ग्रहीय विज्ञान व अवकाशविज्ञान
भारताचे अवकाशयुगाचा उदय सन १९६३ मध्ये थुंबा प्रक्षेपण
केंद्रावरून दोन टप्प्याचे अवकाशयान प्रक्षेपणाने झाला.या एक महायुग सुरुवात
करण्याच्या घटनेआधीही भारतीय वैज्ञानिकांनी अवकाश विज्ञानाच्या संशोधनाच्या
क्षेत्रात नोंद घेण्याजोगे योगदान दिले:वैश्विक किरणे व उच्च-उर्जेच्या
खगोलशास्त्रीय अध्ययनात, जमिनीवर
तसेच फुग्याद्वारे करण्यात येणाऱ्या परिक्षणात, जसे, न्यूट्रॉन/मेसन मॉनिटर्स कण-शोधक/गणकात इत्यादी आयनोस्फेरिक संशोधनात
जमिनीवरील रेडियो प्रसारण तंत्रज्ञान वापरून जसे:ionosonde,VLF/HF/VHF रेडियो
शोधाग्र,चुंबकत्वमिति स्थानकांची साखळी वापरुन
इत्यादी.जमिनीवरुन प्रकाशिकी तंत्रज्ञान वापरुन उच्च वातावरणिय संशोधन जसे, डॉबसन वर्णपटमापक वापरुन एकूण ओझोन मात्रा,वायू
प्रभादीप प्रकाशमापक इत्यादी.भारतीय अवकाशयात्री हे जमिनीवरील अनेक प्रकाशिकी व
रेडियो दुर्बिणी वापरुन अत्याधुनिक पद्धतीने महत्वाचे अन्वेषण करीत आहे.भारतीय
अवकाश कार्यक्रमाचे येण्याने,देशातील अवकाश विज्ञानाच्या
संशोधन क्षेत्रात, त्याचे ताबडतोब प्रायोगिक उपायोजन
करण्याचे दृष्टीने, स्वदेशी व स्वयंपूर्ण तंत्रज्ञानावर
व त्याचे विकासावर भर दिल्या गेला.
हैद्राबाद येथे इस्रो व टीआयएफ आर यांचे संयूक्त विद्यमाने असलेली
राष्ट्रीय वातयान सुविधा आहे.या सुविधेचा वापर खगोलशास्त्रीय उच्च उर्जा (क्ष व
गामा किरणे)high energy (i.e., x-
and gamma ray) astronomy आय आर खगोलशास्त्र, मध्य वातावरणीय अनुरेख घटक, middle atmospheric trace constituents
including CFCs & aerosols, ionisation, electric conductivity and electric
fields.
मूळ वातावरणात असलेल्या व वैश्विक किरणांच्या आंतरक्रियेद्वारे
उत्पादित दुय्यम कणांचा व क्ष-किरण व गामा किरण यांचा अभिवाह हा फारच कमी असतो. ही
कमी असलेली पृष्ठभूमी, ज्यांच्या
उपस्थितीत, कोणासही अत्यंत क्षीण असलेला संकेत एखाद्या
वैश्विक स्रोतातून पकडायचा असेल तर,भारतातून या कठिण
क्ष-किरणांची पाहणी करण्याचा मोठा फायदा आहे. दुसरा फायदा असा आहे कि, अनेक प्रखर स्रोत जसे, Cyg X-1,Crab Nebula,Scorpius X-1 व Galactic Centre स्रोत हे, त्यांच्या अनुकूल कलनामुळे, हैद्राबाद मधून
पाहता येऊ शकतात. हे सर्व लक्षात घेऊन, सन १९६७ मध्ये
एक क्ष- किरण खगोलशास्त्रिय गट TIFR मध्ये तयार
करण्यात आला व एक असे उपकरण तयार करण्याचे काम घेण्यात आले, ज्यात,कठिण क्ष किरणांच्या पाहणीसाठी दिशानिर्धारण
करता येण्याजोगा टेलिस्कोप असेल. याद्वारे, २८ एप्रिल
१९६८ ला या नविन उपकरणासह, बलूनचे उड्डाण घेण्यात आले.
यात Scorpius X-1च्या पाहण्या यशस्वीरित्या करण्यात
आल्या. यानंतर, सन १९७४ पर्यंत उपर्निर्दिष्ट विविध
किरणांच्य्६आ पाहण्याही करण्यात आल्या.अनेक खभौतिकीय निकाल या पाहणीतून प्राप्त
करण्यात आले. इस्रोची या क्षेत्रातील सर्वात महत्त्वाची उपलब्धी ही, उच्च वातावरणीय कक्षेत, समतापमंडलात, सुमारे २० ते ४० कि.मी दरम्यान, तीन प्रकारच्या
जिवाणूंचे अस्तित्वाचा शोध होय. असे हे जीवाणू, जे
अति-नील किरणांना प्रतिरोध करतात, पृथ्वीवर कुठेही
सापडत नाहीत. त्याने अशी अटकळ बांधता येते कि ते मूळचे पृथ्वीबाह्य(अति-भौतिक) जीव
असू शकतात. यापूर्वी समतापमंडल हे अतिनील किरणांच्या प्रारणांमुळे, रहिवासयोग्य नसल्याचे समजल्या जात होते. त्या तीन जीवाणूंचे नामाभिधान, त्यांचे शोधात असलेल्या इस्रोच्या योगदानामुळे, Bacillus
isronensis, आर्यभट्ट या भारताच्या पुरातन खगोलशास्त्रज्ञावरुन Bacillus
aryabhata व Fred Hoyle या
खभौतिकशास्त्रज्ञावरुन,Janibacter Hoylei , असे केल्या
गेले.
