गतीविषयक नियम

MPSC TECH
0




Image result for गतीचे नियम


गती
:


  • जेव्हा एखाद्या वस्तूची स्थिती
    सभोवतालच्या सापेक्ष बदलते
    , तेव्हा ती वस्तु गतिमान आहे असे म्हणतात.

  • आपण वस्तूला गतिमान स्थितीत आणू
    शकतो किंवा गतिमान वस्तूला थांबवू देखील शकतो.

  • गती आपोआप सुरू होत नाही अथवा
    थांबत नाही.



बल
:


  • स्थिर वस्तूला गतिमान करण्यासाठी
    किंवा गतिमान वस्तु थांबवण्यासाठी बल आवश्यक असते.

  • वस्तूची गती किंवा गतीची दिशा
    बदलण्यासाठी बलाचा उपयोग होतो.

  • बलामुळे वस्तूचा आकारही बदलू
    शकतो.

  • बलामुळे आपण वस्तूला आपण गतिमान
    करू शकतो किंवा गतिमान वस्तूला थांबवू शकतो.

  • बल ही दोन वस्तूंमधील आंतरक्रिया
    आहे.

  • वास्तविक बल दृश्यस्वरूपात नसते
    पण बलाचे परिणाम आपण पाहू शकतो.



संतुलित
बल :


  • जेव्हा एखाद्या वस्तूवर प्रयुक्त
    होणार्‍या दोन बलांचे परिणाम सारखे आणि दिशा विरुद्ध असतात
    , तेव्हा वस्तूवर प्रयुक्त होणारे एकूण बल
    शून्य असते.

  • दोन्ही बले संतुलित असतात
    त्यामुळे वस्तु स्थिर अवस्थेत राहते.

  • संतुलित बलामुळे वस्तूची स्थिर
    अवस्था किंवा गतिमान अवस्था यात बदल घडून येत नाही.



असंतुलित
बल :


  • असंतुलित बलामुळे वस्तूच्या
    वेगात बदल होतो किंवा गतीची दिशा बदलते.

  • वस्तूच्या गतीला त्वरणित
    करण्यासाठी असंतुलित बल आवश्यक असते.

  • जो पर्यंत वस्तूवर असंतुलित बल
    प्रयुक्त असते
    , तोपर्यंत तिचा
    वेग सतत बदलतो.



जडत्व :


  • वस्तूची स्थिर अथवा गतिमान
    अवस्थेतील बदलाला विरोध करण्याची प्रवृत्ती म्हणजे जडत्व होय.

  • जेव्हा एखाद्या स्थिर अवस्थेतील
    वस्तूवर कोणतेही बाह्यबल प्रयुक्त नसेल तर ती वस्तु स्थिर अवस्थेतच राहते.
    तसेच गतिमान वस्तु आहे त्याच वेगाने सतत गतिमान राहते.



जडत्वाचे
प्रकार :


1. विराम अवस्थेतील जडत्व :


वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती
विराम अवस्थेत बदल करू शकत नाही
, त्यास विराम अवस्थेतील
जडत्व असे म्हणतात.


उदा. बस अचानक सुरू होते तेव्हा प्रवाशांना
मागच्या दिशेला धक्का बसतो.


2. गतीचे जडत्व :


वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान
अवस्थेत बदल होवू शकत नाही त्यास गतीचे जडत्व म्हणतात.


उदा. चालत्या बसमधून उतरणारा प्रवासी पुढच्या
दिशेने पडतो.


3. दिशेचे जडत्व :


वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती
आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही यास दिशेचे जडत्व म्हणतात.


उदा. चाकूला धार करतांना धार लावण्याच्या
चाकांच्या स्पर्शरेषेवरून ठिणग्या उडताना दिसतात.


न्यूटनचे गतीविषयक नियम :


पहिला नियम :


जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित
बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरल रेषेतील एकसमान गतीमध्ये
सातत्य राहते
’. यालाच जडत्वाचा नियम
असे म्हणतात.


दूसरा नियम :


संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी
समाणूपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते
’.


प्रत्येक क्रिया बलास समान परिमानाचे एकाच
वेळी घडणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात
’.


उदा. जेव्हा बंदुकीतून गोळी मारली जाते तेव्हा
बंदूक गोळीवर बल प्रयुक्त करते आणि त्यामुळे गोळीला अधिक वेग प्राप्त होतो.





style="display:block"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="4356803321"
data-ad-format="auto"
data-full-width-responsive="true">

Tags:

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)