गोंदिया जिल्ह्यात 1,599 अतितीव्र कुपोषित बालके

MPSC TECH
0


 

गोंदिया जिल्ह्यात 1,599 अतितीव्र कुपोषित बालके

देश कुपोषणमुक्त करण्यासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. मात्र, कुपोषण कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याचे चित्र आहे. गोंदिया जिल्ह्यातील कुपोषित बालकांचा आकडा धक्कादायक आहे. यात शून्य ते 6 वर्ष वयोगटातील बालकांची गणना केली जाते. गोंदिया जिल्ह्यातील 8 तालुक्यांमध्ये सध्या 1 हजार 599 अतितीव्र कुपोषित बालके आढळून आल्याचे सांगितले जात आहे. अशा कुपोषित बालके, गरोदर माता व नवजात बालकांना शासनाकडून दररोज पोषण आहार उपलब्ध करून दिला जात आहे.

गरोदर स्त्रिया, स्तनदा माता आणि 3 वर्षापर्यंतच्या बालकांना पौष्टिक आहार आणि इतर पौष्टिक पदार्थ पुरवले जातात. दुसरीकडे अंगणवाडी केंद्रांमधील लाभार्थी बालकांना अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पोषण आहार दिला जातो. एकही बालक कुपोषित राहता कामा नयेत, हा यामागील मुख्य उद्देश. मात्र, हा उद्देश साध्य होत नसल्याचे या आकडेवारीवरून अधोरेखित होत आहे. पोषण आहार आणि कुपोषण निर्मूलन योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असले तरी कुपोषित बालकांची संख्या कमी होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)