र्लॉड हेस्टिंग्जची कारकिर्द (१८१३-१८२३) :

MPSC TECH
0




कंपनी सरकारच्या
तटस्थ धोरणाचा फायदा घेऊन नेपाळच्या राजाने भूतानपासून सतलजपर्यतचा प्रदेश आपल्या
ताब्यात आणून कंपनीच्या सपाटीच्या प्रदेशावर आक्रमण करावयास सुरुवात केली होती.
त्यामुळे हेस्टिंग्जने नेपाळशी युध्द करुन गुरखा फौजेचा पराभव केला व मार्च १८१६
च्या तहानुसार नेपाळपासून तराई
, गढवाल व कुमाऊ हा प्रदेश
ताब्यात घेतला. यानंतर इंग्रज व नेपाळ यांच्यात कायमचे मित्रत्व निर्माण झाले. हेस्टिंग्जने
(१८१७-१८१८) या काळात पेंढात्यांचा योग्य बंदोबस्त केला. यासाठी त्यास शिंदे व
भोसले यांची मदत मिळाली होती.







वसईच्या तहानंतर
इंग्रजांच्या संरक्षणाखाली पेशवे पद मिळाल्यानंतर बाजीरावास फार बरे वाटू लागले
पागोटेवाल्या मराठयांपेक्षा टोपीवाले इंग्रज हेच खरे आपले मित्र आहेत. असे त्याचा
समज झाला होता. त्या वेळी पुण्याचा इंग्रज रेसिडेंट कर्नल क्लोज बाजीरावाशी अत्यंत
प्रेमाने वागत असे पुढे १८११ मध्ये कर्नल क्लोजच्या जागी एल्फिन्स्टनने
बाजीरावाच्या जहागीरदारांविरुध्द असलेल्या भूमिकेला विरोध केला एवढेच नव्हे
, तर दक्षिणेतील जहागीरांना संरक्षण देण्याचे ठरविले त्यामूळे बाजीराव व
एल्फिन्स्टन यांच्यात संघर्षाला सुरुवात झाली.


बाजीराव आणि
इंग्रजाचे संबंध बिघडण्यास आणखी एक घटना कारणीभूत झाली बडोद्याच्या गायकवाडाकडे
पेशव्याच्या खंडणीची जवळजवळ तीन कोटी रुपयांची बाकी थकलेली होती. त्या संदर्भात
बोलणी करण्यासाठी फत्तेसिंग गायकवाडने इंग्रजांच्या संरक्षणाखाली गंगाधरशास्त्री
पटवर्धन नावाच्या वकिलास पुण्यात पाठवले. १८१४ खंडणीबाबत बोलणी करणे हा बाजीरावाचा
दुय्यम हेतु होता. बडोद्याच्या गायकवाडावर वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी या निमित्ताने
बाजीरावाने साधली होती. ही गोष्ट एल्फिन्स्टनच्या लक्षात येताच त्याने हस्तक्षेप
करण्यास सुरुवात केली. बाजीरावाने आपल्या वतीने बोलणी करण्यासाठी त्रिंबकजी डेंगळे
यांची नेमणूक केली होती. ही बोलणी असफल होण्याची चिन्हे दिसत असतानाच २० जूलै १८१५
रोजी गंगाधरशास्त्री पटवर्धनाचा पंढरपुर येथे भजनदास चौकात खून झाला.
एल्फिन्स्टनने या खुनाबाबत त्रिंबकजीस कैद करुन इंग्रजांच्या ताब्यात दिले
इंग्रजांनी त्रिबंकजीस ठाण्याच्या तुरुंगात टाकले. या घटनेमुळे इंग्रजांचा राग
येऊन बाजीरावाने अंतस्थपणे इंग्रजाविरोधी कारवाया करण्यास सुरुवात केली.
दरम्यानच्या काळात १२ सष्टेंबर १८१६ रोजी त्रिबंकजी ठाण्याच्या तुरुंगातून निसटले
आणि नाशिक जिल्हयातील निंबगाव मार्गे महादेव डोंगर खोऱ्यात पळून गेले.
इंग्रजाविरुध्द उठाव करण्याची फार मोठी योजना त्रिबंकजीच्या कारस्थानामागे असावा
असा एल्फिन्स्टनेने पेशव्यास त्रिबंकचा बंदोबस्त करण्यास सांगितले दुसरा बाजीराव
हा बंदोबस्त करण्यास असमर्थ ठरल्याने त्याचाच हात त्रिबंकच्या कारस्थानामगे असावा
असा एल्फिन्स्टनला संशय आला. त्याने गव्हर्नर जनरलच्या परवानगीने बाजीरावावर अधिक
नियंत्रण प्रस्थापित करण्याचे ठरविले ७ में १८१७ त्यानंतर १३ जून १८१७ रोजी
बाजीरावाकडून सक्तीने तह करुन घेतला. हाच पुण्याचा तह होय. त्यानुसार (१) त्रिबंकजी
डेंगळेस गंगाधरशास्त्रीचा खुनी म्हणून जाहिर करण्यात आले.


