टीसीएसच्या माध्यमातून राज्याच्या आरोग्य विभागात १० हजार ९४९ पदांवर भरती करण्यात येणार

MPSC TECH
0

 


 टीसीएसच्या माध्यमातून राज्याच्या आरोग्य विभागात १० हजार ९४९ पदांवर भरती करण्यात येणार

मुंबई पेपरफुटी आणि विविध घोटाळ्यांमुळे गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया आता पुन्हा सुरू होत आहे. या भरती प्रक्रियेतून १० हजार ९४९ पदे भरण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले. ही संपूर्ण भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS मार्फत राबविण्यात येणार आहे.

नवीन उमेदवारांच्या भरतीसाठी टीसीएस अनेक सरकारी विभागांना मदत करीत आहे. याआधी कंपनीने रेल्वेसाठी भरती परीक्षा, SSC परीक्षा, तलाठी भरती प्रक्रियेत सरकारला मदत केली होती. २०२१ मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात आरोग्य विभागात आयोजित केलेल्या भरती प्रक्रियेदरम्यान पेपरफुटीचा घोटाळा झाला होता. त्यानंतर ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आली. आता मंत्री तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने आरोग्य विभागात पुन्हा एकदा मेगा भरती सुरू होणार आहे. या भरती प्रक्रियेत क आणि ड संवर्गातील विविध प्रकारच्या ६० पदांवर एकूण १० हजार ९४९ जणांची भरती होणार आहे.

तसेच महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग राज्यातील घरोघरी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक ११५ सुरू करणार आहे, असे सावंत यांनी सांगितले. हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)