चंद्रयान १

MPSC TECH
0






Image result for chandrayaan 1






चंद्रयान


चांद्रयान १ हे भारतीय
अंतराळ संशोधन संस्थेच्या चंद्रयान या चांद्र मोहिमेचा पहिला टप्पा घेऊन जाणारे
अंतराळ यान आहे. चंद्रयान १ हे मानवरहित अंतरिक्षयान असून त्यामध्ये चंद्राला
प्रदक्षिणा मारणारा एक
, तसेच चंद्रावर आदळणारा एक असे दोन भाग आहेत.

ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाची प्रगत पिढी (पी.एस.एल.व्ही.सी११) या
प्रक्षेपकाद्वारे चंद्रयानाचे प्रक्षेपण ऑक्टोबर २२, इ.स.
२००८ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून झाले. नोव्हेंबर ८ रोजी
यानास यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत टाकण्यात आले.१४ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री
८ वाजून ६ मिनिटांनी यानाला जोडलेले चांद्र आघात शोधयान यशस्वीरित्या वेगळे
करण्यात आले. जवळपास २५ मिनिटांच्या प्रवासानंतर हा प्रोब चंद्राच्या दक्षिण
ध्रुवाजवळील
'शॅकलटन क्रेटर' येथे
आदळला. या घनाकृती प्रोबच्या चार बाजूवर भारताचा ध्वज चित्रित असल्यामुळे
प्रतिकात्मकरित्या भारतीय ध्वज चंद्रावर पोहोचला आहे व हे साध्य करणारा भारत हा
जगातील चौथा देश बनला आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)