- पहिल्यांदाच भारतानं
आपल्या सैन्याच्या तिन्ही दलांना रशियातील मॉस्कोमध्ये पार पडणाऱ्या वर्षिक
परेडमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत या परडेमध्ये केवळ लष्कराचा
सहभाग होता. परंतु 24 जून रोजी पार पडणाऱ्या या
परेडमध्ये लष्कर,हवाईदल आणि नौदलही सहभागी होणार आहे. - रशियानं या परेडसाठी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिलं होतं. परंतु करोना व्हायरसच्या
पार्श्वभूमीवर पंतप्रधान त्या परेडमध्ये सहभागी होण्याची शक्यता नसल्याचं म्हटलं
जात आहे. - परंतु भारतीय
सैन्याची तिन्ही दलांकडून आपल्या ताकदीचं प्रदर्शन केलं जाणार आहे. - रशियामध्ये दरवर्षी ९
मे रोजी विजय दिवसाच्या निमित्तानं या परेडचं आयोजन केलं जातं. परंतु करोनामुळे
यावेळी त्याचं आयोजन पुढे ढकलण्यात आलं. - १९४५ मध्ये नाझी
जर्मनीच्या शरणागती पत्करल्यानंतर हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
रशियाच्या विजयी दिनाच्या परेडमध्ये पहिल्यांदाच भारताच्या तिन्ही सैन्य दलांचा सहभाग
जून १५, २०२०
0
Tags: