदल घडून येत असतो. आदिमानवाने
पृथ्वीवर बदल घडवून आणण्यास सुरूवात केली. अंतराळ-युगातील मानवाने प्रचंड वेगाने
हा बदल चालू ठेवलेला आहे.






3. मानव
निसर्गाच्या सहकार्याने त्याच्याबरोबर जोडीने काम करतो.पृथ्वीवरील उंचसखलपणा व
त्यामुळे आढळणारा गुरूत्वशक्तीतील फरक यांचा वापर मानवाने जलविद्युतनिर्मितीसाठी
केला. डोंगरउतारावरील जमीन काही ठिकाणी चहा
, कॉफीच्या
मळ्यांसाठी वापरली. अशी अनेक उदाहरणे मानव-निसर्ग यांच्या सहकार्याच्या संदर्भात
देता येतील.



4. मानवी
विकासाला निसर्ग बंधनकारक नाही. उलट त्याची अनुमती आहे असेही शक्यतावादी म्हणतात.
निसर्ग हा सल्लागाराची भूमिका बजावतो. मानवाने आधुनिक तंत्र वापरून
वनस्पति-पिकांच्या अनेक संकरीत जाती निर्माण केलेल्या. काचगृहातील शेतीचे तंत्र
सैबेरियासारख्या अतिशीत प्रदेशात वापरून तेथेही गहू
, सफरचंद
यांसारखी पिके घेतली. सैबेरियात उन्हाळा
60 ते 75 दिवस असला तरी प्रकाशमान सुमारे 18 तासांपेक्षा
जास्त असते. त्याचा वापर मानवाने करून घेतला. हा एकप्रकारचा निसर्गाशी केलेला
सहकारच आहे. अशा प्रकारच्या सहकार्यामुळे मानवाची वनस्पती निर्माण करण्याची कक्षा
वाढवली.



5. नैसर्गिक
परिस्थिती मानवाला अनेक ठिकाणी संधी उपलब्ध करून देते. परंतु तिचा फायदा कसा करून
घ्यायचा किंवा कोणत्या नैसर्गिक परिस्थितीच्या घटकांची निवड आपल्या आर्थिक
लाभासाठी करायची हे ठरविणे संपूर्णपणे मानवाच्या हातात असते. या संदर्भात ब्रून्स
,
या फ्रेंच भूगोलवेत्त्याचे वचन लक्षात ठेवण्याजोगे आहे.
गारगोटीपासून विस्तव तयार करता येतो. गारगोटीचे दोन खडे जवळजवळ आहेत
, परंतु त्यातून माणूसच विस्तव निर्माण करू शकेल. त्याचप्रमाणे सर्व
माननिर्मित घटकांची निर्मिती व शेवट या गोष्टी सर्वस्वी माणसावरच अवलंबून आहेत.
मानवच आपल्या नशिबाचा मालक आहे व तोच खरा शक्तिमान आहे.



6. मानवाला
इतर प्राण्यांपेक्षा बुद्धी
, कल्पकता, धैर्य
या गोष्टी जास्त असल्याने प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीतही त्याने आपल्या
संस्कृतीचा प्रसार केलेला आहे.



7 नैसर्गिक परिस्थिती
संपूर्णपणे मानवी समाजाचे स्वरूप नियंत्रित करू शकत नाही तर त्यांस सशर्त विकास
घडवून आणते. निसर्गाची पकड ढिली करणे हे मानवाच्या हाती असते.



8. शक्यतावाद्यांचे
अमेरिकेमधील प्रवक्ते बोमन असे म्हणतात की
, "निसर्गनियमांना अनुसरून मानव आपले जीवन व्यतीत करीत असतो, परंतु निसर्गनियमांचा प्रभाव स्थल-कालदृष्ट्या बदलता असतो. निरनिराळ्या
ठिकाणी एखाद्या नियमाचा परिणाम कमीजास्त दिसून येतो."



9. मानवाची
तंत्रविद्येत सतत प्रगती चालू असली तरीदेखील निसर्गाचे नियंत्रण सर्वस्वी झुगारून
देण्याइतपत मानव समर्थ बनणे कठीण आहे
, हे शक्यतावादी नेहमीच
आवर्जून सांगत आलेले आहेत.मानवी सामर्थ्याच्या मर्यादा त्यांनाही मान्य आहेत. अशा
रीतीने शक्यतावादी पर्यावरणाची दखल घेतात
,परंतु त्याचे
नियंत्रणकारक सामर्थ्य मान्य करीत नाहीत.



