ISRO ची आणखी एक यशस्वी कामगिरी, GSAT-30 लॉन्च

MPSC TECH
0








Image result for isro


इस्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने आणखी एक यशस्वी
कामगिरी केली आहे.


जीसॅट-३० (GSAT-30) या
दूरसंचार उपग्रहाचे दक्षिण अमेरिकेच्या कैरो बेटावरून यशस्वी प्रेक्षेपण केले आहे.


आज, शुक्रवारी पहाटे दोन वाजून ३५
मिनिटांनी उपग्रहाचे यशस्वी प्रेक्षेपण केले.


GSAT-30 या उपग्रहामुळे इनरनेट क्षेत्रात नवी क्रांत्री होणार आहे.


या उपग्रहामुळे इंटरनेट आधीक गतीने चालणार आहे.


GSAT-30 या उपग्रहाचं वजन सुमारे ३,१०० किलो आहे.
लॉन्चिंगपासून १५ वर्षे हा उपग्रह कार्यरत राहणार आहे.


या उपग्रहाला जिओ इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यात
आलं आहे.


या उपग्रहामध्ये दोन सोलर पॅनल आणि बॅटरी आहे.


यापूर्वी २०१५ मध्ये इनसॅट-४ए हा उपग्रह लॉन्च करण्यात आला
होता. त्याची मर्यादा संपुष्टात आली असून तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर
बदल होत आहेत.


त्यामुळे GSAT-30 हा
दुरसंचार उपग्रह इस्रोनं लॉन्च केला आहे. जीसॅट-३० हा उपग्रह इनसॅट-४एच्या जागी
काम करेल.




काय होणार फायदा





GSAT-30
हा दुरसंचार उपग्रहामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती होणार
आहे. व्हीसॅट नेटवर्क
, टेलिव्हिजन अपलिंकिंग, टेलिपोर्ट सेवा, डिजिटल सॅटेलाइट, डीएसएनजी, डीटीएच टेव्हिजन सेवा आदी सेवांसाठी या
उपग्रहाचा वापर होणार आहे. त्याशिवाय जलवायूमध्ये होणारे बदल आणि हवामानाचं
भाकितही वर्तवण्यासाठी या उपग्रहाची मदत होणार आहे.













टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)