भारतीय अंतराळ संशोधन संस्था

MPSC TECH
0






Image result for isro







भारतीय
अंतराळ संशोधन संस्था


भारतीय अंतराळ संशोधन
संस्था ही भारत सरकारच्या आधिपत्याखालील अंतराळ संशोधन करणाऱ्या जगातील अशा
प्रकारच्या अग्रगण्य संशोधन संस्थांपैकी एक
, अशी मूलभूत
संस्था आहे. फार आधीपासून सुरू असलेल्या या संस्थेचे
, सन
१९६९मध्ये आधुनिकीकरण करण्यात आले. अनेक शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली
'इस्रो'ने (Indian Space Research
Organisation-(ISRO)चे लघु रूप), तिच्याकडे
असलेल्या प्रक्षेपण यानांच्या ताफ्याच्या साहाय्याने
, भारतातील
व विदेशांतील अनेकांसाठी प्रक्षेपणाचे बरेच कार्यक्रम पूर्ण केले. इस्रोपाशी
तिच्या स्वतःच्या अनेक उभारण्या आहेत. द्विपक्षीय आणि अनेकपक्षी करारांमुळे ती
संस्था जागतिक देशसमू्हांशी सहकार्य करत असते




पूर्वकाळ


ज्यांनी सन १९२०
मध्ये आयनोस्फिअर व रेडियो यांबाबत अनेक प्रयोग केले
, अशा कलकत्ता येथील शास्त्रज्ञ एस. के. मित्रा यांच्या कार्यापर्यंत,
सध्याच्या भारताच्या आधुनिक अंतराळ संशोधनाचा पूर्वेतिहास पोचतो.त्यानंतर
सी.व्ही. रमण व मेघनाद साह सारख्या अनेक भारतीय शास्त्रज्ञांनी अंतराळ संशोधनासाठी
लागणाऱ्या शास्त्रात भर घातली. सन १९४५ नंतरचा काळात अंतराळ संशोधनात भारताची बरीच
प्रगती झाली.सन १९४५ मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च च्या उभारणीत
ज्यांची महत्त्वाची भूमिका होती
, ते अहमदावाद येथील भौतिक
संशोधन प्रयोगशाळा सुरू करणारे विक्रम साराभाई व होमी भाभा
, या
दोघांचा भारताच्या एकत्रित अंतराळ संशोधनात मोलाचा वाटा आहे.अंतराळ संशोधनातील
प्राथमिक प्रयोगात
, वैश्विक किरण, अत्युच्च
पातळीवर व अवकाशात अनेक उपकरणांची तपासणी
, आणि जगात सर्वांत
खोल खाणींपैकी एक समजल्या जाणाऱ्या कोलार येथील खाणीत केलेले अनेक महत्त्वाचे
प्रयोग इत्यादींचा
, तसेच, पृथ्वीवरील
वातावरणाचा अभ्यास आदींचा समावेश होतो.हा अभ्यास संशोधन प्रयोगशाळेत
, अनेक विद्यापीठांत आणि वेगवेगळ्या स्वतंत्र जागेत केला गेला. सन १९५०मध्ये
जेव्हा भारत सरकारने अणुऊर्जा खात्याची स्थापना केली व होमी भाभा यांना त्याचे
सचिव म्हणून नेमले
, तेव्हा अंतराळ संशोधनात सरकारचा दृश्य
सहभाग दिसून आला .