क्षेत्रीय उभारण्या
संशोधन सुविधा
सुविधा | स्थळ | विवरण |
सौर-ग्रहीय भौतिकशास्त्र अवरक्त खगोलशास्त्र, भू-वैश्विक भौतिकशास्त्र, प्लाजमा भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र ,पुरातत्व शास्त्र आणि जल् विज्ञान या शाखांचा अभ्यास या संस्थेमध्ये करता येतो उदयपूर येथील एक वेधशाळा देखील या संस्थेच्या नियंत्रणाखाली येते. | ||
अर्ध-वाहक तंत्रज्ञानाशी संबंधित संशोधन व विकास, अर्ध-वाहक प्रक्रियेशी संबंधीत असणारी सुक्ष्म विद्युत-यांत्रिकी प्रणाली व प्रक्रिया तंत्रज्ञान. | ||
राष्ट्रीय वातावरण संशोधन प्रयोगशाळा | राष्ट्रीय वातावरण संशोधन प्रयोगशाळा येथे वातावरण आणि अंतरिक्ष विज्ञान मधील मूलभूत आणि उपयोजित संशोधन चालते. | |
रामन संशोधन संस्था येथे भौतिकशास्त्र मधील निवडक भागात संशोधन केले जाते जसे कि खगोल आणि खगोलशास्त्र. | ||
एसएसी हे अवकाश तंत्रज्ञान याचेशी संबंधित असणाऱ्या व त्याचे प्रयोगशील वापराच्या विविध पैलूंवर काम करते. स्पेस ऍप्लिकेशन सेंटर येथे संशोधनाचे क्षेत्र आहे:भूपृष्ठमितीय सर्वेक्षण उपग्रह आधारीत दूरसंचार, सर्वेक्षण, सुदूर संवेदन, हवामानशास्त्र, पर्यावरण नियंत्रण इत्यादी. या व्यतिरिक्त एसएसी हे दिल्ली भू-स्थानकाचेही चालन करते. |
चाचणी सुविधा
सुविधा | स्थळ | वर्णन |
लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्र हे लिक्विड प्रोपल्शन नियंत्रण पॅकेजेस हाताळते व प्रक्षेपण यान व उपग्रहांसाठी आवश्यक असणारे इंजिनांचा विकास करण्यात सहाय्य करते. महेंद्रगिरी येथे याची चाचणी मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते.लिप्रोसिके हे उच्च दर्जाचे ट्रांसपाँडरही बनविते. |
बांधणी व प्रक्षेपण सुविधा
सुविधा | स्थळ | वर्णन |
उपग्रह तंत्रज्ञानाधारीत ८ यशस्वी प्रकल्प हे इस्रोचे उपग्रह तंत्रज्ञानाचा पायवा आहेत. हे भारतात अवकाशयान मोहिमांसाठी असलेले एक मुख्य स्थान आहे. आर्यभट्ट, भास्कर ॲपल व आयआरएस-१ए या ठिकाणी निर्मिल्या गेलेत.आयआरएस व इन्सॅट मालिकेतील उपग्रह सध्या येथे निर्माणाधीन आहेत. | ||
बहुविध उप-स्थाने असलेले श्रीहरीकोटा बेट हे भारतीय उपग्रहांचे प्रक्षेपण केंद्र म्हणून काम करते. हे स्थान भारताच्या रॉकेट्सच्या प्रक्षेपणाचा तळही आहे.हे केंद्र भारताच्या सर्वात मोठ्या सॉलिड प्रोपेलंट स्पेस बूस्टर प्लँटचे गृहही आहे. यात स्थिरत्व चाचणी व मुल्यांकन संकुलही आहे. | ||
हा भारतातील इस्रोचा सर्वात मोठा तळ आहे व मुख्य तंत्रज्ञान केंद्रही आहे.तसेच, एसएलव्ही-३, एएसएलव्ही व पीएसएलव्ही या मालिकेतील यानांचा विकासही या ठिकाणी होतो.हा तळ थुंबा इक्वेटोरीयल रॉकेट लॉन्चिंग स्टेशनच्या कामात,तसेच रोहिणी रॉकेटच्या मोहिमेतही सहाय्यीभूत ठरतो.येथे जीएसएलव्ही मालिकेच्या यानांवर देखील काम सुरु आहे. | ||
तुंबा इक्वेटोरीयल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन चा उपयोग रॉकेट पाठवण्याकरिता केला जातो. |
मागोवा व नियंत्रण सुविधा
सोय | स्थान | वर्णन |
