कुटुंबव्यवस्था , दैनंदिन जीवन :
वेदकाळात एकत्र कुटुंबपद्धती होती. कुटुंबातील कर्ता पुरुष घराचा प्रमुख म्हणजे ‘गृहपती’ असे. गृहपतीच्या परिवारात त्याचे वृद्ध मातापिता, त्याचे लहान भाऊ आणि त्या भावांचे परिवार, त्याची पत्नी आणि मुले, त्या च्या मुलांचे परिवार अशा सर्वांचा समावेश असे. ही कुटुंबव्यवस्था पुरुषप्रधान होती.सुरुवातीच्या काळात लोपामुद्रा, गार्गी , मैत्रेयी अशा काही विद्वान स्त्रियांचे उल्लेख वैदिक साहित्यात आढळतात. परंतु हळूहळू स्त्रियांवरील बंधने वाढत गेली. त्यांचे कुटुंबातील आणि समाजातील स्थान अधिकाधिक दुय्यम होत गेले. वेदकाळातील घरे मातीची किंवा कुडाची असत. गवत किंवा वेलींचे जाडसर तट्टे विणून त्याच्या वर शेण-माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे ‘कूड’. या घरांच्या जमिनी शेणा-मातीने सारवलेल्या असत.घरासाठी ‘गृह’ किंवा ‘शाला’ हे शब्द वापरले जात. वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्या ने गहू, सातू, तांदूळ या तृणधान्यां चा समावेश होता. त्यां पासून ते विविध पदार्थ बनवत असत. वैदिक वाड्मयात ‘यव’, ‘गोधूम’, ‘व्रीहि ’ यांसारखे शब्द
आढळतात. यव म्हणजे सातू (बार्ली ). गोधूम म्हणजे गहू. व्रीही म्हणजे तांदूळ. दूध, दही, लोणी, तूप, मध हे पदार्थ त्यांच्या आवडीचे होते. उडीद, मसूर आणि तीळ तसेच मांस या पदार्थांचाही त्यांच्या आहारात समावेश होता. वेदकालीन लोक लोकरी आणि सुती वस्त्रे वापरत. वल्कले म्हणजे झाडांच्या सालींपासून तयार केलेली वस्त्रे ही वापरत. तसेच प्राण्यांच्या कातड्यांचाही उपयोग वस्त्र म्हणून केला जाई. स्त्रिया आणि पुरुष फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा,सोन्याचे दागिने वापरत असत. ‘निष्क’ नावाचा गळ्यातील दागिना विशेष लोकप्रिय असावा. त्याचा उपयोग वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठीही होई. गायन, वादन, नृत्य, सोंगट्यांचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार ही त्यांची मनोरंजनाची साधने होती. वीणा, शततंतू, झांजा आणि शंख ही त्यांची प्रमुख वाद्ये होती. डमरू आणि मृदंग ही तालवाद्ये ही ते वापरत असत
शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन :
वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता.अनेक बैल जुंपलेल्या नांगराने नांगरट केली जाई.नांगराला लोखंडाचा फाळ बसवत असत.अथर्ववेदामध्ये पिकावर पडणारी कीड, पिकाचा विध्वंस करणारे प्राणी आणि त्यांवरील उपाय यांचाही विचार केलेला आढळतो. खत म्हणून शेणाचा उपयोग केला जात असे. वैदिक काळात घोडा, गाय-बैल, कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व होते. गाईंचा विनिमयासाठी उपयोग केला जाई. त्या मुळे गाईंना विशेष किंमत होती. इतरांनी गाई चोरून नेऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेतली जाई. घोडा हा अत्यंत वेगाने पळणारा प्राणी. त्याला माणसाळवून रथाला जोडण्या त वेदकालीन लोक निष्णात होते. वेदकालीन रथाची चाके आऱ्यांची होती. भरीव चाकांपेक्षा आऱ्यांचे चाक वजनाने हलके असते. घोडा जोडलेले, आऱ्यांच्या चाकांचे वेदकालीन रथ अर्थातच खूप वेगवान होते.