भारतीय अणुऊर्जा
खात्याने अवकाश संशोधनासाठी पैसा पुरविणे सुरू केले. मुंबईत कुलाबा येथे सन १८२३
मध्ये वेधशाळा सुरू झाल्यापासून पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राबाबत भारतात प्रयोग
सुरू आहेत. त्यामुळे
, भूगर्भशास्त्राविषयी
महत्त्वाची माहिती मिळत गेली. उत्तर प्रदेश राज्यामधील हिमालयाच्या पायथ्याशी सन
१९५४ मध्ये एक वेधशाळाही स्थापन करण्यात आली.त्यानंतर
, हैदराबाद
येथे उस्मानिया विद्यापीठात रंगापूर वेधशाळाही स्थापन करण्यात आली.या दोन्ही
वेधशाळांस अमेरिकेचे तांत्रिक व शास्त्रीय पाठबळ मिळाले.भारताचे पंतप्रधान
जवाहरलाल नेहरूंनी अवकाश संशोधन कार्यक्रमास पुढे प्रोत्साहन दिले. सन १९५७ मध्ये
रशियाने स्फुटनिकचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण करून संपूर्ण जगास अवकाशात
प्रक्षेपणाचा मार्ग दाखवला.भारतीय राष्ट्रीय अवकाश संशोधन समितीची (
INCOSPAR)
सन १९६२ मध्ये स्थापना करण्यात येऊन विक्रम साराभाई यांना त्याचे
अध्यक्षपद देण्यात आले. सन १९६० मध्ये सुरुवात करून
,रशियासोबत
असलेल्या मैत्रीमुळे
, इस्रोस अंतराळ कार्यक्रम व भारतास
अणुऊर्जा कार्यक्रम राबविणे सोपे झाले. पोखरण येथे हसरा बुद्ध या सांकेतिक
नावाखाली
, दि. १८ मे १९७४ ला भारताने पहिला अणु स्फोट
केल्यानंतरही रशियाचे सहकार्य सुरूच होते.दि.२४ जानेवारी १९६६ रोजी होमी भाभा
यांचा विमान अपघातात झालेला मृत्यु हा भारताच्या अवकाश कार्यक्रमास बसलेला एक मोठा
धक्का होता. भाभांच्या मृत्यूनंतर
, साराभाई अणुऊर्जा कमिशनचे
अध्यक्ष व अणुऊर्जा खात्याचे सचिव झाले. त्यापूर्वीच
, सन
१९६०मध्ये
, अवकाश विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र आणि प्रायोगिक
उपग्रह दळणवळण भूस्थानकाचा श्रीहरीकोटा तळ
, तसेच भारतीय
उपग्रह मालिका प्रकल्प यांची तयारी झालेली होती. सन १९६९ मध्ये
, विक्रम साराभाई भारतीय अंतराळ संशोधन संस्थेस आधुनिक रूप मिळाल्यानंतर ही
संस्था भारतातील सर्व अवकाश कार्यक्रमांचे नियंत्रण करू लागली.


ध्येय
व उद्दिष्टे


अवकाश तंत्रज्ञानाचा
विकास करणे व त्याचा उपयोग विविध राष्ट्रीय कार्यात करणे हा इस्रोचा मूळ उद्देश
होता. त्यापूर्वी भारतीय अंतराळ विकास कार्यक्रम डॉ.विक्रम साराभाई करतच होते.
म्हणून त्यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक समजले जाते.


ते लिहितात ----


 काहीजण
आम्हांला विकसनशील राष्ट्रांमध्ये अंतराळ कार्यक्रमाच्या समर्पकतेबद्दल प्रश्न
करतात. या कार्यक्रमाच्या हेतूबद्दल आमच्या मनांत कसलाच संभ्रम नाही. आम्हाला
आर्थिक दृष्ट्या प्रगत राष्ट्रांशी
, चंद्राच्या शोधाबद्दल,
ग्रह वा मानवासहित अवकाश उड्डाणाबद्दल चढाओढ करण्यामध्ये काहीच
स्वारस्य नाही. आमच्या देशात तसेच इतर राष्ट्रांच्या समूहात जर आम्हास अर्थपूर्ण
भूमिका पार पाडायची असेल तर
, त्यासाठी आम्ही मानवाचे व
समाजाचे खरेखुरे प्रश्न सोडविण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात सदैव
अग्रभागी राहू.


डॉ.ए.पी.जे.
अब्दुल कलाम यांनी म्हटल्याप्रमाणे----


अनेक संकुचित
दृष्टीच्या लोकांनी हा प्रश्न उपस्थित केला की
, नुकत्याच
स्वतंत्र झालेल्या व ज्यास आपल्या लोकसंख्येला अन्न खाऊ घालणेही कठीण
, अशा देशाने अवकाश कार्यक्रम राबविण्याची समर्पकता ती काय ?.... विक्रम साराभाईंची दृष्टी स्वच्छ होती. भारतीयांच्या जीवनातील खऱ्याखुऱ्या
प्रश्नांबरोबरच तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासही आपण प्रथम क्रमांकावरच असायला हवे.
अवकाश संशोधनास आपल्या सामर्थ्य प्रदर्शनाचे माध्यम म्हणून वापरण्याचा त्यांचा
हेतू नव्हता.         


