सुदूर संवेदन उपग्रहांची मालिका

MPSC TECH
0




Image result for sudur samvedan






सुदूर संवेदन उपग्रहांची मालिका



भारताचा सुदूर
संवेदन उपग्रह ही पृथ्वीवरील ठिकाणाशी संपर्क करणाऱ्या उपग्रहांची मालिका आहे.
त्यांची बांधणी
, प्रक्षेपण व देखरेख इस्रोच करते.
ते देशास सुदूर संवेदन सेवा पुरवितात. ती
, जगातील देशाच्या
नागरिकांसाठी असलेली
, सर्वात मोठी सुदूर संवेदन उपग्रह
संरचना आहे. सर्व उपग्रह हे ध्रुवीय कक्षेत(सूर्याच्या अनुषंगाने स्थिर असलेले)
ठेवले जातात व त्यानुसार देशाच्या विकासासाठीच्या विविध कार्यक्रमांस आवश्यक
असलेला
, बराच महत्त्वाचा डाटा जसे, अभिक्षेत्रिय,
स्पेट्रल ई. रिझोल्युशन्स आदी उपलब्ध होतो.

ओशनसॅट मालिका


भारतीय सुदूर संवेदन उपग्रहाचा (इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट) भाग असणारी ओशनसॅट(ओशनसॅटेलाइट) मालिका
ही प्रामुख्याने समुद्राचा अभ्यास करण्यासाठी विकसीत करण्यात आली. २७ मे १९९९ रोजी
प्रक्षेपित झालेल्या
IRS P4 ला ओशनसॅट-१ म्हणून ओळखण्यात
येते. २३ सप्टेंबर २००९ रोजी
 
ओशनसॅट-२ प्रक्षेपित केला गेला.


इतर उपग्रह



जीसॅट मालिकेअंतर्गत भारताने
प्रयोगक्षम भूस्थिर उपग्रह प्रक्षेपित केले त्यांना जीसॅट असे नाव आहे.
 कल्पना-१ भारताचा हवामानशास्त्राविषयीचा प्रथम राखीव उपग्रह होता जो ध्रुवीय उपग्रह
प्रक्षेपण यानाद्वारे १२ सप्टेंबर २००२ला प्रक्षेपित केल्या गेला. त्याचे मूळ नाव
मेटसॅट-१ होते.फेब्रुवारी २००३ मध्ये
, त्याकाळचे
प्रधानमंत्री
 
अटल बिहारी वाजपेयी यांनीकल्पना चावला, मूळ भारतीय वंशाची असलेली
एक नासाची उपग्रहवीरांगना
, जिचे 
नासाच्या कोलंबिया अपघातात निधन
झाले
, तिच्या स्मृतिप्रित्यर्थ त्याचे नाव बदलून कल्पना-१
केले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)