त्या काळात शेती आणि पशुपालन यांच्या खेरीज इतर अनेक व्यवसायांचाही विकास झाला होता. व्यावसायिक, कारागीर समाजव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक होते. ‘श्रेणी’ या नावाने ओळखले जाणारे त्यांचे
स्वतंत्र संघ होते. अशा श्रेणींच्या प्रमुखाला ‘श्रेष्ठी ’ म्हणत असत. परंतु हळूहळू व्यावसायिक कारागिरांचा
दर्जा दुय्यम होत गेला. त्या काळात समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे वर्ण होते. हे वर्ण व्यवसायावरून ठरत. नंतरच्या काळात वर्ण जन्मा वरून ठरू लागले. त्यामुळे जाती निर्माण झाल्या. जाति व्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली.आदर्श आयुष्य कसे जगावे, यासंबंधीच्या काही कल्पना वेदकाळात रूढ झाल्या होत्या. त्यांमध्ये जन्मा पासून मृत्यू पर्यंतच्या चार टप्प्यां ना ‘चार आश्रम’
असे म्हटलेले आहे. पहिला आश्रम म्हणजे ‘ब्रह्मचर्याश्रम’. गुरूजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ. ब्रह्मचर्याश्रम यशस्वी रीतीने पार पाडल्या नंतरचा पुढचा टप्पा म्हणजे गृहस्थाश्रम. या काळात पुरुषाने कुटुंब आणि समाज यांच्या साठी असलेली आपली कर्तव्ये पत्नी च्या साहाय्या ने पार पाडावीत,अशी अपेक्षा असे. तिसरा आश्रम म्हणजे ‘वानप्रस्थाश्रम’. या टप्प्यावर त्याने घरादाराच्या मोहाचा त्याग करून दूरजावे, मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणी रहावे आणि अत्यंत साधेपणाने जगावे. चौथा आश्रम म्हणजे ‘संन्यासाश्रम’. या टप्प्या वर मनुष्या ने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्यजन्मा चा अर्थ समजावून घेण्या साठी जगावे, फार काळ एके ठि काणी राहू नये, असा संकेत होता.
धर्म कल्पना
वेदकालीन धर्म कल्पनांमध्ये निसर्गा तील सूर्य,वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यांसारख्या निसर्गा तील शक्तींना देवतारूप दिलेले होते. त्या जीवनदायी ठराव्या त म्हणून वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत. त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत. त्याला ‘हवी’ असे म्हणत. अशा तऱ्हेने अग्नीमध्ये ‘हवी’ अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ. सुरुवातीला यज्ञविधींचे स्वरूप साधे होते. पुढे त्यांचे नियम अधिकाधि क कठीण होत गेले. ते कठीण यज्ञविधी पार पाडणाऱ्या पुरोहितांचे महत्त्व त्यामुळे वाढत गेले. वेदकालीन लोकांनी सृष्टीचे व्यवहार कसे चालतात याचाही विचार केला होता. उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा. हे नियमित असणारे सृष्टि चक्र आहे. सृष्टि चक्र आणि त्याच्या गतीने फिरणारे जीवनचक्र याला वेदकालीन लोकांनी ‘ऋत’ असे नाव दिले. प्राणि मात्रांचे जीवन हाही सृष्टि चक्राचाच एक भाग आहे. सृष्टि चक्रात बिघाड झाल्या वर संकटे येतात. तसे होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. कोणीही सृष्टीचे नियम मोडू नयेत, असे वागणे म्हणजे धर्मा प्रमाणे वागणे, असे समजले जाई.
शासनव्यवस्था
वेदकाळात प्रत्येक ग्रामवसाहतीचा एक प्रमुख असे. त्याला ‘ग्रामणी’ असे म्हणत. अनेक ग्रामवसाहतींचा समूह म्हणजे ‘विश्’. त्याच्या प्रमुखाला ‘विश्पति ’ असे म्हणत. अनेक ‘विश्’ मिळून ‘जन’ तयार होत असे. पुढे जन जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले, तेव्हा त्या प्रदेशाला ‘जनपद’ म्हटले गेले.‘जन’च्या प्रमुखाला ‘नृप’ किंवा ‘राजा’ म्हटले जाई. प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे ही राजाची कर्तव्ये होती.
राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यास साहाय्य करण्यासाठी राजाने अधिकारी नेमलेले असत.पुरोहित
आणि सेनापती हे विशेष महत्त्वाचे अधिकारी होते. करवसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला ‘भागदुघ’ असे म्हणत. ‘भाग’ म्हणजे वाटा. ‘जन’च्या उत्पन्नातील राजाचा ‘भाग’ गोळा करणारा, तो भागदुघ. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी ‘सभा’, ‘समिती’, ‘विदथ’ आणि ‘जन’ अशा चार संस्था होत्या. त्यां मध्ये राज्या तील लोक सहभागी होत. ‘सभा’ आणि ‘विदथ’ या संस्थां च्या कामकाजात स्त्रियांचाही
सहभाग असे. राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळास ‘सभा’ म्हणत तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस
‘समिती’ असे म्हणत. समितीमध्ये लोकांचा सहभाग असे. पुढे वैदिक विचारप्रवाहात ‘स्मृति ’ व ‘पुराण’
नावाचे वाड्मय निर्माण झाले. वेद, स्मृती, पुराणे,स्थानिक लोकधारणा इत्यादींवर आधारलेला धार्मिक
प्रवाह कालांतराने ‘हिंदू’ या नावाने ओळखला जाऊ लागला.