भारताच्या आर्थिक
प्रगतीने त्यांचा अंतराळ कार्यक्रम ठळकपणे व प्रामुख्याने दिसू लागला. अंतराळ
तंत्रज्ञानात जास्तीत जास्त स्वयंपूर्णतेची या देशाची भूमिका राहिली. न्यूजवीक या
प्रसिद्ध दैनिकाचे लेखक हेनॉक (
Hennock) यांच्या मते,
भारत त्याच्या अंतराळ शोधास त्यांच्या राष्ट्रीय मानबिंदूशी जोडते.
पुढे ते म्हणतात
, 'या वर्षी भारताने एकूण ११ कृत्रिम उपग्रह
प्रक्षेपित केले. त्यांतील ९ हे इतर देशांचे होते. २० उपग्रह एकाच अग्‍निबाणाने
प्रक्षेपित करणारा भारत हा पहिला देश आहे."


प्रक्षेपण
यानांचा ताफा


१९६० व १९७० च्या
दशकात जागतिक राजकारण व आर्थिक बाबींच्या धाकाखाली
, भारतास
स्वतःचा प्रक्षेपण यान कार्यक्रम राबविणे भाग पडले.प्रथम स्तरात
,(१९६०-१९७० चे दशकात) भारताने आपला दणदणीत अग्‍निबाण विकास कार्यक्रम पूर्ण
केला.१९८० च्या दशकात
, उपग्रह प्रक्षेपण यान-३ बनवले,
आणि अतिप्रगत अशा Augmented Satellite Launch Vehicle (ASLV)चा वापर करून इस्रोने आपली संपूर्ण कार्यक्षमता, धृवीय
उपग्रह प्रक्षेपण व भूस्थिर उपग्रह यान बनविण्यावर केंद्रित केली.


उपग्रह प्रक्षेपण यान


भारतीय उपग्रह प्रक्षेपण यानाचे काम १९७० मध्य इस्रोने सुरू
केले. ह्या कामाचे प्रोजेक्ट लीडर डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम होते. उपग्रह
प्रक्षेपण यानाने ४०० किलोमीटरची उंची गाठावी असा ह्या कामाचा मुख्य उद्देश होता.
उपग्रह प्रक्षेपण यान हे चार स्तरांचा
 अग्निबाण आहे व ह्याच्या प्रत्येक
स्तरात अग्निबाण सॉलिड प्रोपेलंट मोटारी वापरल्या जातात.
 यातील प्रथम प्रक्षेपण सन १९७९ मध्ये झाले त्यानंतर प्रत्येक साली
प्रत्येकी २


संवर्धित उपग्रह प्रक्षेपण यान


संवर्धित (ऑगमेंटेड) उपग्रह प्रक्षेपण यान,(ASLV) हा ५ टप्प्यांचा सॉलिड
प्रॉपेल्ंट अग्निबाणहोता.त्याची क्षमता १५० किलोचा उपग्रह अवकाशात नेंण्याची
होती.भूस्थिर कक्षेत तेवढ्या वजनाचा उपग्रह नेउन प्रस्थापित करण्यासाठी
, इस्रोने सन १९८० साली, त्यासाठी आवश्यक असे
तंत्रज्ञान विकसित करण्याचा तो प्रकल्प सुरू केला.त्याचे आरेखन उपग्रह प्रक्षेपण
यानावर अवलंबून होते.
[१६]याची प्रथम प्रक्षेपण चाचणी सन १९८७ मध्ये घेतल्या
गेली
, त्यानंतरच्या तीन १९८८,१९९२ आणि सन १९९४ मध्ये.त्याचे अकार्यान्वयनापूर्वी, २ चाचण्या यशस्वी राहिल्या.


