ऑकलंडमध्ये महिला फुटबॉल विश्वचषकाच्या उद्घाटनापूर्वी गोळीबार
ऑकलंडमध्ये झालेल्या जोरदार गोळीबारात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला, तर 6 जण जखमी झाले आहेत. या मोठ्या घटनेनंतर फिफा विश्वचषकात सहभागी होणारे संघ धास्तावले आहेत. स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.
पंतप्रधान ख्रिस हिपकिन्स यांनी न्यूझीलंडमधील गोळीबारावर शोक व्यक्त केला. नियोजनानुसार स्पर्धा पुढे होईल, असे ते म्हणाले. वृत्तसंस्थेनुसार, एका बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या गोळीबारात पोलीस अधिकाऱ्यांसह सहा जण जखमी झाले आहेत. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया एकत्र या स्पर्धेचे आयोजन करत आहेत.