10 मानवी
भूगोल हे निसर्ग व मानव यांमधील तडजोड करण्याचे शास्त्र आहे. पृथ्वीवर एका विशिष्ट
मर्यादेपर्यत मानवी विकासाला वाव आहे. ही मर्यादा अक्षांश
, उंचीव
खोली यांनी तयार झालेली असते. त्यापलीकडे मानवी जीवन सुस्हय नसते. उदाहरणार्थ
,
70 अंश अक्षांशापलीकडे मानवी जीवनास योग्य असे हवामान नाही, तर जास्त उंचीवर प्राणवायू विरळ होतो, आणि मानवी
वस्ती घनरूप पृथ्वीवरच आढळते. अक्षांश
, उंची व खोली यांनी
घातलेल्या मर्यादेपर्यतच सापेक्ष रीतीने मानवी विकास होऊ शकतो. सर्व
निसर्गनियमांचे योग्य रीतीने पालन करूनच विकासयोजना मानव कार्यवाहित करतो.






11. मानवाच्या
क्रिया-प्रक्रियांमुळेच स्थळांच्या पर्यावरणात मानवनिर्मित वाढ झालेली आढळते.
जगातील विविध भागांचा एकमेकांशी संपर्क वाढल्यानंतर स्थळांच्या संदर्भातील
विचारसंगती वाढली
, आचारविचारांची देवाणघेवाण वाढली. मानवाने
नवीन तंत्र आत्मसात केल्याने अर्थकारण बदलले. बटाटे व मका हे पदार्थ कोलंबसाने
मेक्सिको व अमेरिकेतून युरोप खंडात आणले. त्यामुळे युरोपचे अर्थकारण बदलले.
महाराष्ट्रातील सोलापूर-नगरच्या काही भागात उसामुळे सुबत्ता निर्माण झाली.
राजस्तान कालव्यामुळे थरच्या वैराण वाळवंटात अनेक ठिकाणी गहू व कापूस यांच्या
शेतीस सुरूवात झालेली आहे. थोड्या कालानंतर तेथे यावर आधारित असे उद्योगधंदे
निघतील. त्यामुळे तेथील सांस्कृतिक पर्यावरण बदलेल. महाराष्ट्रातील पाझरतलावामुळे
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालेली आहे. पाझरतलावाभोवती झाडी
,
हिरवळ असलेले निसर्गदृश्य तयार होत आहे.



12. निसर्ग
नेहमी मूलभूत गरजा भागवितो असे नाही तर भौतिक विकासाला योग्य असे अनेक सुप्त घटक
मानवाला उपलब्ध करून देतो. या सुप्त गुणावर संपूर्णपणे मानवाचेच स्वामित्व असते.
भारत स्वतंत्र होईपर्यत अंदमान द्वीपसमूहात जाणे म्हणजे
`काळ्यापाण्या'ची शिक्षा भोगण्यासाठी जाणे असा अर्थ होता. राजबंदी, गुन्हेगार व निग्रोवंशीय आदिवासी यांची तेथे वस्ती होती. स्वातंत्र्योत्तर
काळात विशेषतः गेल्या दहा वर्षात अंदमानमधील निसर्ग व सांस्कृतिक दृश्य झपाट्याने
पालटले आहे. भारताच्या संरक्षणव्यवस्थेत अंदमानला अद्वितीय स्थान प्राप्त झालेले
आहेच
, पण हळूहळू अंदमानमध्ये वर्गविरहित समाज तयार होत आहे.
भारताच्या अर्थकारणातही अंदमानला महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त होत आहे.



13. मानव व
पर्यावरण यांच्या गतिमानतेचे तत्त्व हे शक्यतावादाचे महत्त्वाचे अंग आहे. मानवी
संपर्कामुळे पर्यावरणाच्या विविध घटकांची स्थल
, काल यांच्या संदर्भात
उपयुक्तता बदलत असते. एखाद्या ठिकाणचे नैसर्गिक पर्यावरण व त्याचे घटक स्थिर
असल्यासारखे वलाटत असले तरी मानवी जीवनाच्या संदर्भात त्यांचे महत्तव कमीजास्त
होते. गंगेच्या मैदानात पूर्वी सुबत्ता होती. परंतु लोकसंख्या वाढल्याने तेथील नैसर्गिक
साधने अपुरी पडतात. त्यामुळे आता बहुसंख्य लोकांचे जीवन दारिद्रय-रेषेखाली आढळते. पूर्वापारपासून
अरब देशात खनिज तेल होते. परंतु जेव्हा तेलाचा उपयोग करण्याचे तंत्र अवगत झाले
तेव्हाच अरब देशाला महत्त्व आले व तेलाचा व्यापार वाढला. जगात फारच थोड्या ठिकाणी
मानव निसर्गाधीन आहे. अमेझॉन
, कांगो खोऱ्यासारख्या भागांतच
मानवी समाजाची घडण पूर्णपणे निसर्गाच्या मुशीत झालेली आढळते.



