राज्यसेवा पूर्व परीक्षा - संपूर्ण विश्लेषण आणि तयारी

MPSC TECH
0





         
            


आयोगाने राज्यसेवा
पूर्व परिक्षेची तारीख प्रसारित केली आहे. प्रस्तावित तारखे नुसार आता राज्यसेवेची
पूर्व परीक्षा आता १३ सप्टेंबर 2020 मध्ये होणार आहे. देशव्यापी लॉकडाऊन मुळे सर्व
विद्यार्थी मित्रांचे अभ्यासाचे खूप नुकसान झाले आहे. पण आता आपल्याला झालेले नुकसान
भरून काढायचे आहे जिद्दीने पुन्हा एकदा अभ्यासाला लागायचे आहे.



राज्यसेवा पूर्व
परीक्षेचा अभ्यास करताना काही महत्वाचे घटक विचारात घेणे खूप आवश्यक आहे. अभ्यास
कसा करायचा याला सुरुवात करण्या आधी अभ्यास कोणी कसा करायचा हे खूप महत्वाचे आहे.
या परीक्षेला अनेक नवीन विद्यार्थी मित्र बसणार आहेत.तसेच अनेक जुने विद्यार्थी
मित्र सुद्धा बसणार आहेत आता नवीन म्हणजे कोण ? तर जे पहिल्यांदाच राज्यसेवा पूर्व
परीक्षा देत आहेत. आहे जुने म्हणजे ज्यांनी या आधी ही परीक्षा दिली आहे म्हणजेच
ज्याना या परीक्षेचा आवाका माहित आहे. ज्यांना जनरल स्टडी आणी CSAT यातील फरक
माहित आहे असे विद्यार्थी.






आपण सुरुवात करूया
नवीन विद्यार्थी मित्रांपासून त्यांसाठी पूर्व परीक्षेची  थोडी पार्श्वभूमी बघू



राज्यसेवा
पूर्व परीक्षा स्वरूप आणि अभ्यासक्रम



ढोबळमानाने बघितले तर
राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आपल्याला दोन पेपर चा अभ्यास करावा लागतो त्यातील
पहिला पेपर म्हणजे सामान्य अध्ययन (General Study) आणि दुसरा पेपर  म्हणजे CSAT हे दोन्ही पेपर प्रत्येकी 200
मार्काचे असतात. म्हणजेच सामान्य अध्ययन 200 + CSAT 200 = 400 मार्काची राज्यसेवा
पूर्व परीक्षा असते. तसेच या दोन्ही पेपर ला १/3 निगेटिव्ह मार्किंग असते. याचा
साधा सोपा अर्थ म्हणजे जर तुम्ही चुकलात तर तुमचे मार्क मायनस (कमी) होणार हे
नक्की निगेटिव्ह मार्किंग मुळे आपले मार्क कमी होण्या पासून कसे वाचवायचे हे आपण
पुढे पाहणार आहोतच पण त्या आधी राज्य सेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम बघू



अभ्यासक्रम
(Source : राज्यसेवेची आयोगाची वेबसाईट)



सामान्य
अध्ययन (
GS) -Paper I – (200
marks)



(1) Current
events of state, national and international importance. (राज्य,
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या चालू घडामोडी)



(2) History
of India (with special reference to Maharashtra) and Indian National Movement.
(भारतीय इतिहास (महाराष्ट्राच्या संदर्भात) व राष्ट्रीय चळवळ)



(3) Maharashtra,
India and World Geography – Physical, Social, Economic Geography ofMaharashtra,
India and the World.(महाराष्ट्राचा, भारताचा
व जगाचा भौतिक
, सामाजिक व आर्थिक भूगोल)



(4) Maharashtra
and India – Polity and Governance – Constitution, Political System, Panchayati
Raj,Urban Governance, Public Policy, Rights issues, etc. (महाराष्ट्राची
व भारताची राज्यव्यवस्था आणि शासन)



(5) Economic
and Social Development – Sustainable Development, Poverty,
Inclusion,Demographics, Social Sector initiatives, etc. (आर्थिक व
सामाजिक विकास)



(6) General
issues on Environmental Ecology, Bio-diversity and Climate Change-that do not
require subject specialisation. (पर्यावरणीय
परिस्थिती)



