ब्रिटिश सत्तेचे एकत्रीकरण (१८१८-१८५७)

MPSC TECH
0




पेशवाईचा १८१८ मध्ये
अस्त झाला आणि बराच मोठा भू प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात आला. आता पंजाबमधील शीख
साम्राज्य संधि व बलुचिस्तानचे अमीर ही राज्येच जिंकावयाची राहिली होती. बाकीच्या
संपूर्ण भारतीय प्रदेशावर आता कंपनीचा ताबा प्रस्थापित झाला होता अॅक्हर्स्टच्या
कारकिर्दीतचपासून कंपनीचे लक्ष सर्व बाजूंनी भारताच्या भौगोलिक सीमेपर्यत आपले
राज्य वाढविण्याकडे केंद्रित झाले होते. जसजसा साम्राज्याविस्तार वाढला तसतशा या
साम्राज्याचे संरक्षण करण्याच्या समस्याही निर्माण झाल्या अॅम्हर्स्ट ते डलहौसी
पर्यतच्या सर्वच गव्हर्नरांना या समस्येची उकल करण्याकडे लक्ष द्यावे लागले.


र्लॉड हेस्टिंग्जनंतर
र्लॉड अॅक्हर्स्ट भारताचा गव्हर्नर जनरल झाला. त्याच्या कारकिर्दीतचत पहिले
ब्रम्ही युध्द झाले. या युध्दात इंग्रजांनी ब्रम्ही फौजांचा पराभव केला.
यांदेबूच्या तहाने ब्रम्ही सरकारने इंग्रजांना आराकान व तेनासरीम हे प्रांत दिले व
आपल्या फौजा असामच्या प्रदेशातुन मागे घेतल्या (१८२६)







सिंधवर विजय :


               सिंध प्रांत पूर्वी मोगल
साम्राज्याचा एक विभाग होता. या साम्राज्याच्या पतनानंतर अफगाणांनी संधि काबीज
केला. अफगाणिस्तानात जेव्हा यादवी सुरु झाली त्या वेळी १७६८ मध्ये बलुचिस्थानातील
तालपूर जातीने तेथे आपली सल्तनत स्थापन केली. सिंधमध्ये तीन निरनिराळे सरदार
मीरपूर व हैद्राबाद येथे राज्य करीत होते. व्यापारी व लष्करीदृष्टया इंग्रजांना
संधि महत्वाचा वाटत होता. त्यामुळे बेंटिकने तेथील अमीरांशी घनिष्ठ संबंध स्थापन
करण्याचा प्रयत्न केला . त्यासाठी र्बोड ऑफ कंट्रोलचा अध्यक्षा र्लॉड एलेनबरो याने
सुचविलेल्या योजनेनूसार कार्य करण्याचे त्याने ठरविले. इ.स. १८३० मध्ये लेफटनंट
रॉर्बट बर्न याला काही घोडे व अन्य वस्तू रणजितसिंगला भेट देण्यासाठी सिंधमार्गे
पंजाबला पाठविण्यात आले. बर्नला असा गुप्त आदेश देण्यात आला होता. की त्याने
प्रवासात सिंधच्या राजकीय व लष्करी स्थितीची पाहाणी करावी. जमल्यास अमीराशी
व्यापारी करार करावा आणि आपला अहवाल गव्हर्नर जनरलकडे पाठवावा.


बर्नच्या योजनेमूळे
रणजितसिंगच्या मनातही इंग्रजांच्या हेतुबदल अमीराप्रमाणेच शंका निर्माण झाली. कारण
सिंधि जिंकून घेण्याची त्याचीही इच्छा होती. पंरतु रणजितसिंगने सिंधवर आपले
वर्चस्व प्रस्थापित करावे ही गोष्ट इंग्रजांना मान्य नव्हती  अमीरसुध्दा रणजितसिंगच्या संभाव्य आक्रमणाबदल
भयभीत होते. बेंटिंकने त्यांच्या भीतीचा फायदा घेऊन कच्छचा इंग्रज रेसिडेंट कर्नल
पॉटीजर याला अमीराशी बोलणे करण्यासाठी पाठविले. त्याने इ.स. १८३२ मध्ये अमीराला
कंपनीशी व्यापारी तह करण्यास भाग पाडले. या तहानुसार इंग्रज सिंधमध्ये व्यापार करू
शकत होते.


