केंद्रीय अन्वेषण
विभागाचे अधिकारी बी. पी. राजू ह्यांना 'इंडिया सायबर
कॉप ऑफ द ईयर 2019' हा सन्मान देऊन गौरविण्यात आले आहे.17 डिसेंबर 2019 रोजी हरयाणाच्या गुरुग्राम या शहरात
झालेल्या वार्षिक माहिती सुरक्षा शिखर परिषदेदरम्यान या पुरस्काराचे वितरण करण्यात
आले.राजस्थानातल्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाइन
प्रवेश परीक्षेत झालेल्या फसवणूकीच्या प्रकरणाचा उलगडा करण्यात त्यांच्या
भूमिकेसाठी हा सन्मान बी. पी. राजू ह्यांना NASSCOM-DSCI यांच्यावतीने
देण्यात आला आहे.त्या प्रकरणात बी. पी. राजू यांच्या नेतृत्वात असलेल्या चौकशी
पथकाने नऊ आरोपींना अटक केली. छडा लावताना त्यांनी सायबर तंत्रज्ञानाचा वापर करून
डिजिटल उपकरणांमधून महत्त्वाचे पुरावे देखील गोळा केले. मुख्य म्हणजे हा तपास
अल्पावधीतच पूर्ण करण्यात आला होता.
मुख्य मुद्दे :
- त्यांना
हा पुरस्कार इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अजय
प्रकाश साहनी यांनी प्रदान केला. - गुरुग्राम
येथे झालेल्या वार्षिक माहिती सुरक्षा शिखर परिषदेदरम्यान हा कार्यक्रम झाला. - बीपी
राजू यांच्या नेतृत्वात चौकशी पथकाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी नऊ आरोपींना
अटक केली. - त्यांनी
डिजिटल उपकरणांवरून घटते पुरावेही गोळा केले ज्यावरून आरोपींनी अवलंबिलेल्या
पद्धतींचा खुलासा झाला. - तपासही
अल्पावधीतच पूर्ण झाला.
केंद्रीय अन्वेषण
विभाग (Central
Bureau of Investigation (CBI) थोडक्यात माहिती
ही भारत सरकार ची
विशेष पोलिस आस्थापना, गुन्हे अन्वेषण विभाग व
गुप्तहेर खाते आहे. त्याची स्थापना १ एप्रिल १९६३ रोजी झाली.लाचलुचपत प्रतिबंध या
विषयासंबंधी नेमलेल्या संथानम समितीने(1963) केंद्रीय
अन्वेषण विभागाच्या स्थापनेची शिफारस केली होती।