(7) General
Science (सामान्य विज्ञान)



सामान्य
अध्ययन
CSAT-Paper II – (200 Marks)



(1) Comprehension
(आकलन क्षमता)






(2) Interpersonal
skills including communication skills.(परस्पर संवादासह
आंतर्व्याक्ती संवाद कौशल्ये)



(3) Logical
reasoning and analytical ability. (तार्किक व विश्लेषण क्षमता)



(4) Decision
– making and problem – solving. (निर्णय निर्धारण व समस्येचे
निराकरण)



(5) General
mental ability (सामान्य बौद्धिक क्षमता)



(6) Basic
numeracy (numbers and their relations, orders of magnitude, etc.) (Class X
level),   Data interpretation(Charts,
graphs, tables, data sufficiency etc.- Class X level) (पायाभूत
अंकगणित
& माहितीचे अर्थान्तरण)






(7) Marathi
and English Language Comprehension skills (Class X/XII level).(मराठी
व इंग्रजी भाषिक आकलन कौशल्य)



आता
प्रश्न आहे अभ्यास कसा करायचा त्याची सुरुवात कशी करायची ?



अभ्यासाला सुरुवात
करण्या आगोदर आधी झालेल्या आयोगाच्या पेपर चे वर्गीकरण करणे, म्हणजेच कोणत्या
वर्षी कोणत्या घटकावर किती प्रश्न आले हे बघणे खूप आवश्यक आहे.



सामान्य
अध्ययन पेपर १









































































































अ.क्र.



घटक



2013



2014



2015



2016



2017



2018



2019



1



चालू  घडामोडी



7



12



21



16



15



15



15



2



इतिहास



14



17



22



22



15



15



15



3



भूगोल



18



16



8



16



17



15



14



4



राज्यशास्त्र



17



10



12



11



12



15



15



5



अर्थशास्त्र



15



8



12



7



14



15



15



6



पर्यावरण



5



9



5



7



7



5



6



7



सामान्य विज्ञान



24



28



20



21



20



20



20




 



वरील तक्त्याचा
अभ्यास केला की आपल्याला नक्की अभ्यास कसा करायचा कोणत्या विषयाला अधिक महत्व
द्यायचे हे लक्षात आलेच असेल. तरीही आपण याचा सविस्तर आढावा घेवू  सुरुवात करू पेपर १ पासून म्हणजे सामान्य
अध्ययन हा पेपर 200 मार्काला असतो या मध्ये एकूण १०० प्रश्न असतात हे तर तुम्हाला
माहीतच आहे.



आता आपण त्या त्या
विषयाची तयारी करताना कोणकोणत्या घटका वर फोकस करायचा ते बघू



इतिहास
:
या विषयाचा अभ्यास करीत असताना महत्वाच्या तीन टप्प्याचा
अभ्यास करावा लागतो पहिला टप्पा प्राचीन भारताचा इतिहास दुसरा टप्पा मध्ययुगीन
भारताचा इतिहास आणि तिसरा टप्पा आधुनिक भारताचा इतिहास जर तुम्ही राज्यसेवा पूर्व
परिक्षेच्या आधीच्या पेपर चे विश्लेषण केलेत तर तुम्हाला लक्षात येईल प्राचीन
भारताच्या इतिहासावर average ५ ते 6 प्रश्न आलेले आहेत मध्ययुगीन भारताच्या
इतिहासावर 2 ते 3 प्रश्न आलेले आहेत आणि  आधुनिक
भारताच्या विविध घटकावर 7 ते 8 प्रश्न आलेले आहेत. त्यातील महत्वाचे घटक म्हणजे
१८५७ चा उठाव, ब्रिटीश सत्तेची भारतामध्ये स्थापना, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस ची
स्थापना जहाल गट मवाळ गट गांधीयुग आणि स्वातंत्र लढ्यातील महत्वाच्या व्यक्ती या
घटकावर प्रश्न आलेले दिसून येतात.






