वॉरन हेस्टिंग्जची कारकिर्द (१७७२ ते १७८५)
१७७२ वॉरन हेस्टिंग्ज
बंगालचा गव्हर्नर म्हणून भारतात आला. त्या वेळी कंपनीची आर्थिक स्थिती खूप खालावली
होती. खजिना रिकामा पडला होता. कंपनीच्या अधिकाऱ्यात लाचलुचपत वाढली होती.
बंगालमध्ये अराजकाता वाढली होती. शहा आलम बादशहाने मराठयांचा आश्रय घेतला होता.
मराठे व हैदर यांच्या सल्तनत या काळात प्रबळ होत्या. हेस्टिंग्जने अनेक महत्वाच्या
सुधारण केल्या. त्यांने व अयोध्येच्या बेगमांचे प्रकरण यात भ्रष्ट मार्गाचा अवलंब
करुन त्याने कंपनीस प्रचंड पैसा मिळवून दिला. पण त्यामुळे कंपनीची बदनामी झाली.
वॉरन हेस्टिग्जंच्या
काळात पहिले इंग्रज मराठा युध्द (१७७८ ते १७८२) उदभवले. नारायणराव पेशवे यांच्या
खुनानंतर राघोबादादा इंग्रजांच्या आश्रयास गेले. इंग्रजांनी मराठयांच्या राजकारणात
या निमित्ताने भाग घेतला त्यातून झालेल्या युध्दात इंग्रजांना अपयश आले.
सालबाईच्या तहाने (१७८२) हे युध्द थांबले. दक्षिणेत म्हैसूरचे राज्य गिळंकृत करुन
हैदरअलीने आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले होते. त्याच्या बरोबर (१७६६ ते १७६९)
या काळात इंग्रजांचे पहिले युध्द झाले. पण इंग्रजांना त्यात यश मिळाले नाही.
हैदरशी दुसरे युध्द १७८० मध्ये सुरु झाले. हैदरने इंग्रजांशी पराक्रमाने तोंड
दिले. हैदरचा १७८२ मध्ये मृत्यू झाल्यावर त्याचा मुलगा टिपू याने हे युध्द सुरु
ठेवले शेवटी १७८४ साली मंगलोरच्या तहाने इंग्रजांना फारसा फायदा न होता हे युध्द
थांबले.