आजचा महाराष्ट्र हा १९६० पूर्वी वेगवेगळ्या प्रांतांमध्ये
विखुरलेला होता, तो राजकीयदृष्ट्या खऱ्या अर्थाने १ मे १९६० रोजी अस्तित्वात आला.स्वातंत्रोत्तर काळात १९५६ मध्ये देशात भाषावर प्रांत
रचनेनुसार राज्यांची पुनर्रचना करण्यात आली. त्यानुसार आंध्रप्रदेश हे भाषिक
तत्वावर आधारित पहिले राज्य अस्तित्वात आले. याच पुनर्रचनेनुसार राज्यांची
पुनर्रचना करण्यात आली. याच पुनर्रचनेने हैद्राबाद संस्थानातील मराठी भाषिक पाच
जिल्हे (औरंगाबाद, बीड, परभणी,
उस्मानाबाद, नांदेड) व मध्य प्रांतातील
विदर्भाचे मराठी भाषिक आठ जिल्हे ( बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर,
भंडारा, यवतमाळ, चांदा)
व बॉम्बे प्रेसिडेंसिमधील १३ जिल्हे असे २६ जिल्हे आणि गुजरात यांचे मिळून १
नोव्हेंबर १९५६ रोजी द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली. परंतु मराठी
भाषिकांचे स्वतंत्र राज्य असावे अशी मागणी असल्यामुळे तत्कालीन द्वैभाषिक
राज्यामध्ये आंदोलने झाली. सरतेशेवटी राज्यातील १०६ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर
मराठी भाषिकांकरिता गुजरात वगळता २६ जिल्हे असणारे महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य १
मे १९६० रोजी अस्तित्वात आले.
स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रात 26 जिल्हे, 235 तालुके, 4 प्रशासकीय विभाग होते.सध्यास्थितीत
महाराष्ट्रात 36 जिल्हे, 355 तालुके, 535
शहरे, 43663 खेडी, 6 प्रशासकीय विभाग
आहेत.
महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग:
कोकण (30746 चौ.किमी): मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर,
रायगड, रत्नागिरी/सिंधुदुर्ग.
पुणे/प.महाराष्ट्र (57268 चौ.किमी): पुणे, सातारा, सांगली, सोलापूर,
कोल्हापूर.
नाशिक/खान्देश (574426 चौ.किमी): नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार.
औरंगाबाद/मराठवाडा (64822 चौ.किमी): औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर,
नांदेड.
अमरावती/प.विदर्भ (46090 चौ.किमी): अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ,
वाशिम.
नागपूर/पूर्व.विदर्भ (51336 चौ.किमी): नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली,
भंडारा, गोंदिया.
नैसर्गिक सीमा :
वायव्येस : सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या.
उत्तरेस : सातपुडा पर्वतरांगा व त्याचा
पूर्वेस गाविलगड टेकड्या.
ईशान्येस : दरेकासा टेकड्या.
पूर्वेस : चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर.
दक्षिणेस : हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल
नदी.
पश्चिमेस : अरबी समुद्र.
राजकीय सीमा व सरहद्द :
वायव्येस : गुजरात व दादरा नगर हवेली.
उत्तरेस : मध्यप्रदेश.
पूर्वेस : छत्तीसगड.
आग्नेयेस : आंध्र प्रदेश.
दक्षिणेस : कर्नाटक व गोवा.
राज्य व त्यांना जोडणारे महाराष्ट्रातील
जिल्हे :
गुजरात : पालघर, नाशिक,
नंदुरबार, धुळे
दादर नगर हवेली : ठाणे, नाशिक
मध्ये प्रदेश : नंदुरबार, धुले, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपुर, भंडारा,
गोंदिया
छत्तीसगड : गोंदिया, गडचिरोली
आंध्रप्रदेश : गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ, नांदेड
गोवा : सिंधुदुर्ग
महाराष्ट्राचे भारतातील स्थान :
भारतातील 29 राज्यांपैकी एक.
भारताच्या मध्यवर्ती भागात .
महाराष्ट्र राज्य ही उत्तर भारत व दक्षिण
भारतात एकत्र आणणारी विशाल भूमी आहे .
style="display:block"
data-ad-format="fluid"
data-ad-layout-key="-gw-3+1f-3d+2z"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="9232621833">
1. विस्तार
अक्षांक : 15° 41’ उत्तर अक्षवृत्त ते 22° 6’ उत्तर अक्षवृत्त.
रेखांश : 72° 36’ पूर्व रेखांश ते 80° 54’ पूर्व रेखावृत्त.
2. आकार
व्हीव्हीत्रिकोणाकृती, दक्षिणेस चिंचोळा तर उत्तरेस रुंद.
पाया – कोकणात व
निमुळते टोक विदर्भात.
3. लांबी, रुंदी व क्षेत्रफळ
लांबी = पूर्व – पश्चिम
– 800 किमी.
रुंदी = दक्षिण – उत्तर – 720 किमी.
क्षेत्रफळ = 307713 चौ.किमी.
क्षेत्रफळाच्या द्रुष्टीने भारतात राजस्थान, मध्यप्रदेश नंतर महाराष्ट्रचा 3 रा क्रमांक लागतो.
महाराष्ट्राने देशाचा 9.36% भाग व्यापला आहे.
समुद्रकिनारा 720 किमी. लांबीचा आहे.
जिल्हे निर्मिती :
1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)
औरंगाबादपासून – जालना
(28 वा जिल्हा)
16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून – लातूर (29 वा जिल्हा),
26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)
1990 : मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)
1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)
अकोल्यापासून – वाशिम
(33 वा जिल्हा)
1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)
भंडारा
–
गोंदिया (35 वा जिल्हा)
1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून – पालघर (36 वा जिल्हा)