टेलर यांचा थांबा आणि
पुढे जा निसर्गवाद
( Stop and Go Determinism -Taylor) ग्रिफिथ टेलर हे निसर्गवादी. त्यांनी थांबा आणि पुढे जा असा निसर्ग- वादाकडे
झुकलेला सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मानव व निसर्ग यांच्यातील
संपर्काची तुलना गजबजलेल्या रस्त्यावरील वाहतुकीच्या तांबड्या
,हिरव्या दिव्यांशी केली, वाहतूक म्हणजे मानवी
हालचाली
, मानवाच्या क्रिया-प्रतिक्रिया, मानवी विकासयोजना. हिरवा दिवा निसर्गाने दाखविल्यानंतरच मानवाला आपल्या
योजनांची पूर्तता करता येते. हिरवा दिवा याचा अर्थ अनुकूल निसर्ग
, सुपीक जमीन, भरपूर पाऊस, वर्षभर
हंगामकाल
, सुगम प्रदेशातील खनिजे यांद्वारा निसर्गाची
अनुकूलताच दिसते. तांबडा दिवा असताना म्हणजे निसर्ग प्रतिकूल असताना मानवाला मन
मानेल ते उद्योग
, व्यवसाय करता येत नाहीत. टेलर पुढे म्हणतात
की
, निसर्गाने घालून दिलेल्या चौकटीतच मानवाला मुक्तपणे
विकास करता येतो. जेथे नैसर्गिक साधनांची भरपूर उपलब्धता असते तेथे ही चौकट मोठी
असते. मानवाला त्यामुळे विकासाचा वेग वाढविता येतो. अनेक पर्याय या ठिकाणी उपलब्ध
होतात. परंतु निसर्गरूपी नियंत्रकाचे इशारे न पाळल्यास गंभीर अपघात होण्याचा संभव
असतो. टेल यांच्या मते
, मानव हा काही कमी महत्त्वाचा घटक
नाही
, परंतु जेथे मानवाने आपल्या बुद्धिचातुर्याने विकास
करून घेतलेला आहे तेथे त्याला निसर्गाची साथ मिळालेली आहे. निसर्गाने काही योजना
तयार केलेल्या असतात त्याचीच कार्यवाही मानव करतो. कॅनडाच्या प्रेअरी प्रांतात
,
मानवी प्रयत्नांमुळेच गव्हाचे कोठार निर्माण होऊ शकले, परंतु प्रेअरीतील सपाट, सुपीक प्रदेश व उन्हाळ्यात गहू
घेता येईल अशी योजना मूलतः निसर्गाची. म्हणूनच मानवी प्रयत्न तेथे यशस्वी झाले.






टेल यांचे निष्कर्ष
जरी निसर्गवादास जवळचे असले तरी त्यांनी मानवी पसंती
, निवड ही संकल्पना मांडली. विकासातील उद्दिष्टे गाठताना विविध पर्यायांनी
ती गाठता येतात. ती गाठण्यासाठी अनेक पर्याय निसर्गाने काही ठिकाणी दिलेले असतात
,
परंतु त्यातला कोणता पर्याय निवडायचा हे मानव ठरवितो. प्रत्येक
विभागात नैसर्गिक बंधने असतात. त्यांच्याशी ही निवड
, उद्दिष्टे
संलग्न असतात. या विधानाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी कॅनडा
,ऑस्ट्रेलिया
व अटांर्टिका येथील उदाहरणे दिलेली आहेत. ह तिन्ही भाग विस्तृत
, ऑस्ट्रेलिया उष्ण वाळवंटी तर कॅनडा थंड जंगलव्याप्त, आणि अंटार्टिका बर्फाच्छादित. या सर्व ठिकाणी निसर्ग अतिप्रबळ,. मानवी प्रयत्नांना या ठिकाणी यश मिळणे कठीण. अजूनही येथे मानवस्पर्शविरहित
अनेक भाग आहेत. अशा ठिकाणी संभववादाचा पुरस्कार करण्यात काहीच स्वारस्य नाही. अंटार्टिकातील
हिमगिरी ऑस्ट्रेलिया
, अरेबियासारख्या रूक्ष प्रदेशांत नेऊन तेथे
शुद्ध पाणी पुरविले व अंट्रार्टिकामधील खनिजे आणि कॅनडामधील वन व पशुसंपत्ती
यांच्या सहाय्याने कितीही विकास घडवून आणला तरी तेथील अनेक भाग उजाड राहणाराच.
म्हणजे ज्या प्रमाणात निसर्गाची अनुकूलता असते त्याच प्रमाणात मानवी प्रयत्न यशस्वी
होण्यास वाव असतो. जेथे निसर्गाची थोडी अनुकूलता दिसते अशाच ठिकाणी मानवी मन थोडा
विचार करू लागहते. प्राप्त नैसर्गिक परिस्थितीत कोणते तत्र वापरून आपला विकास
साधता येईल. याबद्दल विचार चालू होतात. निसर्गामुळेच मानवी प्रयत्नांना चालना
मिळते. मानवी भूगोलाचे स्वरूप व व्याप्ती प्रा. हंटिंग्टन यांनी मानवी भूगोलाच्या
मूलत्त्वांची चर्चा करीत असताना त्याची व्याप्तीही सांगितली आहे. त्यांच्या मते
,
मानवी भूगोलाच्या व्याप्तीचा अभ्यास पुढील दोन मुद्यांना धरून होणे
आवश्यक आहे :






