कॉर्नवॉलिसची कारकिर्द (१७८६-१७९३) :
हा अत्यंत कार्यक्षम
असा गव्हर्नर जनरल होऊन गेला. त्यांने राज्याच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप
करण्याचे टाळले. पण त्यास टिपूशी युध्द करावे लागले.(१७९०-१७९२) या युध्दात मराठे
व निजाम यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली. होती.
१७९२ च्या श्रीरंगपटटमच्या तहाने
हे युध्द संपले. या वेळी टिपूला अर्धे राज्य व साडेतीन कोटी रुपये द्यावे लागले.
इंग्रजांना मलबार कुर्ग, बारा महाल इ. प्रदेश मिळाले.
कॉर्नवालिसने कंपनीच्या राज्यकारभारात महत्वाच्या सुधारण केल्या त्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांचे
पगार वाढवले, पण त्यांचा खासगी व्यापार बंद केला. भ्रष्टाचाराचे
निर्मूलन केले, न्यायव्यस्थेत बदल करण्यासाठी कॉर्नवॅालिसने
कोड ची निर्मिती केली. बंगाल सुभाषांतरांवरूनयात कायमधारा पध्दती लागू केली.
र्लॉड कॉर्नवॉलिसनंतर
आलेल्या सर जॉन शोरने (१७९३-१७९८) तटस्थतेचे धोरण स्वीकारले. जेव्हा मराठयांनी
निजामावर हल्ला केला व खडर्याच्या लढाईत त्याचा पराभव केला (१७९५) तेव्हा शोरने
त्यास मदत करण्यास नकार दिला.