धोनीने मुद्दाम वेळ वाया घालवला

MPSC TECH
0

 धोनीने मुद्दाम वेळ वाया घालवला

क्वालिफायर-१’च्या सामन्यात चेन्नईने गुजरातसमोर १७३ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना गुजरातला अखेरच्या पाच षटकांत ७१ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी गुजरातच्या डावातील १६वे षटक वेगवान गोलंदाज मथीश पाथिरानाला देण्याची धोनीची योजना होती. मात्र, पाथिराना त्यापूर्वी थोडा वेळ मैदानाबाहेर होता. नियमानुसार, गोलंदाज जितका वेळ मैदानाबाहेर होता, तितकाच वेळ त्याला पुन्हा मैदानावर घालवावा लागतो. त्यानंतरच त्याला गोलंदाजीची परवानगी असते. पाथिराना साधारण चार मिनिटे मैदानाबाहेर होता आणि मैदानावर परत येऊन त्याने त्वरित चेंडू हाती घेतला. त्यामुळे पंचांनी त्याला गोलंदाजी करण्यापासून रोखले. परंतु त्यावेळी धोनीने पंचांशी संवाद साधला. चेन्नईचे अन्य काही खेळाडूही पंचांशी चर्चा करण्यासाठी आले. यात काही मिनिटे वाया गेली आणि पाथिरानाला पुन्हा मैदानावर येऊन आवश्यक तितकी मिनिटे झाल्याने गोलंदाजी करण्याची परवानगी मिळाली. त्यामुळे धोनीने मुद्दाम वेळ घालवल्याची टीका समाजमाध्यमावर करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)