इंडियन डिप स्पेस नेटवर्क (IDSN) | या जालाद्वारे(नेटवर्क) अवकाशयानाच्या सुस्थितीची माहिती व भारवहन याबाबतच्या माहिती प्राप्त करण्यात येते,त्यावर प्रक्रिया करण्यात येते,तसेच त्याचे पुराभिलेखन व वितरणही करण्यात येते. हे सत्कालात(तत्क्षणी)(रियल टाईम) करण्यात येते. ते उपग्रहांचा बऱ्याच दूरवर मागोवा घेऊ शकते व त्याचे नियंत्रणही करु शकते,अगदी, चंद्रापल्याडही. | |
एनआरएसए हे नैसर्गिक स्रोतांचे व्यवस्थापन करु शकते तसेच हवाई सर्वेक्षणाच्याद्वारे अभ्यासास उपयोगी आहे. बालानगर व शादनगर (मेहबुबनगर जिल्हा) येथील केंद्रांव्यतिरिक्त, त्याचे देहरादून येथे प्रशिक्षण केंद्रही आहे. तेथील संस्थेचे नाव भारतीय सुदूर संवेदन संस्था आहे. | ||
संचेतन विकास, भू-मोहिमा, ट्रॅकिंग टेलीमेट्री व नियंत्रण व सहाय्य आदी या संस्थेतर्फे केल्या जाते.[३४] भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे टेलीमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क याची मागोवा घेणारी केंद्रे देशभर व जगातील पोर्ट लुईसमॉरिशस रशिया [इंडोनेशिया व ब्रुनेई इत्यादी ठिकाणी आहेत. | ||
भूस्थिर उपग्रहाची कक्षा वाढविणे, भारमापन चाचणी व कक्षेदरम्यानचे चालन येथे केल्या जाते.उपग्रहाच्या नियंत्रणासाठी याची भू-स्थानके व उपग्रह नियंत्रण केंद्रे आहेत. यासमानच सोय असलेले ठिकाण भोपाळ येथे तयार करण्यात येत आहे. |
मानव संसाधन विकास
सुविधा | स्थान | वर्णन |
ही संस्था, विमानन तंत्रज्ञान व अंतरिक्षयान याबाबत स्नातक व स्नातकोत्तर शिक्षण पुरविते. | ||
आयआयए ही खगोलशास्त्र, खगोलभौतिकी व त्यासंबंधीच्या भौतिकशास्त्राबाबत संशोधन करणारी प्राथमिक संस्था आहे. | ||
विकास व शैक्षणिक दळणवळण एकक | हे केंद्र इन्सॅट कार्यक्रमाचे संलग्नतेने शिक्षण,संशोधन व प्रशिक्षण यासाठी काम करते.DECU मध्ये करण्यात येणारे मुख्य क्रियाकलापात ग्रामसॅट व एज्यूसॅट प्रकल्प अंतर्भूत आहेत. ट्रेनिंग व डेव्हलपमेंट कम्यूनिकेशन चॅनेल याचे चालन व नियंत्रण DECUच्या अंतर्गत येते. |
वाणिज्यिक शाखा
सुविधा | स्थळ | वर्णन |
बंगलोर | ही सरकारचे नियंत्रणात असलेली विपणन एजन्सी असून ती इस्रोचे हार्डवेअर, मनुष्यबळ, व संचेतनाबद्दल व्यवसाय करते. |
इतर सुविधा आहेत:
बालासोर अग्निबाणप्रक्षेपण स्थानक – ओडिशा
INSAT Master Control Facility (IMCF) – भोपाळ
ISRO Inertial Systems Unit (IISU) – तिरुवनंतपुरम
Indian Regional Navigational Satellite System (IRNSS)
Aerospace Command of India (ACI)
Indian National Committee for Space Research (INCOSPAR)
Inter University Centre for Astronomy and Astrophysics (IUCAA)
Indian Department of Space (IDS)
इंडियन स्पेस सायंस डाटा सेंटर (ISSDC)
स्पेसक्रॅफ्ट कंट्रोल सेंटर (SCC)
क्षेत्रिय सुदूर संवेदन सेवा केंद्रे(RRSSC)
विकास व शैक्षणिक दळणवळण केंद्र (DECU)
भविष्याचा
वेध
इस्रोची योजना नजिकच्या भविष्यकाळात नव-युगाचे पृथ्वी पाहणी उपग्रह
प्रक्षेपित करायची आहे. ती संस्था नविन प्रकारच्या प्रक्षेपण यानांच्या व
अवकाशयानांच्या विकासाचे कामही हाती घेईल. इस्रोने नमूद केले आहे कि ती संस्था
मंगळावर व पृथ्वीजवळील वस्तूंवर मानवविरहित मोहिमा आखेल.