(२) मराठा मंडळावरील
बाजीरावाने अधिकार सोडावा


(३) परराज्यातील आपले
वकील परत बोलावून घ्यावेत


(४) ३४ लाख रु देऊन
तैनाती फौजेत वाढ करावी. अशा अपमानकारक अटी बाजीरावाला मान्य कराव्या लागल्या.


बाजीरावास जाग आली
:


पुण्याचा तह
झाल्यानंतर बाजीराव खडबडून जागा झाला. त्याने शिंदे होळकर आणि भोसले यांच्याशी
संधान बांधण्याचे प्रयत्न सुरु केले
, पण त्यात
त्याला यश आले नाही. पेशव्याचा सेनापती बापू गोखले होता. पेशव्याबरोबर युध्द चालू
असताना र्लॉड हेस्टिंग्ज या गव्हर्नर जनरलेने शिंद्यांवर नवा तह लादून होळकरांचा
महीदपूरच्या लढाईत आणि भोसल्यांचा सिताबर्डीच्या लढाईत पराभव करुन हेस्टिगने
बाजीरावाला एकाकी पाडले.


तिसरे इंग्रज
मराठा युध्द : (१८१८) :


बापू गोखले याने ५
नोव्हेंबर १८१७ रोजी इंग्रज रेसिडेन्सीवर हल्ला करुन इंग्रजाविरुध्द युध्द
पुकारले. खडकी व येरवडा येथील युध्दात पेशव्यांच्या सेनेला पराभव पत्कारावा लागला.
बाळाजी पंत नातूसारखे अनेक लोक इंग्रजांना सामील झाले. पुणे शहर इंग्रजांनी
ताब्यात घेतल्यावर याच बाळाजीपंताने १७ नोव्हेंबर १८१८ रोजी शनिवारवाडयावर
इंग्रजाचे युनियन जॅक हे निशाण लावले स्वत: बाजीराव यात जीव वाचविण्यासाठी पुरंदर
सिंहगड माहूली अशा किल्ल्यांवरून पळत होता. कोरेगावच्या लढाईत पराक्रमाची शर्थ
करुन बापू गोखलेने विजय मिळविला. (१ जानेवारी १८१८) हा पेशव्याच्या लष्कराचा
शेवटचा विजय होय. त्यानंतर १९ फेब्रुवारी १८१८ रोजी जनरल स्मिथ आणि बापू गोखले
यांच्यात पंढरपुरजवळ आष्टी येथे घनघोर लढाई होऊन त्यात बापू गोखले मारला गेला. आणि
इंग्रजांचा विजय झाला. आता बाजीरावास कोणाचाही आधार उरला नाही उत्तरेकडे पळून जात
असताना नर्मदेच्या परिसरात धुळकोट जवळ इंग्रजानी त्याला घेरले शेवटी ३ जून १८१८
रोजी बाजीराव स्वत: जॉन माल्कमच्या स्वाधीन झाला इंग्रजांनी त्याचे पेशवे पद खालसा
करून ८ लाख वार्षिक पेन्शन मंजूर केली. पेशवे पद गमावलेला बाजीराव कानपूर जवळ
ब्रम्हावर्त (बिठून) या ठिकणी पेन्शनचा उपभोग घेत १८५१ पर्यत जगला २८ जानेवारी
१८५१ रोजी त्याचा मृत्यू झाला.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)