भूगोल
:
भूगोल या विषया चे विश्लेषण केले तर या मध्ये
प्राकृतिक भूगोल,जगाचा भूगोल, भारताचा भूगोल, नदी प्रणाली,कृषी आणि महाराष्ट्राचा
भूगोल या घटकांचा अभ्यास करावा लागतो. जर सखोल विश्लेषण केले तर तुमच्या लक्षात
येईल प्राकृतिक भूगोल वर 4 ते ५ प्रश्न जगाच्या भूगोल वर पण 4 ते ५ प्रश्न,
भारताच्या भूगोल वर २०१७ पर्यंत 6 ते 7 प्रश्न येत होते पण २०१८ व १९ मध्ये फक्त 2
ते 3 प्रश्न आलेले आहेत.तर नदी प्रणाली कृषी आणि महाराष्ट्राच्या भूगोल वर
प्रत्येकी १ ते 2 प्रश्न आलेले दिसतात.



राज्यघटना
:
राज्यघटना या विषयाचा अभ्यास करीत असताना आपल्याला घटना
निर्मिती आणि वैशिष्ट्ये , मुलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे , मुलभूत कर्तव्ये ,
केंद्रशासन व संसद , केंद्र व राज्य सबंध राज्यविधीमंडळ , न्यायववस्था पंचायतराज,
विविध समित्या किवां आयोग तसेच वेळोवेळी केलेल्या घटना दुरुस्ती. या घटकांचा
अभ्यास करावा लागतो. यातील केंद्रशासन व संसद या घटका वर 4 ते ५ प्रश्न येतात तर
इतर घटकांवर प्रत्येकी १ ते 2 प्रश्न येतात



अर्थव्यवस्था
:
अर्थव्यवस्था या विषयाचा अभ्यास करीत असताना आपल्याला
शाश्वत विकास, दारिद्र्य, लोकसंख्या सार्वजनिक ववित्त  व्यवस्था तसेच विविध योजना आणि आंतराष्ट्रीय
महत्वाच्या संघटनाचा अभ्यास करावा लागतो.



विज्ञान
:
या विषया मध्ये आपल्याला रसायनशास्त्र,
भौतिकशास्त्र,वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र तसेच मानवी शरीर आणि त्याचे आरोग्य या
घटकांचा अभ्यास करावा लागतो जर तुम्ही राज्यसेवेच्या आधीच्या पेपर चे विश्लेषन
केले असेल तर तुम्हाला लक्षात येईल विज्ञान या विषयाचे सर्वाधिक प्रश्न राज्यसेवा
पूर्व परीक्षेला येतात. वर दिलेल्या चार्ट मध्ये सुद्धा ही गोष्ट दिसून येते. यातील
विविध घटका नुसार जर बघितले तर रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या घटकावर प्रत्येकी
6 ते 7 प्रश्न येतात तर वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र या वर 4 ये ५ प्रश्न आणि
मानवीशरीर आणि त्याचे आरोग्य या घटकावर 4 ते ५ प्रश्न येतात.



पर्यावरण
आणि चालू घडामोडी :
या दोन्ही विषया कडे लक्ष दिले तर
तुम्हाला लक्षात येईल चालू घडामोडी वर १५ ते १६ व तर पर्यावरण या घटकावर ५ ते 6
प्रश्न येतात चालू घडामोडी साठी तुम्हाला किमान मागील १ वर्षातील घडलेल्या
घडामोडींचा अभ्यासक करावा लागतो.



 सामान्य अध्ययन पेपर 2 (CSAT)






















































































अ.क्र.



घटक



2013



2014



2015



2016



2017



2018



2019



1



Passage


(मराठी – इंग्रजी)



41



37



33



40



40



40



40



2



Passage (मराठी)



4



5



5



5



5



5



5



3



Passage (इंग्रजी)



5



8



12



5



5



5



5



4



अंकगणित



9



3



6



4



11



11



11



5



बुद्धिमापन क्षमता



16



22



19



21



14



14



14



6



निर्णय क्षमता



5



5



5



5



5



5



5







 



सामान्य
अध्ययन 2 (CSAT) :
या पेपर चे विश्लेषण केले तर एका गोष्ट
प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे CSAT या पेपर मध्ये उतारे किवां Passage याला सर्वात
जास्त महत्व आहे त्या नंतर अंकगणित आणि बुद्धिमापन क्षमता यांना आणि राहिलेले
निर्णय क्षमता या घटकाला महत्व आहे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की
निर्णयक्षमता या घटकाला कोणतेही निगेटिव्ह मार्किंग नसते.



