उत्तर मध्य रेल्वेत भरती सुरू, १० वी पास आणि ITI उमेदवार करु शकतात अर्ज

MPSC TECH
0

 


उत्तर मध्य रेल्वेत भरती सुरू, १० वी पास आणि ITI उमेदवार करु शकतात अर्ज

उत्तर मध्य रेल्वेने प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १,६९७ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उत्तर मध्य रेल्वे भरती २०२३ साठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

उत्तर मध्य रेल्वे भरती २०२३

पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी

एकूण पदसंख्या-,६९७

वयोमर्यादा – १५ ते २४ वर्षे

अर्ज शुल्क –

    सामान्य/ओबीसी – १०० रुपये.

    SC/ST/PWD/स्त्री – शुल्क नाही.

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ डिसेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट – https://www.rrcpryj.org/

शैक्षणिक पात्रता –

    ५० टक्के गुणांसह १० वी पास.

    संबंधित विषयात आय.टी.आय.

असा करा अर्ज –

    तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करा.

    अर्ज करण्यापुर्वी सूचना काळजीपूर्वक वाचा.

    एकापेक्षा जास्त ट्रेडमध्ये ITI पात्रता असलेले अर्जदारांनी संबंधित ट्रेडसाठी स्वतंत्रपणे अर्ज करा.

    शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

 

https://drive.google.com/file/d/18aJ37Qx-nW9Wsk8VKjhuxvUGO7I5pin5/view?usp=sharing

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)