सिंध
जिंकण्यात यश (१८४२-१८४४) :


                १८३२ मध्ये र्लॉड बेंटिंकने सिंधच्या
अमीरांशी एक व्यापारी करार केला होता आणि अमीराला कंपनीने असे आश्र्वासन दिले
होते. की कंपनी आपल्या फौजा सिंधमधुन कधीही नेणार नाही. इ.स. १८३८ मध्ये ऑकलंडने
पुन्हा सिंधच्या अमीरांशी एक करार केला. या करारानुसार अमीरांनी हैद्राबाद येथे
इंग्रज रेसिडेंट ठेवून घेण्याचे मान्य केले. पहिल्या इंग्रज अफगाण युध्दाला
सुरुवात झाल्यावर इंग्रज सेनेला रणजितसिंगने आपल्या प्रदेशातून जाऊ दिले नाही.
त्यामूळे ऑकलंडने १८३२ चा अमीरांशी झालेला करार मोडून इंग्रज सैन्य सिंधमधुन
अफगाणिस्तानाकडे पाठविले. एवढेच नव्हे तर युध्दाच्या खर्चासाठी त्याने संधि
अमीरांकडून २१ लक्ष रु वसूल केले. त्यांनंतर १८३९ मध्ये ऑकलंडने अमीरांशी पुन्हा
एक नवीन तह केला त्यानुसार अमीरांनी इंग्रजांना ३ लक्ष रु वार्षिक खंडणी द्यावी
संधि हैद्राबादेस इंग्रज रेसिडेंट होता. त्याने २ अमीरांबदल तार केल्यामूळे
त्यांची चौकशी करण्याकरीता र्लॉड एलेनबरोने सर चार्ल्स नेपियरला सैन्यासह सिंधमध्ये
पाठवले. ९ सप्टेंबर १८४२ रोजी तो कराचीत येऊन दाखल झाला. त्याने अमीराविरुध्द
पुरावे गोळा केले व त्याच आधारावर अमीरांनी कंपनीशी केलेला करार पाळला नाही ही सबब
पुढे करुन नोव्हेंबर १८४२ मध्ये त्यांच्यापूढे नेपियरने एक नवीन करार ठेवला
त्यातील प्रमुख कलमे पुढीलप्रमाणे


(१) अमीरांनी आपली
स्वतंत्र नाणी पाडू नयेत.


(२) सिंधमधील
शिकारपूर
,
सख्खर, भक्कर, ही
महत्वाची ठिकाणे. कंपनीच्या ताब्यात द्यावीत.


(३) सख्खरच्या
उत्तरेकडील प्रदेश बहावलपूरच्या नबाबाला द्यावा


(४) संधिू नदीतून
मुक्त संचार करण्याची इंग्रजांना परवानगी द्यावी.


(५) अमीरांनी कंपनीशी
एकनिष्ठ राहावे


इ. कलमे त्यात होती
या कराराच्या मोबदल्यात अमीरांना तैनाती फौजेच्या खर्चासाठी जे ३ लक्ष रु द्यावे
लागत होते ते माफ करण्यात आले.


हैद्राबादच्या
परिषदेत अमीरांनी इच्छा नव्हती तरी या करारावर सहया केल्या. या सहया म्हणजे जूलूम
जबरदस्तीच होती. इंग्रजांपूढे अशी शरणागती पत्करण्यास काही अमीर तयार नव्हते. १५
फेब्रुवारी १८४३ रोजी सायंकाळी पुष्कळशा बलूची लोकांनी रेसिडेंट आऊटरमच्या
बंगल्यावर हल्ला चढवला
, पण हल्ला होताच आऊटरम पळून
गेल्यामुळे वाचला.


