नवी
दिल्लीमध्ये उभी राहणार नवी संसद
नवी
दिल्लीमध्ये उभी राहणार नवी संसद
भारतीय संसदेची नवीन
इमारत अनेक अर्थांने खास असणार आहे.
नवीन इमारतीचा आकार
त्रिकोणी असणार आहे.
या इमारतीला तीन मोठे
मिनार असणार आहेत. इतकचं नाही नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार या इमारतीच्या
तळाशी सर्व मंत्रालयाच्या कार्यालयांना जोडणारी शटल सेवाही असणार आहे.
याशिवाय
पंतप्रधानांसाठी नवीन निवासस्थान बंधण्याचीही तयार करण्यात येत आहे.
पंतप्रधानांच्या
नव्या निवासस्थान दिल्लीतील महत्वाच्या परिसरात म्हणजेच सेंट्रल व्हिस्टा मध्ये
असणार असून हे घर बांधण्याचे कंत्राट एका गुजराती कंपनीला मिळाले आहे.
नव्या योजनेनुसार
राष्ट्रपती भवनानंतर पंतप्रधानांचे निवासस्थान असेल.
त्यानंतर
उप-राष्ट्रपतींचे निवासस्थान असेल.
नवीन संसद भवन हे
अत्याधुनिक असेल अशीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नवीन संसदेच्या
इमारतीमध्ये तीन मीनार असतील. हे तीन मिनार लोकशाहीच्या तीन स्तंभांचे प्रतिक
असतील.
नवीन संसद भवनाची
रचना भारताची विविधता दाखवणारी असेल.
ससद भवनाच्या खिडक्या
या भारतामधील विविधता दाखवतील असं या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
ससदेचे ७५ वे अधिवेशन
नवीन इमारतीमध्ये आयोजित करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाचे काम करण्यात येणार
आहे.
नवीन संसदेची इमारत
ही सध्याच्या संसदेच्या जवळच असेल. यामध्ये ९०० ते एक हजार लोकप्रतिनिधींची
आसनक्षमता असणारी लोकसभा, राज्यसभा आणि सेंट्रल
हॉलप्रमाणे संयुक्त सभागृह असेल.
या इमारतीमध्ये सर्व
खासदारांची कार्यालयेही असतील.

न