लॉर्ड कर्झन (1899 - 1905)
लॉर्ड कर्झन
म्हणजे भारतातील सर्वात वादग्रस्त व्हाइसरॉय....
1899 मध्ये भारतासाठी
चांदी ऐवजी सुवर्ण परिमाण लॉर्ड कर्झन याने अवलंबिले.
1901 मध्ये काश्मिर व
पंजाब यांचा काही भाग मिळुन वायव्य सरहद्द प्रांत निर्माण केला.
1901 मध्ये भारतीय
राजपुत्रांना उच्च शिक्षण देण्यासाठी लॉर्ड कर्झन याने Imperial Cadet
Core ची स्थापना केली.
23 जानेवारी 1901
रोजी महाराणी व्हिक्टोरीया हिचे निधन झाले. पुढे 1921 मध्ये महाराणी व्हिक्टोरिया हिच्या स्मरणार्थ कलकत्ता येथे व्हिक्टोरिया
हॉल बांधण्यात आला.
1902 मध्ये सर थॉमस
रॅले यांच्या अध्यक्षतेखाली 'युनिव्हर्सिटी कमिशन' नेमण्यात आले.
1902 मध्ये सर अँन्ड
फ्रेजर यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस खात्याची समिती नेमण्यात आली. यानुसारच criminal
investigation bureau ची सुरुवात झाली.
1902 रोजी कर्झनने
दुष्काळ निवारणासाठी 'मॅकडोनाल्ड दुष्काळ आयोग' स्थापन केला.
1903 मध्ये लॉर्ड कर्झन
याने दिल्ली येथे भव्य दरबार भरवुन राणीच्या वारसाला भारत सम्राट घोषित केले.
1903 मध्ये सर
ॲन्ड्र्यु फ्रेजर यांनी बंगालच्या फाळणीची योजना तयार केली.
1904 मध्ये पहिला
सहकारी कायदा पारित करण्यात आला.
1904 मध्ये प्राचीन
स्मारक संरक्षण कायदा पारीत केला.
लॉर्ड कर्झन
याने व्यापार व उद्योगधंदे खाते निर्माण केले.
1901 मध्ये बंगालमध्ये
पुसा येथे कृषी संशोधन संस्थेची स्थापना लॉर्ड कर्झन यांनी केली.
लॉर्ड
कर्झनच्या काळात DSP व Dysp यांची थेट नेमणूक सुरु झाली.
ब्रिटीश
शासनासोबत झालेल्या मतभेदांमुळे (कर्झन - किचनर विवाद) कर्झन 1905 मध्ये मायदेशी परतला.
कर्झन याने
रेल्वे कारभाराच्या चौकशी साठी सर रॉबर्टसन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली.
भारतात
रेल्वेचे विस्तृत जाळे पसरविण्याचे श्रेय कर्झन कडे जाते.
लॉर्ड कर्झन
याने टाटा इंस्टिट्युट ऑफ सायन्स, बेंगलोर येथील संशोधन कार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्थेला देणगी
दिली.
19 ऑगस्ट 1905 रोजी केसरी वृत्तपत्रामध्ये लिहिलेल्या आपल्या लेखात लोकमान्य टिळकांनी
कर्झनची कारकीर्द औरंगजेबाची प्रतिकृती होती असे म्हटले होते.
लोकमान्य टिळक
आणि नामदार गोखले यांनी लॉर्ड कर्झन याची तुलना औरंगाजेबाशी केली.
कृष्णाजी
प्रभाकर खाडीलकर लिखित 'किचकवध'
नाटकात किचक ची तुलना कर्झन सोबत केली गेली.
कर्झनची
कारकीर्द आपल्या दुष्कृत्यामुळे खुप गाजली. लंडन मध्ये मदनलाल धिंग्रा याने कर्झनला
मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
'व्हाइसरॉय पदाचा
राजीनामा दिल्यानंतर कलकत्त्याचा महापौर होण्यास मला
आवडेल' असे कर्झन म्हणत.