जपानचा पासपोर्ट सर्वात शक्तीशाली

MPSC TECH
0







 Image result for japan passport





जगातील सर्वात
शक्तीशाली पासपोर्टमध्ये २०२० या वर्षात भारतीय पासपोर्ट दोन स्थानांनी घसरुन ८४
व्या क्रमांकावर आला आहे. भारतीय पासपोर्टधारकांना जगातील ५८ देशात विना व्हिसा
प्रवेश मिळू शकतो. नुकत्याच जारी झालेल्या एका अहवालात ही माहिती समोर आली. सर्वात
शक्तीशाली पासपोर्टमध्ये जपानचा पहिला क्रमांक आहे
, तर
सर्वात कमकुवत पासपोर्टच्या यादीत पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर आहे.



आंतरराष्ट्रीय हवाई
वाहतूक संघटना (आयएटीए) च्या आकडेवारीनुसार
, हेनले अँड
पार्टनर्सने क्रमवारी जारी केली आहे. पासपोर्टधारकाला विना व्हिसा किती देशात
प्रवेश मिळतो या आधारावर ही क्रमवारी निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वीही या
यादीत जपानचाच पहिला क्रमांक होता. जपानच्या पासपोर्टवर जगातील १९१ देशात विना
व्हिसा प्रवेश मिळतो.





जगातील
सर्वात शक्तीशाली १० पासपोर्ट



























































क्रमांक


देश


व्हिसा फ्री एंट्री मिळणाऱ्या
देशांची संख्या




जपान


१९१




सिंगापूर


१९०




जर्मनी, दक्षिण कोरिया


१८९




फिनलँड, इटली


१८८




डेन्मार्क, लक्जमबर्ग, स्पेन


१८७




फ्रान्स, स्वीडन


१८६




ऑस्ट्रिया, आयरलँड, नेदरलँड,
पोर्तुगाल, स्वित्झरलँड


१८५




बेल्जियम, ग्रीस, नॉर्वे,
ब्रिटेन, अमेरिका


१८४




ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चेक रिपब्लिक,
माल्टा, न्यूझीलंड


१८३


१०


हंगेरी, लिथुआनिया, स्लोवाकिया


१८१













टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)