प्रार्थना समाजाशी संबंधीत महत्वाच्या व्यक्ती
दादोबा पांडुरंग तर्खडकर / दादोबा पांडुरंग : यांनी डॉ. आत्माराम पांडूरंग यांच्या सोबत मिळून प्रार्थना समाजाची स्थापना केली
जन्म : 9 मे १८१४
मृत्यू : १७ ऑक्टोबर १८८२
त्यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणतात.
यांनी स्थापन केलेल्या इतर संस्था (संस्थापक सदस्य) : मानवधर्मसभा (१८४४) , परमहंससभा (१८४९)
दादोबा पांडुरंग यांचे प्रकाशित साहित्य
नाव |
प्रकाशन वर्ष (इ.स.) |
तर्खडकर भाषांतर पाठमाला-भाग १ ते ३ |
|
मराठी नकाशांचे पुस्तक |
१८३६ |
महाराष्ट्र भाषेचे व्याकरण, (पहिली आवृत्ती) |
१८३६ |
आत्मचरित्र |
१८४६ |
१८५० |
|
१८५७ |
|
इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका |
१८६० |
मराठी लघु व्याकरण |
१८६५ |
धर्मविवेचन |
१८६८ |
अ हिंदू जंटलमन्स रिफ्लेक्शन्स रिस्पेक्टिंग द वर्क्स ऑफ एमॅन्युएल स्वीडनबर्ग |
१८७८ |
मोठ्या महाराष्ट्र व्याकरणाची पूरणिका |
१८८१ |
शिशुबोध |
१८८४ |
आत्माराम पांडुरंग तर्खडकर : यांनी आपले मोठे भाऊ दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या सोबत मिळून प्रार्थना समाजाची स्थापना केली. हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते.
जन्म : २३ डिसेंबर १८२३
मृत्यू : २६ एप्रिल १८९८
धर्मसुधारणेच्या चळवळीतील सहभाग : दादोबा पांडुरंग, राम बाळकृष्ण, रा. गो. भांडारकर इ. सहकाऱ्यांसह परमहंससभा स्थापन करण्यात डॉ. आत्माराम ह्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.
यांनी स्थापन केलेल्या इतर संस्था (संस्थापक सदस्य) : परमहंससभा (१८४९)
रामकृष्ण गोपाळ भांडारकर : हे संस्कृत पंडित, मराठी शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक व प्रार्थना समाजाचे आधारस्तंभ होते. १८९३-९५ सालांदरम्यान ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. तसेच ते विधवाच्या विवाहाचे पुरस्कर्ते होते.
जन्म : ६ जुलै १८३७
मृत्यू : २४ ऑगस्ट १९२५
ज्या काळात पाली, मागधी यांसारख्या प्राकृत भाषांचा अभ्यास करणारे दुर्मीळ होते, त्या काळात डॉ. भांडारकरांनी प्राकृत भाषा, ब्राह्मी, खरोष्टी या लिप्या वगैरेंचे संपूर्ण ज्ञान मिळवून भारताच्या इतिहासाचे संशोधन केले, आणि लुप्तप्राय झालेला इतिहासाची पुनर्मांडणी करून तो प्रकाशात आणला. भारतातील हस्तलिखित ग्रंथांचा शोध घेऊन त्यांना प्रकाशित करण्याचे काम तत्कालीन सरकारने भांडारकरांवर सोपवले. त्यांनी पाच जाडजूड ग्रंथ लिहून हे काम बर्याच प्रमाणात साध्य केले. पुरातत्त्वशास्त्राचा इतिहास अभ्यास करणारे संशोधक त्यांचे ग्रंथ आजही प्रमाण मानतात.
१८८३साली व्हिएन्नामध्ये भरलेल्या प्राच्यविद्या विद्वानांच्या परिषदेत हजर राहिलेल्या भांडारकरांच्या अभ्यासाचा आवाका पाहून तेथले सरकार तसेच जागतिक विद्वान अचंबित झाले आणि त्यांनी भांडारकरांना सी.आई.ई. (Companion of the Order of the Indian Empire) ही पदवी देऊन सन्मानित केले. त्या पहिल्या युरोपीय प्राच्यविद्या परिषदेत भांडारकरांनी नाशिकजवळील लेण्यांमधल्या शिलालेखांचा अर्थ विशद करून सांगितला. या घटनेमुळे युरोपात प्राच्यविद्या विशारद म्हणून त्यांच्या कार्याची महती पसरली आणि त्यांना डॉक्टर ऑफ लेटर्ससह अनेक मानद सन्मान मिळाले. भांडारकरांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नावाने पुण्यात इ.स. १९१७ मध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था स्थापन करून तिची सुरुवात केली गेली.
भांडारकरांनी लिहिलेले ग्रंथ
भारताचा पुरातत्त्व इतिहास- पाच खंड
दक्षिण भारताचा इतिहास (मुंबई निर्देशिकेसाठी (Bombay Gazetteers) लिहिलेला)
वायुपुराण या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद (अपूर्ण)
भवभूतीच्या "मालती माधव" वर टीका
संस्कृत व्याकरण भाग १ आणि २
महादेव गोविंद रानडे : भारतातील उदारमतवादी, समाजसुधारक, धर्मसुधारक, राजनीतितज्ञ, अर्थशास्त्रज्ञ होते. इ. स. १८६६ च्या जूनमध्ये त्यांची ओरिएंटल ट्रान्सलेटरच्या जागी सरकारने नेमणूक केली. येथे ते मराठी भाषेत जे ग्रंथ त्या वेळी प्रसिद्ध होत होते, त्यांच्यावर अभिप्राय लिहिण्याचे काम ते करीत.१८९३ साली रानड्यांना मुंबईच्या उच्च न्यायालयात न्यायमूर्तीं म्हणून नियुक्ती झाली. महादेवराव यांच्या काळात ‘लोकहितवादी’ देशमुख, विष्णुशास्त्री पंडित, जोतीराव फुले इ. समाजसुधारकांनी सुधारणेचे आंदोलन सुरू केले होते. त्यात रानडे सहभागी झाले. १८६२ मध्ये त्यांनी इंदुप्रकाश या वृत्तपत्राच्या इंग्रजी विभागात समाजसुधारणे संदर्भात अनेक लेख लिहिले. मूर्तिपूजा आणि कर्मकांड यांतून मुक्त होऊन उच्च धर्माकडे मनुष्याच्या विवेकबुद्धीचे आकर्षण वाढले पाहिजे म्हणून राजा राममोहन रॉय यांनी बंगालमध्ये स्थापलेल्या ब्राह्मो समाजाच्या धर्तीवर मुंबईत प्रार्थनासमाजाची स्थापना करण्यात महत्वाची भूमिका बजावली.
जन्म : १८ जानेवारी १८४२ (निफाड जिल्हा : नाशिक)
मृत्यू : १६ जानेवारी १९०१