
भारतीय संघाचा अष्टपैलू
खेळाडू इरफान पठाणने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
केली आहे.
Star Sports वाहिनीच्या
एका कार्यक्रमात इरफानने आपल्या 15 वर्षांच्या कारकिर्दीची
अखेर करत असल्याचं जाहीर केलं.
तर इरफानने आतापर्यंत
120 वन-डे, 29 कसोटी आणि 24 टी-20 सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे.
तसेच 2006
साली पाकिस्तान दौऱ्यात इरफान पठाणने कसोटी सामन्यात हॅटट्रीक
नोंदवत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडली. इरफानने सलमान बट, युनूस खान आणि मोहम्मद युसूफ या फलंदाजांना माघारी धाडलं होतं.
