सिद्धरामय्यांनी घेतली कर्नाटक च्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, डीके शिवकुमार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान
कर्नाटकमध्ये नव्या सरकारची स्थापना झाली आहे. काँग्रेसचे कर्नाटकमधील वरिष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाची तर कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी उपसमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर आता पक्षाने राज्यात सरकार स्थापन केलं आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांमधील नेत्यांनी या शपथविधीला हजेरी लावली होती. २० मे रोजी बंगळुरुमधील कांतीरवा मैदानात हा शपथविधी सोहळा पार पडला. सिद्धरामय्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.
कर्नाटकच्या नव्या मंत्रिमंडळात कोण कोण? ‘या’ आठ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या मुख्यमंत्री आणि कर्नाटक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदाची आज शपथ घेतली. बेंगळुरू येथील श्री कांतीराव स्टेडियमवर हा शपथविधी सोहळा पार पडला. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्यासह अनेक विरोधी पक्षांचे नेते या सोहळ्याला उपस्थित होते.
दरम्यान, याच वेळेस आठ मंत्र्यांनीही शपथ घेतली असून कर्नाटकचे नवे मंत्रिमंडळ आता सज्ज झाले आहे.
जी परमेश्वरा, के एच मुनियप्पा, के जे जॉर्ज, एम बी पाटील, सतीश जारकीहोली, प्रियांक खर्गे, रामलिंगा रेड्डी आणि बी झेड जमीर अहमद खान यांनी सिद्धरामय्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी या मंत्र्यांना शपथ दिली.
मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत काँग्रेसने दिलेले आश्वासन पाळण्यात येणार असल्याची ग्वाही राहुल गांधी यांनी दिली होती. त्यामुळे त्यामुळे आता मंत्रिमंडळ बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
कर्नाटकच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, विधानसभेत फक्त ४ टक्के महिला आमदार!
कर्नाटकात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार विराजमान झाले आहेत. त्यांचं पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळही ठरलं असून यामध्ये आठ मंत्र्यांचा समावेश आहे. काँग्रेसने निवडणूक प्रचारात महिला योजनांवर भर दिला होता. परंतु, त्यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात एकाही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने अनेक स्त्रीवाद्यांनी नारीज व्यक्त केली आहे.