उठावाचे परीणाम
१ नोव्हेंबर १८५८ ला
विद्रोह दडपल्यानंतर या उठावाने भारतीय इतिहासाला कलाटणी मिळाली. हिंदुस्थानचा
राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून इंग्लंडच्या संसदेकडे सोपविण्यात आला. ब्रिटिश
संसदेने संपुर्ण हिंदुस्थानचा कारभार राणी व्हिक्टोरियाकडे दिला व देशातील कंपनी
राज संपुष्टात आले. इंग्लंडचा राजा हिंदुस्थानचा बादशहा झाला. कंपनीचे ‘बोर्ड ऑफ कंट्रोल’ रद्द करून ‘इंडिया
कौन्सिल’नेमण्यात आले. सैन्याची पुनर्रचना करण्यात आली.
संस्थानिक व सरकार ह्यांच्यातील संबंध सुधारण्याचे प्रयत्न झाले. उठाव शमल्यानंतर
कॅनिंगने शांतता प्रस्थापित केली. गव्हर्नर जनरल कॅनिंग हा पहिला व्हाइसरॉय
झाला.पुढील काळातील भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात या उठावाची पहिले
स्वातंत्र्ययुद्ध म्हणून स्मृती जागी ठेवण्यात आली.