1. प्राकृतिक
घटक.
2 मानवी प्रतिसाद.



हंटिंग्टन यांच्या
मते
,
मानवी भूगोलाच्या अभ्यासात नैसर्गिक परिस्थितीच्या घटकांना खूपच
महत्त्व आहे. स्थान
, भू-रूप, जमिनी,
समुद्रापासूनचे अंतर, हवामान हे नैसर्गिक
परिस्थितीचे घटक मानवाच्या आर्थिक जीवनावर व मानवी संस्कृतीच्या दर्जावर आपले
नियंत्रण ठेवतात. निरनिराळ्या प्रदेशांत नैसर्गिक परिस्थिती भिन्न असल्यामुळे तेथे
राहाणाऱ्या मानवसमाजांना सारख्याच प्रकारचे यश आर्थिक विकासात येत नाही. भारतीय
,
इजिप्शियन, चिनी, ग्रीक,
रोमन- या सर्व संस्कृतींची उगमस्थाने मध्य अक्षवृत्तीय विभागात
किंवा त्याजवळील आयनिक प्रदेशातच होती. प्रा. हंटिंग्टन यांनी सुचविलेल्या
मूलतत्त्वांचा स्तंभ वर दिला आहे. त्याचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येईल की
,



1. मानवी
भूगोल हे अतिशय व्यापक असे शास्त्र आहे.



2. मानवाचे
स्तंभात दर्शविलेले जे आठ प्रमुख व्यवसाय आहेत त्यांच्यावर भौगोलिक परिस्थितीचा
आणि मानवसमूहांनी गाठलेल्या सांस्कृति दर्जाचा परिणाम होतो. अंदमान बेटे व अमेझॉन
खोऱ्यातील आदिम जमाती अजूनही कंदमुळे गोळा करून
, शिकार करून
उपजीविका करतात
, तर लक्षद्वीप व लॅब्राडोरसारख्या ठिकाणी
मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आढळतो. कारखानादारी
, मोठ्या
प्रमाणावर विविध वस्तूंचा व्यापर हे व्यवसाय त्यांच्या आवाक्याबाहेरचे असतात.
उत्तर समुद्रावरील ऱ्हाईनच्या त्रिभुज प्रदेशात पूर्वी वाहतूक व व्यापार हे दोन
प्रमुख व्यवसाय होते. आता त्याच्या जोडीला दुग्धोत्पादन आणि कारखानदारी हे दोन प्रमुख
व्यवसाय आलेले आहेत. हे विविध व्यवसाय म्हणजे निसर्गाला मानवाने दिलेला प्रतिसाद.
मानसमूहांनी संस्कृतीचा जो टप्पा गाठलेला असतो त्यावर हा प्रतिसाद अवलंबून आहे.
निसर्गाशी तडजोड करण्याचे तंत्र जेथे प्रगत असते तेथे विविध प्रकारची अवजारे
,
यंत्रे, आयुधे मानवाने तयार केलेली असतात.
तेथे निसर्गाचा पगडा कमी आढळतो. जेथे ती कमी असतात तेथे मानव निसर्गाधीन असतो. मानवसमूहांनी
कार्यक्षमता
, त्यांचे गुणदोष, त्यांच्या
विभागात असलेल्या साधनांचा पूर्ण उपयोग करण्याची त्यांची पात्रता किंवा
निष्क्रियता या गोष्टी मानवी उत्साह व शरीरसंपदा यांवर अवलंबून असतात.










Tags:

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)