हैद्राबादच्या
उत्तरेस सुमारे १० मैलांवर मियानी येथे २०
,००० बलूची
सैन्य गोळा झाले होते. १७ फेब्रूवारी १८४३ रोजी नेपियर हैद्रबादहून सैन्यासह
निघाला आणि त्याने बलूची सैन्यावर हल्ला चढवला मियानी येथे घनघोर युध्द होऊन त्यात
अमीरांचा पराभव झाला. हैद्राबाद शहर इंग्रजांच्या ताब्यात आले. काही दिवसांनंतर
पुन्हा अमीरांनी गडबड केल्याचे नेपियरला कळले अमीर हैद्राबादवर चालून आले. हे
वर्तमान कळताच २४ मार्च १८४३ रोजी नेपियरने एकदम हल्ला करुन त्यांना पराभूत केले.
२७ मार्च १८४३ रोजी इंग्रज सेनेने मीरपूर जिंकून घेतले. १४ जून १८४३ रोजी अमीरांचा
नेता शेर मोहम्मद याचाही पाडाव करुन नेपियरने सर्व सिंध इंग्रजांच्या वर्चस्वाखाली
आणला ऑगस्ट १८४३ मध्ये एलेनबरोने सिंधचे विलीनीकरण ब्रिटिश साम्राज्यात झाल्याची
घोषणा केली सिंधवर विजय मिळवून देणाऱ्या नेपियरलाच तेथे गव्हर्नर म्हणून नेमण्यात
आले.


इंग्रज-शीख
युद्धे : (१८४५-१८५०)


भारतातील
साम्राज्यविस्ताराच्या दृष्टीने ब्रिटिशांनी शिखांविषयी अवलंबिलेले धोरण व त्यातून
उद्भवलेली दोन युद्धे भारताच्या इतिहासात प्रसिद्ध आहेत. रणजितसिंगाच्या
कारकीर्दीत इंग्रज-शीख संबंध मित्रत्वाचे होते. रणजितसिंग व इंग्रज यांच्यात १८०९
साली झालेल्या तहानुसार सतलज नदी ही ब्रिटिश व शीख ह्यांच्या राज्यांमधील सरहद्द
म्हणून मान्य झाली व पुढे सुमारे तीस वर्षे हीच व्यवस्था कायम राहिली. पहिल्या
इंग्रज-अफगाण युद्धात रणजितसिंगाने इंग्रजांना सहकार्यही दिले तथापि
रणजितसिंगाच्या मृत्युनंतर (१८३९) इंग्रज-शीख संबंध बिघडण्यास सुरूवात झाली व
त्याचेच पर्यवसान इंग्रज-शीख युद्धांत झाले.


पहिले
युद्ध : (१८४५).


