राजा राममोहन रॉय : आधुनिक भारताचा जनक, मानवतावादी समाजसुधारक, विधवा विवाहाचा पुरस्कता, 19 व्या शतकातील सुधारणा चळवळीचे जनक आणि प्रबोधनाचे अग्रदूत म्हणून असलेले राजा राममोहन रॉय यांना ओळखले जाते
जन्म : 22 मे 1772, राधानगर (बंगाल)
रॉय ही उपाधी : रॉय यांचे पंजोबा कृष्णचंद्र बॅनर्जी हे बंगालच्या नावबाच्या सेनेत होते व त्यांना 'रॉय' ह्या उपाधिने सन्मानित करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्या कुटुंबाने 'बॅनर्जी' या परंपरागत आडनावाऐवजी सन्मानित करण्यात आलेले 'रॉय' हे पदनाम वापरण्यास सुरुवात केली.
राजा ही पदवी : दुसऱ्या अकबरशहाने राजा राममोहन रॉय यांना 'राजा' ही पदवी दिली.
शिक्षण : विद्यार्थीदशेत असताना इंग्रजी संस्कृत, अरबी, आणि फार्सी, या भाषा चा त्यांनी सखोल अभ्यास केला. बनारस येथे राहून त्यांनी संस्कृत वाङमय कायदा व तत्वज्ञान आणि वेद व उपनिषदे यांचा अभ्यास केला. त्यानंतर राजा राममोहन रॉय यांनी वडिलांशी झालेल्या मतभेदावरून घर सोडले व तिबेट येथे जाऊन बौद्ध धर्माचा अभ्यास केला.
नोकरी : 1805 मध्ये राजा राममोहन रॉय यांनी ईस्ट इंडिया कंपनीत महसूल अधिकारी, जॉन दिग्बी यांचे सहाय्यक म्हणून काम केले त्यानंतर पुढे दिवाण म्हणून त्यांना बढती मिळाली.
लेखन व प्रकाशन :
1809 : 'एकेश्वरवाद्यांनी देणगी' ( The Gift Of Monotheists ) या नावाने पार्शियन भाषेतील पुस्तक लिहीले.
1815 : 'वंगाल गॅझेट' ( Vangal Gazette ) या साप्ताहिकाचे प्रकाशन (आत्मीय सभेच्या माध्यमातून) केले.
1820 : मध्ये 'द प्रिसप्टस ऑफ जिझस' , द गाईड टू पीस अँड हॅपीनेस' हे ग्रंथ प्रकाशित केली.
1821 : 'संवाद कौमुदी' हे बंगाली भाषेतील पाक्षिक सुरू केले.
1822 : मध्ये 'मिरात-उल्-अखबार' हे पार्शियन भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले.
भाषांतर : 'वज्रसूची' या संस्कृत ग्रंथाचे बंगाली मध्ये भाषांतर केले.
संस्था ची स्थापना :
1815 : कोलकाता येथे 'आत्मीय सभेची' स्थापना केली. आत्मीय सभा म्हणजे 'मित्रांचा समाज' होय.
1817 : ईस्ट इंडिया कंपनीच्या मदतीने कोलकाता येथे पहिले 'पब्लिक स्कूल' सुरू केले.
1817 : कोलकता येथे डेव्हिड हेअर यांच्या मदतीने 'हिंदू कॉलेजची' स्थापना केली.
1822 : अँग्लो हिंदू स्कुल' या नावाची शाळा सुरू केली, या शाळेद्वारे त्यांनी इंग्रजी शिक्षणाला प्राधान्य दिले.
1822 : 'ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशनची' स्थापना केली.
1825 : कोलकाता येथे 'वेदांत कॉलेज' ची स्थापना केली. (हिंदू एकेश्वरवादाच्या प्रसारासाठी)
1828 : कोलकाता येथे 20 ऑगस्ट 1828 रोजी 'ब्राम्हो समाज' ची स्थापना केली.
सती प्रथा बंदी : सतीची चाल बंद करण्याचा प्रयत्न रॉय यांनी केला. अर्थात हे काम सोपे नव्हते शतकानुशतकांचा धर्माचा पगडा समाजातील उच्चवर्णियांवर होता. स्वार्थी भटभिक्षुकांची समाजावर फार जबरदस्त पकड होती. पती निधनानंतर विधवा स्त्रीने स्वत:च्या मृत पतिसमवेत जाळून घेणे म्हणजे सती जाणे आणि हाच धर्म मानला जात होता. संवाद कौमुदी नावाच्या पाक्षिकातून त्यांनी सतीच्या अमानुष पध्दतीवर कडाडुन टिका केली. रॉयसारख्या लोकांचा पाठिंबा असल्यामुळे बेंटिंकने 1829 साली सतीबंदीचा कायदा केला सतीच्या रुढीप्रमाणे बालविवाह, कन्याविक्रय आणि बहुपत्नित्वाची पध्दती समाजासाठी लांच्छानास्पद असल्याचे मत रॉय यांनी मांडले होते.
निधन : 27 सप्टेंबर 1833, 'ब्रिस्र्टॉल' (इंग्लंड)