जनपदे आणि महाजनपदे

MPSC TECH
0

जनपदे आणि महाजनपदे

 

जनपदे

साधारणपणे इ.स.पू. १००० ते इ.स.पू. ६०० हा कालखंड म्हणजे वैदिकोत्तर कालखंड मानला जातो. या काळात जनपदे अस्तित्वात आली. ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्ये होती. भारतीय उपखंडाच्या वायव्येला असलेल्या आजच्या अफगाणिस्तानपासून पूर्वेला बिहार, बंगाल, ओडिशा पर्यंतच्या प्रदेशात आणि दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती. आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या अश्मकया जनपदाने व्यापलेला होता. संस्कृत, पाली आणि अर्धमागधी साहित्यात या जनपदांची नावे आढळतात.ग्रीक इतिहासकारांच्या लिखाणातूनही त्या संबंधीची माहिती मिळते. त्यांतील काही जनपदांमध्ये राजेशाही होती. काहींमध्ये मात्र गणराज्य

होते. जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींची गणपरिषदअसे. गणपरिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राज्यकारभारासंबंधीचे निर्णय घेत असत. अशा चर्चा जिथे होत, त्या सभागृहास संथागारअसे म्हटले जाई. गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील होते. प्रत्येक जनपदाची स्वतंत्र नाणी होती. काही जनपदे हळूहळू अधिक बलशाली झाली. त्यांच्या भौगोलिक सीमा विस्तारल्या. अशा जनपदांना महाजनपदे म्हटले जाऊ लागले. साहित्यातील उल्लेखांच्या आधारे असे दिसते, की इ.स.पू.६व्या शतकापर्यंत महाजनपदांमध्ये सोळा महाजनपदांना विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. त्यांतही कोसल,वत्स, अवंती आणि मगध ही चार महाजनपदे अधिक सामर्थ्यवान होत गेली.

मगध साम्राज्या चा उदय

बिंबि साराचा मुलगा अजातशत्रू यानेही मगधाचा विस्तार करण्याचे धोरण स्वीकारले. त्याने पूर्वेकडील अनेक गणराज्ये जिंकून घेतली. अजातशत्रूच्या काळात मगधाची भरभराट झाली. त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता. गौतम बुद्धां च्या महापरिनिर्वाणानंतर अजातशत्रूच्या कारकिर्दीत राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली संगिती म्हणजेच परिषद झाली. अजातशत्रूच्या काळात मगधाच्या पाटलीग्राम या नव्या राजधानीचा पाया घातला गेला. पुढे हेच पाटलिपुत्र या नावाने प्रसिद्ध झाले. पाटलिपुत्र आजच्या पाटणा शहराच्या परिसरात असावे. अजातशत्रूनंतर होऊन गेलेल्या मगधाच्या राजांमध्ये शिशुनाग हा महत्त्वाचा राजा होता. त्याने अवंती, कोसल आणि वत्स ही राज्ये मगधाला जोडली. उत्तर भारताचा जवळजवळ सर्व प्रदेश मगधाच्या अमलाखाली आला. अशा रीतीने मगध साम्राज्य आकाराला आले.

मगध साम्राज्या चे नंद राजेः इ.स.पू. ३६४ ते इ.स.पू. ३२४ या काळात मगध साम्राज्यावर नंदराजांची सत्ता होती. एका मोठ्या साम्राज्याला आवश्यक अशी शासनव्यवस्था नंद राजांनी निर्माण केली. पायदळ, घोडदळ, रथदळ आणि हत्ती दळ असे चतुरंग सैन्य त्यांच्या पदरी होते. त्यांनी वजनमापांची प्रमाणित पद्धत सुरू केली.नंद घराण्या च्या शेवटच्या राजाचे नाव धनानंद असे होते. त्याच्या काळापर्यंत मगध साम्राज्याचा विस्तार पश्चिमेकडे पंजाबपर्यंत झाला होता.धनानंदाच्या कारकिर्दी त चंद्रगुप्त मौर्य या महत्त्वाकांक्षी तरुणाने पाटलिपुत्र जिंकून घेतले, नंद राजवटीचा शेवट केला आणि मौर्य साम्राज्याचा पाया घातला.

सोळा महाजनपदांची प्राचीन व आधुनिक नावे :

(१) काशी (बनारस),

(२) कोसल (लखनौ),

(३) मल्ल (गोरखपूर)

(४) वत्स (अलाहाबाद)

(५) चेदि (कानपूर),

(६) कुरु (दिल्ली),

(७) पांचाल (रोहिल खंड),

(८) मत्स्य (जयपूर),

(९) शूरसेन (मथुरा),

(१०) अश्मक (औरंगाबाद- महाराष्ट्र),

(११) अवंती (उज्जैन),

(१२) अंग (चंपा-पूर्व बिहार),

(१३) मगध (दक्षि ण-बिहार),

(१४) वृज्जी (उत्तर बिहार),

(१५) गांधार (पेशावर),

(१६) कंबोज (गांधारजवळ)

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)