मंगळ
स्वारी
इस्रोने
मंगळस्वारीच्याही मोहिमेची तयारी सुरू केली असून त्यासाठी रु. १० कोटी त्यांना सरकारद्वारे
प्राप्त झाले आहेत.सन २०१३ ते २०१५ दरम्यान ही संस्था त्याच्या प्रक्षेपणासाठी
संधी शोधत आहे. ही अवकाश संस्था, उपग्रहास कक्षेत ठेवण्यास,
त्यांचे भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान वापरेल त्यानंतर आयन थस्टर्स
तरल इंजिन किंवा आण्विय उर्जा वापरून त्याचे मंगळाकडे उड्डाण करेल. मंगळ मोहिमेचा
अभ्यास आधीच संपला आहे व ते अवकाश संशोधक वैज्ञानिक प्रस्ताव व वैज्ञानिक ध्येये
शोधण्याच्या प्रयत्नात आहेत.
मानव
अवकाशोड्डान कार्यक्रम
भारतीय अंतराळ संशोधन
संस्थेस,मानव अवकाशोड्डान कार्यक्रमासाठी रु. १२,४०० कोटीचे अंदाजपत्रक मंजूर झाले आहे.भारत अवकाश आयोग,जो हे अंदाजपत्रक मंजूर करतो,त्याचेनूसार,पहिले मानवरहित उड्डाण सन २०१३-१४ मध्ये होईल तर मानवासहित उड्डाण मोहिम
सन २०१४-२०१५ मध्ये. जर या कालात ती फलद्रूप झाली तर,भारत
असे करणारा जगातील रशिया, अमेरिका, व
चिन यांचे श्रेणीतील,स्वदेशी तंत्रज्ञान वापरून मानवासह
अवकाश मोहिम राबविणारा चौथा देश असेल.