पुण्यात नोकरीची संधी! NARI अंतर्गत भरती सुरु

MPSC TECH
0

 


पुण्यात नोकरीची संधी! NARI अंतर्गत भरती सुरु

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे अंतर्गत ‘प्रकल्प तंत्रज्ञ -III, संशोधन अधिकारी (फील्ड), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, संशोधन सहाय्यक’ पदांच्या एकूण ६ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी भरती जाहीर करण्यात आली असून पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ आणि ७ डिसेंबर २०२३ ही आहे. तर या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव – प्रकल्प तंत्रज्ञ -III, संशोधन अधिकारी (फील्ड), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, संशोधन सहाय्यक.

एकूण पदसंख्या – ६

शैक्षणिक पात्रता –

तंत्रज्ञ III – १२ वी पास.

संशोधक अधिकारी (फील्ड) : जीवन विज्ञान आणि आरोग्य विज्ञानातील प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ : विज्ञान विषयात १२ वी पास आणि वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ या विषयात दोन वर्षांचा डिप्लोमा

संशोधन सहाय्यक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान/समाजशास्त्र/सामाजिक कार्य/मानवशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/आरोग्य विज्ञान या विषयातील पदवीधर, मान्यताप्राप्त संस्थेतून तीन वर्षांचा कामाचा अनुभव.

नोकरीचे ठिकाण – पुणे

वयोमर्यादा –

  • प्रकल्प तंत्रज्ञ -III, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, संशोधन सहाय्यक – ३० वर्षे
  • संशोधन अधिकारी (फील्ड) – ३५ वर्षे

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ आणि ७ डिसेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट –

https://www.nari-icmr.res.in/

महिना पगार –

  • प्रकल्प तंत्रज्ञ -III – २० हजार रुपये.+ HRA
  • संशोधन अधिकारी (फील्ड) – ६४ हजार रुपये.
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – १८ हजार रुपये.
  • संशोधन सहाय्यक – ३१ हजार रुपये.

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकला अवश्य भेट द्या.

https://www.nari-icmr.res.in/Nari/Career

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)