खगोल शास्त्रज्ञांनी शोधला अंगठीच्या आकाराचा वायुमेघ

MPSC TECH
0


style="display:block"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="5919196816"
data-ad-format="auto"
data-full-width-responsive="true">











राष्ट्रीय रेडिओ
खगोलभौतिकी केंद्रातील (एनसीआरए) खगोलशास्त्रज्ञांनी नव्या दीर्घिकेचा (गॅलरी) शोध
लावला असून
, या दीर्घिकेभोवती हायड्रोजन वायूचा
अंगठीच्या आकाराचा गोलाकार वायुमेघ आहे. जायंट मीटरवेव रेडिओ टेलिस्कोप वापरून
शास्त्रज्ञांनी हा वायुमेघ शोधला असून
, त्याच्या आतील
दीर्घिका पृथ्वीपासून
260 दशलक्ष प्रकाशवर्षे दूर आहे. तर या
वायुमेघाचा व्यास आपल्या आकाशगंगेच्या चौपट असून
, अशा
प्रकारच्या वायुमेघाचा शोध
1987 मध्ये लागला होता. मात्र,
तो पृथ्वीपासून सुमारे 130 दशलक्ष प्रकाशवर्षे
दूर होता. परंतु एनसीआरएमधील शास्त्रज्ञ ओम्कार बाईत आणि प्रा. योगेश वाडदेकर
यांनी आता नव्या दीर्घिकेचा शोध लावला आहे. हे संशोधन मंथली नोटीस रॉयल अ‍ॅस्ट्रोनॉमिकल
सोसायटी जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. शास्त्रज्ञांकडून अशा नऊ दीर्घिकांचा
अभ्यास केला जाणार आहे. तसेच योगेश वाडदेकर म्हणाले
, अशा
प्रकारच्या वायुमेघाची निर्मिती नेमकी कशी झाली
, हे कोडे
आहे. सूर्यमालेशी त्याची तुलना करता येत नाही
, कारण
वायुमेघाचे वस्तुमान सूर्याच्या दोन अब्जपट आहे. सूर्यमालेचा व्यास काही प्रकाश
तास आहे
, तर या वायुमेघाचा व्यास 3 लाख
80 हजार प्रकाश वर्ष आहे. अणुरूपी हायड्रोजन सुमारे 2 सेमीच्या तरंगलांबीवर रेडिओ लहरी उत्सर्जित करतो. रेडिओ
खगोलशास्त्रज्ञांना हायड्रोजन अणूंच्या किरणोत्सर्गामुळे आपल्या आकाशगंगेमध्ये व
जवळील दीर्घिकांमध्ये हायड्रोजन वायूचे प्रमाण व वितरण यांचा नकाशा तयार करता
येतो. हायड्रोजनचा मोठा साठा सक्रियपणे तारे निर्माण करणाऱ्या दीर्घिकांमध्ये
आढळतो. या नव्या दीर्घिकेमध्ये तारे तयार होण्याची चिन्हे दिसत नाहीत. परंतु
,
त्यात मोठ्या प्रमाणावर हायड्रोजन दिसत आहे.





थोडक्यात
महत्वाचे


१पुण्यातील राष्ट्रीय
रेडिओ खगोलभौतीकी केंद्रातील (एनसीआरए) खगोलशास्त्रज्ञांनी नव्या दिर्घीकेचा शोध
लावला


२ या दिर्घीकेभोवती
हायड्रोजन वायूचा अंगठीच्या (रिंग) आकाराचा रहस्यमय गोलाकार वायुमेघ आहे.


३ या वायुमेघाच्या
आतल्या बाजूची दिर्घीका पृथ्वीपासून सुमारे
260 दशलक्ष
प्रकाश वर्षे दूर आहे.


४ एनसीआरएच्या
शास्त्रज्ञांनी शोधलेला वायुमेघाचा व्यास आपल्या आकाशगंगेच्या तब्बल चौपट असून अशा
प्रकारच्या वायुमेघाचा शोध
1987 मध्ये लागला होता.
मात्र
,तो आपल्यापासून सुमारे 130
दशलक्ष प्रकाश-वर्ष दूर होता.


५ या वायुमेघाचे
वस्तुमान सुर्याच्या
2 अब्जपट जास्त आहे. तसेच
सुर्यमालेचा व्यास काही प्रकाश तास आहे.


६ या वायुमेघचा व्यास
3 लाख 80 हजार प्रकाश वर्ष आहे.


७ या दिर्घीकेत तारे
तयार होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही.


८ जीएमआरटीच्या
निरिक्षणातून हायड्रोजनचा विस्तार एका मोठ्या ऑफ-सेंटर रिंगच्या स्वरूपात असल्याचे
स्पष्ट झाले.


९ एनसीआरएच्या
शास्त्रज्ञांनी डुक आणि कुइयान्द्र या दोन शास्त्रज्ञांच्या सहकार्याने अतिशय
संवेदनशील ऑप्टिकल प्रतिमा कॅनडा आणि-फ्रान्स येथील हवाई टेलीस्कोप वापरून मिळवली..







style="display:block"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="5919196816"
data-ad-format="auto"
data-full-width-responsive="true">

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)