१८४५  मध्ये रणजितसिंगाचा सर्वात लहान मुलगा दलीपसिंग
यास गादीवर बसवून त्याची आई जिंदन हिने मंत्र्याच्या साहाय्याने राज्यकारभार
चालविला. तथापि राजकीय अस्थिरतेमुळे लष्करी व्यवस्था पूर्णपणे बिघडून गेली. फौजेला
काबूत ठेवण्यासाठी सैनिकांना लष्करी कामगिरीत अडकविणे भाग होते
, यासाठी राणी जिंदनने आपल्या सरदारांच्या सल्ल्यानुसार ब्रिटिशांच्या
मुलखावर स्वारी करण्याचा बेत आखला. त्याच वेळी ब्रिटिश गव्हर्नर हार्डिंग याने
सिंध प्रांतावरील स्वारीनंतर इंग्रजी सैन्य फिरोझपूरजवळ आणून ठेवले. त्यामुळे
इंग्रज सैन्य आपल्या सैन्यावर स्वारी करणार असा शीख सैन्याचा ग्रह होऊन
, त्यांनी ११ डिसेंबर १८४५ रोजी सतलज नदी ओलांडून इंग्रजांच्या प्रदेशावर
स्वारी केली. त्यामुळे हार्डिंगने १३ डिसेंबर १८४५ ला शिखांबरोबर युद्ध घोषित
केले. मुडकी
, फिरोझशाह, अलीवाल व
सोब्राओन येथील लढायांत शिखांचा पराभव झाला. इंग्रजांनी लाहोर जिंकल्यामुळे
शिखांना तह करणे भाग पडले. इंग्रज व शीख यांच्यात झालेल्या लाहोर तहानुसार
सतलजच्या दक्षिणेकडील शिखांचा प्रदेश म्हणजेच सतलज व बिआस यांमधील प्रदेश कायमचा
इंग्रजांना मिळाला. इंग्रजांना युद्धखर्च म्हणून दीड कोट रूपये द्यावे असे ठरले.
पैकी पन्नास लाख रूपये रोख आणि एक कोटीसाठी जम्मू 
व काश्मीर हा प्रदेश देण्यात आला. वीस हजार पायदळ व बारा हजार घोडदळ एवढीच
फौज असावी
, असे बंधन शिखांवर घालण्यात आले. दलीपसिंगाला
गादीवर बसवून पालक म्हणून त्याची आई जिंदनने लालसिंगाच्या सल्ल्याने राज्यकारभार
करावा
, असे ठरविण्यात आले. तसेच ब्रिटिश सैन्य लाहोरला एक
वर्ष रहावे
, हे मान्य करण्यात आले. लाहोर तहानंतरही
पंजाबमधील राजकीय अस्थिरता कमी झाली नाही. १८४६ मध्ये शीख सरदारांनी इंग्रजांबरोबर
दुसरा तह केला. या तहानुसार पंजाबची राज्यव्यवस्था आठ शीख सरदारांच्या रीजन्सी
कौन्सिलने पहावी व त्यावर ब्रिटिश रेसिडेंट अध्यक्ष असावा
, असे
ठरले. दलीपसिंग वयात येईपर्यंत इंग्रजी फौज लाहोरला ठेवावी व त्याबद्दल शिखांनी
ब्रिटिशांना प्रतिवर्षी आठ लक्ष रूपये द्यावे असे ठरले. ह्या तहामुळे लाहोर
दरबारावर इंग्रजी पकड घट्ट होऊन पुढील काळात पंजाब ताब्यात घेण्यास इंग्रजांचा
मार्ग सुकर झाला.


दुसरे
युद्ध : (१८४९). 


१८४६ च्या तहाप्रमाणे
ब्रिटिश रेसिडेंटचे वर्चस्व शीख दरबारावर कायम झाले. सेनाधिकाऱ्यांच्या विरूद्ध
सैन्यात असंतोष धुमसत होता. त्यातच मुलतानचा शीख अधिकारी मुळराज याच्याकडून लाहोर
सरकारने हिशेब मागितले. मुळराजाने राजीनाम दिला व तो मान्य करण्यात आला. मुलतानला
नवीन शीख प्रशासक नेमण्यासाठी डलहौसीने पाठविलेल्या दोन्ही ब्रिटिश अधिकाऱ्यांचे
खून झाले. मुळराजने ब्रिटिश सत्तेविरूद्ध बंड पुकारले. त्याच वेळी राणी जिंदनने
पंजाब प्रांत स्वतंत्र करण्याची खटपट सुरू केली. त्यामुळे राणीला इंग्रजांनी
हद्दपार करताच बंड फैलावले. १८४९ मध्ये शिखांनी इंग्रजांविरूद्ध प्रचंड उठाव
केल्यामुळे डलहौसीने शिखांविरूद्ध युद्ध पुकारले. या युद्धात पेशावर परत
घेण्यासाठी अफगाणांनी शिखांशी सहकार्य केले. तथापि मुळराजाचा पाडाव झाला.
लाहोरच्या रेसिडेंटने मुलतानला वेढा घालण्यसाठी शेरसिंगाबरोबर सैन्य पाठविले
, पण तो शिखांनाच मिळाला. १८४९ मध्ये चिलिआनवाला येथे शीख व ब्रिटिश
सैन्यांत लढाई झाली. ती निर्णायक न झाल्याने चिनाब नदीकाठी गुजराथ शहराजवळ दोन्ही
सैन्यांत घनघोर संग्राम झाला. त्यात शिखांचा पराभव होऊन शेरसिंग व खालसा सैन्य
ब्रिटिशांना शरण गेले.


