विस्टाडोम डब्यांमुळे मध्य रेल्वेची करोडोची कमाई

MPSC TECH
0

 मध्य रेल्वेवरील विस्टाडोम डबे (पारदर्शक काचेचा डबा) जोडलेल्या एक्स्प्रेसला प्रवाशांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. गेल्या सहा महिन्यांत सहा एक्स्प्रेसच्या विस्टाडोम डब्यातून ६६ हजार पर्यटकांनी प्रवास केला असून याद्वारे मध्य रेल्वेला ८ कोटी ४१ लाख रुपये महसूल मिळाला आहे.

कोणकोणत्या रेल्वेला हा डबा जोडला आहे.  

मध्य रेल्वेवरील मुंबई – मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस आणि तेजस एक्स्प्रेस

मुंबई – पुणे मार्गावर प्रगती, डेक्कन क्वीन आणि डेक्कन एक्स्प्रेस

पुणे – सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेस

या डब्याची विशेषता :

 

या डब्यांना पारदर्शक मोठ्या काचेच्या खिडक्या आणि छत असल्यामुळे प्रवाशांना मुंबई – गोवा मार्गावरील धबधबे, नद्या किंवा मुंबई – पुणे मार्गावरील पश्चिम घाटाचे नैसर्गिक सौदर्य बघायला भेटते. तसेच दिव्यांगांसाठी रुंद बाजूचे सरकते दरवाजे, काचेचे छप्पर (टॉप), पुशबॅक आणि १८० डिग्रीमध्ये वळणारी एलसीडी या सर्व बाबींमुळे प्रवाशांना विस्टाडोम डब्यातून प्रवास करण्याचा वेगळाच आनंद मिळत आहे. त्यामुळे प्रवाश्याची पसंती भेटत आहे

प्रवासी संख्या  व उत्पन्न

नोव्हेंबर २०२२ ते एप्रिल २०२३ या सहा महिन्यांत मध्य रेल्वेच्या विस्टाडोम डब्यांमधून सुमारे ६६ हजार प्रवाशांनी प्रवास केला असून याद्वारे तब्बल ८ कोटी ४१ लाख रुपये महसूल रेल्वेला  मिळाले आहे   

कधी झाली या डब्याची सुरुवात ?

मध्य रेल्वेवरील मुंबई- मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला २०१८ रोजी सर्वात प्रथम विस्टाडोम डबा जोडण्यात आला. प्रवाशांच्या मागणीमुळे मुंबई – मडगाव मार्गावर धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसला सप्टेंबर २०२२ रोजी विस्टाडोम डबा जोडण्यात आला. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मुंबई – पुणे मार्गावरील डेक्कन एक्स्प्रेसला जून २०२१ रोजी, मुंबई – पुणे मार्गावरील डेक्कन क्वीनला ऑगस्ट २०२१ रोजी आणि प्रगती एक्स्प्रेसला जुलै २०२२ रोजी विस्टाडोम डबा जोडण्यात आला. पुणे – सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसलाही ऑगस्ट २०२२ रोजी विस्टाडोम डबा जोडण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)