नमस्कार विद्यार्थी मित्रांनो
या वेळेस
आम्ही ऑगस्ट आणि सप्टेंबर चा अंक आपल्या साठी सोबतच घेऊन आलो आहोत.
मागील
महिन्यात काही वैयक्तिक तसेच तांत्रिक कारणा मुळे अंक प्रसिद्ध करू शकलो नाही त्या
बाबत अनेक विद्यार्थी मित्रांचे फोन आणि मेसेज येत होते व अंक कधी प्रकाशित होणार
याची विचारणा होत होती. तेव्हा एवढेच सांगेन की आपली प्रतीक्षा संपली आहे !
या
अंकामधील मांडणी मध्ये आम्ही मागील अंकापेक्षा अमुलाग्र बदल केला आहे. विद्यार्थी
मित्रांच्या मागणी वरून संपूर्ण अंक रंगीत करून आवश्कतेप्रमाणे प्रमाणे विविध
छायाचित्रं सुद्धा टाकले आहेत. ज्या मुळे आपणाला वाचण्यास अधिक आनंद येईल.
या अंकात
इतर चालू घडामोडी सोबतच दोन विशेष लेख आपल्या साठी घेऊन आलो आहोत.
त्यातील
पहिला लेख *"राम मंदिर - राजकीय घडामोडी ते
भूमिपूजन" यामध्ये सुरुवतीपासून ते आत्ता पर्यंत घडलेल्या घटनांचा तसेच विविध
पैलूंचा आढावा घेतला आहे. तर दुसरा लेख हा आपले नुकतेच बदललेले " राष्ट्रीय
शैक्षणिक धोरण 2020" हा आहे ज्यामध्ये नविन शैक्षणिक
धोरणानुसार शिक्षव्यवस्थेतील होणाऱ्या बदलांचे सखोल विश्लेषण तसेच त्यातील ठळक
मुद्दे घेऊन आलो आहोत.*
पण वेळे
अभावी आपले आवडते सदर "मन की बात" या अंकात प्रकाशित करू शकलो नाही पण
पुढील अंकात ते सदर पुन्हा प्रकाशित करू.
या नविन
स्वरूपातील अंकाला सुद्धा तुम्ही आधीच्या अंकासारखाच किंवा त्या पेक्षा अधिक
प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा
धन्यवाद.