आता
तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे



अभ्यास
कसा करायचा ?



सर्व घटकांचे विषयाचे
विश्लेषण तर झाले पण तरीही महत्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे



अभ्यास कसा करायचा ?



कोणती पुस्तके
वाचायची ?



निगेटिव्ह मार्किंग
पासून कसे वाचायचे ?



सुरुवात करू पहिल्या
प्रश्ना पासून तो म्हणजे अभ्यास कसा करायचा ?



लक्षात ठेवा
राज्यसेवा पूर्व परिक्षेचा अभ्यास करीत असताना आपल्याला परीक्षेच्या दृष्टीकोनातून
अभ्यास करायचा आहे. पेपर मधील नेमक्या घटकांचा अभ्यास करायचा आहे. वर दिलेले
विश्लेषण हे त्या साठी तुम्हाला तुमची दिशा ठरवण्यास मदत करेल. सगळ्यात महत्वाचे
म्हणजे परीक्षेच्या तारखे नुसार तुम्हाला तुमचे वेळापत्रक बनवायचे आहे. वेळापत्रक
बनवीत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा त्या मध्ये प्रत्येक दिवशी सामान्य अध्ययन आणि
CSAT या दोन्ही पेपर चा अभ्यास करायचा आहे तेव्हाच आपण पूर्व परीक्षा पास होऊ.



सुरुवातीलाच
सांगितल्या प्रमाणे नवीन विद्यार्थी यांनी आधी त्या त्या विषया नुसार पुस्तकाची
निवड करायची आहे लक्षात ठेवा प्रत्येक विषयाला जास्तीत जास्त एकच पुस्तक सध्या
तुम्हाला वाचायचे आहे बाजार मध्ये हजारो पुस्तके आहेत पण म्हणून सगळीच पुस्तके
वाचली पाहिजेत असे नाही पुस्तकाची निवड करताना आपल्या सिनियर ची प्रत्यक्ष मदत
घेणे कधीही  चांगले अनेकदा असे होते कि आपण
कोठे तरी वाचतो किवा कोणत्यातरी व्हिडीओ मध्ये बघतो कि अमुक पुस्तक वाचा तमुक
पुस्तक वाचा पण पण ते पुस्तक विकत घेताना आधी ते आपल्याल्या किती उपयोगी पडणार आहे
याचा अंदाज तुम्हाला घ्यायचा आहे.  जवळ जवळ
प्रत्येक पुस्तकामधील माहिती ही एकसारखीच असते पण महत्वाचे असते ते म्हणजे त्या
पुस्तकाची मांडणी. पुस्तक विकत घेण्या आधी जर आपल्या सिनियर कडे ते पुस्तक असेल तर
ते एकदा नजरे खालून घाला जर समजत असेल तरच ते पुस्तक विकत घ्या अन्यथा अन्य पर्याय
शोधा पण पर्याय शोधताना जास्त वेळ वाया जाणार नाही या कडे लक्ष द्या



जुने विद्यार्थी ज्यांनी
आधीपण ही परीक्षा दिली आहे असे विद्यार्थी यांच्या साठी जर एखादे पुस्तक तुमच्या
कडे असेल आणि त्याची नवीन आवृती आली असेल तर ते घेतलेच पाहिजेत असे नाही जर आपल्या
मित्रांनी कोणी ते पुस्तक घेतले असेल तर त्या पुस्तकातील जो भाग अपडेट झाला असेल
तेवढ्याच भागाचे नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता.






एक गोष्ट लक्षात ठेवा
राज्यसेवा परीक्षा ही MCQ (
Multiple Choice Question) ची आहे. त्या मुळे येथे प्रत्येक कन्सेप्ट समजून घेण्यापेक्षा प्रश्नाच्या
अनुषगाने त्याचा अभ्यास करायचा आहे. म्हणजेच म्हणजेच एखादा घटक समजून घेतल्या नंतर
त्या वर जास्तीत जास्त प्रश्नाचा सराव करायचा आहे.



कन्सेप्ट
कशी समजून घ्यायची ?



