तिहेरी तलाक पीडितांना मिळणार वर्षाला 6 हजार रुपये पेन्शन

MPSC TECH
0





उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने तिहेरी तलाक पीडित महिलांना या वर्षापासून पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार तिहेरी तलाक पीडित महिलांना वर्षाला सहा हजार रुपये पेन्शन देण्याची तरतूद करण्यात आली आहे.









तर यासंबंधीचा प्रस्ताव सरकारने तयार केला असून पुढील कॅबिनेटच्या बैठकीत मांडला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एफआयआर किंवा फॅमिली कोर्टातील खटल्याच्या आधारावर ही पेन्शन दिली जाणार आहे.









तसेच यासाठी सरकारने राज्यातील तिहेरी तलाक पीडित 5 हजार महिलांची नोंद घेतली आहे. पहिल्या टप्प्यात या पीडित महिलांसाठी पेन्शनची योजना लागू करण्यात येणार असल्याचे समजते.











टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)