ब्राम्हो समाज :

MPSC TECH
0

 

Bramho Samaj

 

ब्राम्हो समाज :

ख्रिस्ती मिशनर्‍यांना भारतात शिक्षणाचा आणि धर्माचा प्रचार करण्याची परवानगी भेटल्या नंतर मिशनर्‍यांनी हिंदू धर्मावर प्रखर हल्ले केले आणि ख्रिचन धर्म कसा श्रेष्ठ आहे हे भारतीय लोकांच्या मनावर बिंबवू लागले त्यामुळे साहजिकच अनेक भारतीय ख्रिचन धर्माचा स्वीकार करू लागले . तेव्हा हिंदू धर्म व संस्कृती यांचे संरक्षण करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या बुरसटलेल्या धर्मकल्पना हिंदूंनी फेकून दिल्या पाहिजेत असे रॉय यांना वाटत होते.

हिंदू धर्माची मूळ बैठक वेदांताच्या तत्वज्ञानावर आहे हे राजा राम मोहनरॉय यांना चांगले माहित होते यामुळे त्यांनी रॉय यांनी वैदिक विचारसरणीचा पुरस्कार केला. वेदांत सूत्रावरील शांकर भाष्याचे बंगाली भाषेत त्यांनी रुपांतर केले. अनेक उपनिषदांचे बंगाली भाषेत त्यांनी रुपांतर केले. वेदांत सार नावाचा ग्रंथ लिहून वेदांचे तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. केवळ ग्रंथ लिहून व वृत्तपेतातून लेखन करुन धार्मिक व सामाजिक सुधारणा होणार नाहीत याची त्यांना जाणीव होती. म्हणून त्यांनी 1828 मध्ये ब्राम्होसमाज स्थापन केला. तेव्हा ब्राम्हो समाजाला असंख्य अनुयायी मिळाले. या समाजाचा प्रसार बंगाल बाहेर इतर प्रांतातही झाला होता.

उद्दिष्टे:

भारतीय लोकांना खऱ्या धर्माच्या तत्त्वाची ओळख करुन देणे.

समाजातील अनिष्ट रुढी, प्रथा, परंपरा, चालीरीती  संपूष्टात आणणे.

ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून होत असलेल्या हिंदू धर्मावरील टीकेला तसेच धर्मांतरास विरोध करणे आणि त्यांना हिंदू धर्माचे महत्व पटवून देणे

हिंदू धर्मात आणि समाजात वैचारिक व सामाजिक सुधारणा घडवून आणणे.

ब्राह्मो समाजाचे तत्त्वज्ञान

एकेश्वरवाद : ईश्वराच्या उपासनेसाठी कोणत्याही कर्मकांडाची जरुरी नाही.  ईश्वर हा एकच असून तो निर्गुण, निराकार आहे. ईश्वर हा या  जगाचा निर्माता व स्वामी आहे. त्या निराकार अशा ईश्वराची उपासना करणे.  

मूर्तीपूजेस विरोध : ब्राम्हो समाजाने मूर्तीपूजेला विरोध केला. ईश्वराचे अस्तित्त्व मूर्तीत अथवा वस्तूत नसल्यामुळे मूर्तीपूजा करू नये.

बंधुत्त्वाची भावना : ईश्वर हा आपणा सर्वांचा पिता आहे. म्हणून आपण सर्वजण एकमेकांचे बंधू आहोत.

अवतारवादास विरोध : अवतारवादाची कल्पना भ्रामक व चुकीची आहे. ईश्वर हा निराकार असल्यामुळे तो साकार होऊ शकत नाही. यावर ब्राम्हो समाजाच्या अनुयायांचा विश्वास होता.

आत्म्याचे अमरत्त्व : आत्मा हा अमर असतो तो आपल्या कृत्याबद्दल फक्त ईश्वरालाच जबाबदार असतो.

सर्व धर्मातील ऐक्य : नीतीमत्ता, सदाचार, मानवाबद्दलचे प्रेम, भूतदया यामुळे विविध धर्मात ऐक्य निर्माण होते.

विश्वबंधुत्त्वावर श्रद्धा : ब्राह्मो समाज सर्व धर्मातील तत्त्वज्ञानाचा आदर करतो. त्याची निंदा करत नाही. त्यामुळे विश्वबंधुत्वावर श्रद्धा आहे.