अनेक विद्यार्थी
कन्सेप्ट समजून घेणे म्हणजे त्या विषयाचे पाठांतर करीत असतात पण एक गोष्ट लक्षात
ठेवा की राज्यसेवेचा अभ्यासक्रम एवढा दीर्घ आहे की तो पाठांतराने लक्षात राहत नाही
त्या साठी प्रत्येक विषयाचे स्वतःचे नोट्स काढणे खूप आवश्यक आहे. सध्या नोट्स
काढण्या साठी mind map ची क्रेझ आहे पण इतर काढतात mind map पद्धतीने  नोटस काढणे हे आपल्याला किती सोयीचे आहे ते
प्रत्येकाने स्वतः ठरवायचे आहे. जुन्या विद्यार्थी मित्रांना याचा नक्कीच फायदा
होऊ शकतो पण नवीन विद्यार्थी मित्रांना होईलच असे नाही कारण mind map ही एक system
आहे त्याची आधी सवय लावली पाहिजेत तरच त्याचा उपयोग होतो अन्यथा नवीन विद्यार्थी
मित्रांना परीक्षेच्यावेळी जेव्हा खऱ्या रिव्हिजन ची वेळ असते तेव्हा तेव्हा आपण
नोट्स म्हणजे नक्की काय काढले आहे हेच समजत 
नाही. आणि मग पुन्हा पुस्तक घेऊन बसावे लागते. तेव्हा लक्षात ठेवा नोट्स
काढताना तुमच्या जुन्या सवयीला अचानक बदलू नका तर हळू हळू त्यामध्ये बदल करून mind
map पद्धतीने नोट्स काढण्याची आणि ते समजून घेण्याची सवय लावा. ही वेळ नवीन सवय
लावण्याची नाहीये तर येणाऱ्या परीक्षेत आपण पास कसे होऊ या वर फोकस करण्याची आहे.



सराव
आणि निगेटिव्ह मार्किंग पासून बचाव



सामान्य अध्ययन पेपर
१ आणि CSAT या दोन्ही पेपर साठी सराव हा खूप महत्वाचा टप्पा आहे परीक्षा पास
होण्यासाठी सराव करण्याच्या महत्वाच्या दोन पद्धती आहेत



१)    
बाजारात असलेल्या विविध
प्रश्नपत्रिका तसेच आयोगाचे पेपर सोडविणे



२)    
 एखाद्या घटकावर (जर तो व्यवस्थित समजला असेल तर)
स्वतः प्रश्न काढणे.



यातील नवीन विद्यार्थ्यांनी दुसऱ्या पद्धतीने
सराव करण्याचा प्रयत्न आत्ता करू नये कारण तुम्हाला तुमचा वेळ कन्सेप्ट समजून
घेण्यावर केंद्रित करायचा आहे  पण जुन्या
विद्यार्थ्यांनी या पद्धतीचा उपयोग केला तर त्यांना नक्कीच याचा फायदा होईल. असे
केल्यामुळे तुम्हाला त्या कन्सेप्ट वर कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतो
. प्रश्न काढणाऱ्या व्यक्तीची मानसिकता काय असू शकते.
याचा तुम्हाला अंदाज येऊन प्रश्न कसाही आला तरी तो कसा सोडवायचा याचा अंदाज
तुम्हाला येऊ शकतो.






प्रश्न पत्रिका सोडवताना एक गोष्ट कटाक्षाने
पाळा ती म्हणजे वेळ शक्यतो सामान्य अध्ययन पेपर १ ची प्रश्नपत्रिका हि सकाळी सोडवा
तर CSAT चा पेपर दुपारी 2 ते 4 या वेळेत सोडवा. आणि ते ही वेळ लावून अगदी तुमच्या
पहिल्या प्रश्नपत्रिके पासून



असे का ?



तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे आयोगाचा सामान्य
अध्ययन चा पेपर सकाळी असतो. तर CSAT चा दुपारी तेव्हा साहजिकच अशा पद्धतीने सोडवले
कि तुम्हाला पण त्याची सवय होऊन जाईल आणि वेळ लावून पेपर सोडवल्या मुळे तुम्हाला
एका गोष्ट लक्षात येईल आपला किती पेपर 
कव्हर होत आहे याचा अंदाज येईल सोबतच अजून एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे पेपर
सोडवून झाल्यावर त्या पेपर चे विश्लेषण स्वतः करणे.



