आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ भारतीय वकील हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून नियुक्ती

MPSC TECH
0













ब्रिटनच्या न्यायमंत्रालयाने नव्या
नियुक्त्या संदर्भातील यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये मराठमोळे हरीश साळवे
यांच्या नावाचा समावेश आहे.


हरीश साळवे ब्रीटनच्या महाराणीसाठी
कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठीचे
'क्वीन काऊंसिल' म्हणून
काम पाहतील.


१६ मार्च रोजी हरीश साळवे यांची
अधिकृतपणे नियुक्ती होईल.


कायदा आणि वकिलीच्या क्षेत्रामध्ये
महत्वाची आणि मोठी कामगिरी करणाऱ्यांना ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून निवडले
जाते.


साळवे यांचे आंतरराष्ट्रीय
कायदाक्षेत्रातील मोठे योगदान असल्याने त्यांना हा बहुमान मिळाला आहे
, अशी माहिती शाही
घराण्याच्या सूत्रांनी दिली.


हरीश साळवे यांनी फक्त एक रूपयांचं
मानधन घेऊन कुलभूषण जाधवांची बाजू आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडली होती.


harish salve साठी इमेज परिणाम


हरीश साळवे यांच्या विषयी थोडेसे


कोर्टात नुसतं एकदा हजर राहण्यासाठी
हरिश साळवे चार ते पाच लाख रुपये घेतात असं बोललं जातं
, तसंच एका संपूर्ण
दिवसासाठी ते २५ ते ३० लाख रुपयांपर्यंत मानधन आकारतात असं म्हटलं जातं.


त्यांचे आजोबा पी. के. साळवे. ते
प्रख्यात क्रीमिनिल लॉयर होते. याशिवाय त्यांचे पणजोबा हे न्यायाधीश होते. तर हरीश
साळवेंचे वडील वडील एन. के. पी. साळवे हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते.


हरिश साळवे यांचा जन्म धुळे
जिल्ह्यातल्या वरुड या गावात झाला.


त्यांनी
नागपूर विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण घेतले


१९९२ मध्ये हरिश साळवे सुप्रीम
कोर्टाचे वरिष्ठ वकील बनले


१९९९ मध्ये त्यांना सॉलिसिटर म्हणून
काम करण्याची संधी मिळाली.


वकिली करण्याआधी ते सीए झाले होते.


त्यावेळचे प्रसिद्ध वकील नानी
पालखीवाला यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि त्यांनी सीए झाल्यानंतर वकिलीची
डिग्री मिळवली.


वकील झाल्यापासून साळवेंनी अनेक मोठे
खटले लढले आहेत.


हरीश साळवे यांचे नाव
केवळ देशातच नाही तर जगातील सर्वात मोठ्या वकिलांमध्ये घेतले जाते.


गेल्या
वर्षी हरीश साळवे यांनी कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकिली केली होती. त्याआधी सलमान
खान
,
मुकेश अंबानी, इटली सरकार आणि वोडाफोन सारख्या
क्षेत्रातील बड्या  लोकांसाठी काम केले
आहे.


1९९९ ते २००२ पर्यंत
ते देशाला सॉलिसिटर जनरल म्हणून काम पाहत होते.














टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)