धृवीय उपग्रह प्रक्षेपण यान



धृवीय उपग्रह प्रक्षेपण यान असे
याचे संक्षिप्त नाव असून इस्रोच्या कामगिरीतला हा मानाचा तुरा आहे. केवळ भारतीयच
नव्हे तर इतरही देशांचे उपग्रह अवकाशात पाठवून परकीय चलन मिळवण्यात आणि अवकाश
स्पर्धेत भारताला आघाडीत आणण्यात याचा महत्त्वाचा वाटा आहे. या प्रक्षेपकाची उंची
४४ मीटर तर
, वजन २३० टन आहे. २००८ मध्ये "इस्रो'ने याचा वापर करून एकाचवेळेस दहा उपग्रह प्रक्षेपित करून विश्‍वविक्रमाची
नोंद केली होती. हे वाहन संपूर्ण स्वदेशी बनावटीचे असून इस्रोने बनवले आहे.
पी.एस.एल.व्ही. हे भूस्थिर कक्षेत उपग्रह नेऊ शकते. आतापर्यंत १९ भारतीय तर २२
विदेशी असे ४१ उपग्रह इस्रोने अवकाशात यशस्वीरीत्या पाठवले आहेत.
 पी.एस.एल.व्ही. च्या एका उड्डाणाचा खर्च साधारण १.७ कोटी अमेरिकन डॉलर
इतका असतो.


पीएसएलव्ही प्रक्षेपणांचा
दशकांनुसार तपशिल:
































दशक


यशस्वी


काही प्रमाणात यशस्वी


अयशस्वी


एकूण


१९९०










२०००


११






११


२०१०


२२






२२



भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान



भूस्थिर
उपग्रह प्रक्षेपण यान
 ही भारताने त्याच्या इन्सॅट
उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी विकसित केलेली व त्यास भूस्थिर करण्याची एक प्रणाली
आहे.त्याद्वारे विदेशी अग्नीबाणावर भारताला विसंबून राहता येण्याची गरज नाही.सध्या
ते इस्रोचे सर्वात मोठे उपग्रह प्रक्षेपण यान आहे.त्याद्वारे सुमारे ५ टनाचा
उपग्रह पृथ्वीच्या निम्न-कक्षेत स्थापित करण्याची त्याची क्षमता आहे.


भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान-३



भूस्थिर
उपग्रह प्रक्षेपण यान
-३ हे विकसनशील असलेले भारताचे एक
प्रक्षेपक यान आहे.त्याद्वारे
, भूस्थिर कक्षेत जास्त वजनाचे
उपग्रह नेण्याचे त्याचे उद्दीष्ट आहे.त्यायोगे
, जास्त वजनाचे
उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी भारताला विदेशावर कमी अवलंबून रहावे लागेल.हे
प्रक्षेपण यान (
GSLV) पेक्षा प्रगत तंत्रज्ञानाचे असून,
त्यापूर्वीच्या प्रक्षेपणयानाची ती सुधारित आवृत्ती नाही


भू-निरीक्षण व दळणवळण
उपग्रह


भारताचा प्रथम कृत्रिम उपग्रह आर्यभट्ट, याचे सन १९७५ मध्ये सोव्हियेट रशियामधून प्रक्षेपण केले गेले. त्यानंतरही रोहिणी मालिकेतले प्रायोगिक उपग्रहही तयार करून तसेच प्रक्षेपित केले गेले. सध्या
इस्रोपाशी अनेक भूपाहणी उपग्रह आहेत.


इन्सॅट उपग्रहमालिका



भारतीय
राष्ट्रीय उपग्रह (
Indian Setellite) याचे लघुरूप
इन्सॅट. ज्या उपग्रहांचा वापर दळणवळण
, उपग्रह प्रसारण,
हवामानशास्त्र, शोध व इतर कार्यांकरिता केला
जातो अशा
 
भूस्थिर कक्षा उपग्रहशृंखलेचा कार्यक्रम म्हणजे इन्सॅट मालिका. हा एक इस्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा
बहुउद्देशीय कार्यक्रम आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)