सोडवलेल्या पेपर चे विश्लेषण करीत असताना काय
बघितले पाहिजेत?



१)       
पेपर किती सोडवून झाला आहे



२)       
पेपर मधील कोणकोणत्या घटकाचे
प्रश्न आपण सहज सोडवू शकलो आणि कोणकोणत्या प्रश्नांना अडचणी आल्या आहेत.



३)       
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे
पेपर चे विश्लेषण तथस्त पणे करा



असे केल्या मुळे तुम्ही किती पाण्यात आहात
याचा तुम्हाला अंदाज येईल सगळ्यात महत्वाचे म्हणजे या काळात आपली तुलना इतरां सोबत
करू नका अशी कोणतीही गोष्ट करू नका की तुमचा अभ्यास वरील फोकस कमी होईल.



पेपर चे विश्लेषण केल्या नंतर जे घटक आपल्याला
अवघड गेले आहेत या घटकांना अधिक वेळ द्या या साठी वेळो वेळी आपल्या वेळापत्रकात
सुधारणा करा सुरुवातीला बनविलेलेच वेळापत्रक शेवट पणे पाळले पाहिजेत हा अट्टहास
करू नका सोबतच जे घटक पेपर सोडविताना सोपे गेलेत त्यांच्या कडेही दुर्लक्ष करु नका
त्याला थोडा कमी वेळ द्या पण येत आहे म्हणून गाफील राहू नका.



अशा पद्धतीने आधी वेळापत्रक बनविणे मग
कन्सेप्ट समजून घेणे मग नोट्स काढणे मग पेपर सोडविणे आणि त्याचे विश्लेषण करून
पुन्हा आपल्या वेळापत्रकात योग्य ते बदल करणे हे आवश्यक आहे.  हे सगळे करीत असताना वेळेचा आणि आपला पेपर  कधी आहे याचा विसर पडू न देणे हे सुद्धा तेवढेच
महत्वाचे आहे.



निगेटिव्ह मार्किंग पासून बचाव?



अनेक विद्यार्थी मित्रांकडून नेहमी बोलले जाते
की माझा रिझल्ट १ मार्कानी  गेला 2
मार्कानी गेला नाहीतर मी मुख्य परीक्षेला पात्र झालो असतो. पण असे असून सुद्धा
प्रत्येक वेळेस त्यांच्या कडून पुन्हा पुन्हा त्याच चुका पुन्हा होत असतात ते
म्हणजे पेपर सोडविताना केलेली घाई आणि याचा परीणाम  होऊन अनेक प्रश्न आपले चुकतात त्यामुळे आपले
मार्क कमी होतात परिणामतः आपण मुख्य परीक्षेला पात्र होत नाही.



निगेटिव्ह मार्किग पासून बचाव करण्याची एकच
पद्धत आहे आणि ती म्हणजे पेपर सोडविताना घ्यावयाची काळजी. लक्षात ठेवा आयोगाने असे
कोठेही सांगितले नाहीये की पेपर सगळाच्या सगळा सोडविलाच पाहीजेत किंवा अधिकारी
झालेल्या सर्व विद्यार्थी मित्रांनी सुद्धा सर्व पेपर पूर्ण सोडवलाच आहे असेही
नाही. मग तरीही त्यांना का यश मिळाले ? उत्तर सोपे आहे त्यांनी त्यांचा
अतीआत्मविश्वास बाजूला ठेवला म्हणजेच पेपर सोडवीत असताना एकच गोष्ट करायची आहे आणि
ती म्हणजे ज्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला १००% माहीत आहे तेच सोडविणे अगदी
एखाद्या प्रश्नाचे उत्तर ९९% माहित असेल तरी ते सोडविताना विचार केला पाहिजेत.



आणि म्हणूनच वर दिलेली अभ्यासाची साखळी पूर्ण
करणे खूप आवश्यक आहे.



तुम्हाला सर्वांना येणाऱ्या
परीक्षे साठी खुप खूप शुभेच्छा !



 



Bullet
Point चालू घडामोडी”
च्या अंकातून साभार प्रकाशित.










टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)