
विधानसभेची
रचना
170 व्या कलमात सांगितल्याप्रमाणे विधानसभेत
60 व जास्तीत जास्त 500 सभासद असतात.
राखीव
जागा
घटना कलम क्र. 332
मध्ये सांगितल्याप्रमाणे अनुसूचीत जाती जमातीसाठी महाराष्ट्रामध्ये राखीव जागा
ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचीत जातींसाठी 33 तर अनुसूचीत
जमातीसाठी 14 राखीव जागा आहेत.
निवडणूक : प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान
पद्धतीने सदस्यांची निवड केली जाते.
उमेदवारांची
पात्रता
तो भारताचा नागरिक असावा.
त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावी.
संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला
मान्य असाव्यात.
सदस्यांचा कार्यकाल : सदस्यांचा कार्यकाल पाच
वर्ष इतका असतो.
गणसंख्या : 1/10
अधिवेशन : दोन अधिवेशनामध्ये सहा
महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.
सभापती
व उपसभापती
विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका
सदस्याची सभापती तर दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.
सभापतीचे
कार्य आणि अधिकार
विधानसभेत मांडण्यात येणार्या प्रस्तावाला
संमती देणे.
विधानसभेत शांतता व सुव्यवस्था राखणे.
सभागृहात एखाद्या विषयावर समान मते पडल्यास
आपले निर्णायक मत देणे.
जनविधेयक आहे की नाही ते ठरविणे.