ब्रिटिशांनी
दलीपसिंगाला ५०
,००० पौंड वार्षिक तनखा देऊन शिक्षणासाठी
इंग्लंडला पाठविले. पुढे तो ख्रिस्ती झाला. त्यानंतर पंजाबचे राज्य खालसा करण्यात
आले. पंजाब प्रांत मिळाल्यामुळे ब्रिटिश साम्राज्याची सरहद्द अफगाणिस्तानच्या
सरहद्दीपर्यंत भिडली. पंजाब स्वतंत्र प्रांत करण्यात आला . पुढील काळात
ब्रिटिशांच्या सनदशीर धोरणामुळे शीख ब्रिटिशांचे कायम मित्र बनले. त्यांनी दुसरे
इंग्रज-अफगाण युद्ध व १८५७ चा उठाव यांत ब्रिटिशांना सहकार्य दिले.


र्लॉड
डलहौसीकडून पंजाबचे विलिनीकरण :


र्लॉड हार्डिगच्या
जागेवर जानेवारी १८४८ मध्ये डलहौसीची नियुक्ती झाली. मुलतानचा गव्हर्नर मुलराज
याच्या बंडामुळे इंग्रजांना पंजाबवर आक्रमण करण्याची संधी मिळाली. १८४६ मध्ये
इंग्रज रेसिडेंटच्या सूचनेवरुन


अ) मुलराजला भेटीदाखल
२० लक्ष रु चा नजराणा देण्यास सांगण्यात आले.


(ब) रावी नदीच्या
उत्तरेकडील प्रदेश लाहोर दरबारला सोपविण्यास सांगण्यात आले.


(क) मुलतान प्रांताचा
कर तीन वर्षासाठी ३३ लाखने वाढविण्याचे ठरविण्यात आले.


या गोष्टी मुलराजाला
मान्य नव्हत्या
, म्हणून त्याने डिसेंबर १८४७ मध्ये आपल्या
गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला. त्यामूळे त्याच्या जागेवर ३०
,०००
रु वार्षिक वेतनावर काहनसिंहाला नियूक्त करण्यात आले. त्याला मदत करण्यासाठी जे
दोन इंग्रज अधिकारी आले होते. त्यांच्या उद्दाम वर्तनामुळे त्यांना ठार मारण्यात
आले. प्रजेने जे बंड केले त्याचे नेतृत्व मुलराजला देण्यात आले. या बंडाचे लोण
इतरत्रही पसरले.


ऑक्टोबर १८४८ मध्ये
डलहौसीने घोषणा केली की कोणतीही पूर्वसूचना न देता शिखांनी अकारण युध्द सुरु केले
आहे. मी शपथपूर्वक सांगतो की शिखांपासून या युध्दाचा बदला घेतला जाईल.


१६ नोव्हेंबर १८४८
रोजी हयु गफ याचा शीख सैन्याशी संघर्ष् झाला. त्यांच्यात झालेल्या या रामनगरच्या
लढाईत कोणताही निर्णय लागला नाही
, तसेच त्यांच्यात
जानेवारी १८४९ मध्ये झालेल्या चिलियनवाला येथील युध्दातही कोणताच निर्णय लागला
नाही. त्यामूळे हयू गफच्या जागेवर चार्ल्स नेपियरची नियुक्ती करण्यात आली.
त्याच्या नेतृत्वाखाली झालेल्या गुजरात युध्दांत इंग्रजांनी शिखांचा पराभव केला हे
युध्द तोफांची लढाई म्हणून प्रसिध्द आहे. ही निर्णायक लढाई होती. संपूर्ण पंजाब
इंग्रजांच्या हाती आला डलहौसीने ब्रिटिश साम्राज्यात पंजाबचे विलीनीकरण करुन
टाकले. आयुक्तांच्या एका समितीकडे पंजाबचे प्रशासन सोपविण्यात आले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)