शिकवण :  धर्माचा खरा अर्थ प्रेम, परोपकार, सेवा असा आहे, हे गृहीत धरुन एकमेकांशी व्यवहार करावेत.

राजा राम मोहनरॉय यांच्या नंतर चा ब्राम्हो समाज : राजा राम मोहनरॉय यांच्या मृत्यू नंतर १८३८ ला देवेंद्रनाथ टागोर यांनी ब्राम्हो समाजात प्रवेश केला व राजा राममोहन रॉय यांच्यानंतर ब्राम्हो समाजाची धुरा देवेंद्रनाथ टागोर यांनी संभाळली. यानंतर  केशवचंद्र सेन यांनी १८५७ मध्ये सदस्यत्व पत्करले. परंतु या देवेंद्रनाथ टागोर व केशवचंद्र सेन दोघांच्यात वैचारिक मतभेद होते. त्या मुळे ब्राम्हो समाज दोन गटात विभागला गेला देवेंद्रनाथ टागोर यांच्या नेतृत्वाखालील (आदी) ब्राम्हो समाज तर केशवचंद्र सेन यांच्या नेतृत्वाखालील (नूतन) ब्राम्हो समाज अशा दोन गटात ब्राम्हो समाज विभागला गेला.

आदि ब्राम्हो समाज :  देवेंद्रनाथ टागोर यांच्या नेतृत्वाखाली (आदी) ब्राम्हो समाजाचे कार्य चालू होते. यांचे कार्य मुख्यत्वे करुन धार्मिक सेवांपुरतेच मर्यादित होते. इ. स. १८३८ साली देवेंद्रनाथ टागोर यांनी तत्त्वबोंधिनी सभा स्थापन केली.

नूतन ब्राम्हो समाज / भारतीय ब्राह्मो समाज : केशवचंद्र सेन हे ब्राह्मो समाजातून इ. स. १८६६ मध्ये बाहेर पडले व त्यांनी नूतन ब्राम्हो समाज / भारतीय ब्राह्मो समाज स्थापन करुन समाज कार्य सुरू केले. धार्मिक कार्या सोबतच समाजसुधारने सारख्या व्यापक क्षेत्रातही आपले कार्य नूतन ब्राम्हो समाजाने चालू ठेवले सुलभ समाचारया सप्ताहिकद्वारे केशवचंद्र सेन यांनी आपल्या विचारांचा प्रसार केला. नूतन ब्राम्हो समाजाने, स्त्रियांनाही ब्राम्हो समाजात स्थान दिले. सोबतच स्त्रियांच्या शिक्षणासाठी विक्टोरिया इंस्टीट्यूटनॉर्मल स्कुलया संस्थांची स्थापना केली. तांत्रिकशिक्षणाची गरज लक्षात घेऊन त्यांनी तंत्रनिकेतनही संस्था हि सुरु केली. उत्तर प्रदेश, पंजाब, मद्रास या प्रांतात त्यांनी ब्राह्मो समाजाचा प्रसार केला.  सोबतच या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आंतरजातीय व विधवा विवाहाचा पुरस्कार केला. १८७२ साली मुलींच्या विवाहाची किमान वयोमर्यादा १४ वर्षे ठरविणारा दी नेटिव्ह सिव्हिल मॅरेज एक्टपास झाला.त्यामागे केशवचंद्र सेन यांचा मोलाचा वाटा होता. केशवचंद्र सेन यांच्या कार्यपद्धतीमुळे ब्राह्मो समाजास नवी दिशा मिळाली. पण कुचबिहाराच्या राजाशी १८७८ साली त्यांनी १४ वर्षे पूर्ण न झालेल्या आपल्या मुलीचा विवाह केला. त्यामुळे नूतन  ब्राम्हो समाजातील काही मंडळींचा त्यांच्या नेतृत्वावरील विश्वास उडाला आणि त्यातूनच पुढे साधारण ब्राम्हो समाजया वेगळ्या संस्थेची स्थापना झाली. ज्या मध्ये शिवनाथ शास्त्री, आनंद मोहन बोस, शिवचंद्र दत्त, उमेशचंद्र दत्त यासारखे जहाल तरुण सहभागी होते. या दुहीमुळे ब्राम्हो समाजाचा प्रभाव कमी होऊन त्यांचे कार्य मंदावले

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)