जागतिक व्यापारातील भारताचा निर्यात टक्का घसरला

MPSC TECH
0

 जागतिक व्यापारातील भारताचा निर्यात टक्का घसरला

भारताचा औषध निर्माण, रत्ने व दागिने, चामडे आणि पादत्राणे या क्षेत्राशी संबंधित जागतिक व्यापारातील निर्यात टक्का २०१५ च्या तुलनेत २०२२ मध्ये घसरला आहे, असे थिंक टँक ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हच्या (जीटीआरआय) अहवालातून समोर आले आहे. मात्र या कालावधीत इलेक्ट्रॉनिक्स, यंत्रसामग्री, पेट्रोलियम, वाहन सुटे भाग, लोह आणि पोलाद आणि ॲल्युमिनियम उत्पादनांच्या निर्यातीत वाढ झाली आहे.

वर्ष २०२२ मध्ये जागतिक व्यापारात भारताचा वाटा १.८ टक्के होता. तर, २०१५ पर्यंत यंत्रसामग्री आणि विद्युत उपकरणांमध्ये वाटा अनुक्रमे ०.७५ टक्के आणि ०.४ टक्के राहिला होता. तयार कपडे, चामडे, पादत्राणे आणि सागरी उत्पादने यांसारख्या क्षेत्रातील भारताचा जागतिक बाजारपेठेतील हिस्सा कमी होत आला आहे. जागतिक व्यापारात इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार, मोबाइल फोन आणि विद्युत उपकरणे तसेच यंत्रसामग्री या प्रमुख क्षेत्रांचा वाटा जास्त आणि उलाढाल ६ लाख कोटी डॉलरपेक्षा अधिक आहे. तसेच भारताचा या क्षेत्रातील निर्यात वाटा हळूहळू सुधारत आहे,

भारतीय मालाच्या गुणवत्तेसंबंधी समस्या

भारतीय वस्तूंच्या गुणवत्तेची समस्या केवळ औषधनिर्मितीपुरती मर्यादित नसून त्याचा मत्स्य उत्पादनांवरही परिणाम झाला आहे. अनेक देश मत्स्य उत्पादनांना साल्मोनेलाच्या (एक प्रकारचा बॅक्टेरिया) उपस्थितीमुळे नाकारतात. गुणवत्तेच्या मुद्द्यांमुळे भारतीय चहाच्या निर्यातीवरही परिणाम झाला आहे, फायटोसॅनिटरी समस्या आणि परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त कीटकनाशकांचा वापर होत असल्याचे सांगून भारतीय चहाची खेप काही देशांनी रद्द करून माघारी पाठवली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)