कंपनीची लष्कर व्यवस्था १७५७-१८५७ :

MPSC TECH
0




कंपनी शासनाचा शक्तीशाली
आधार म्हणजे लष्कर होय.लष्करी शक्तीवर त्यांनी अंतर्गत व बाहय शत्रूंचा बिमोड करुन
हिंदुस्थावर राज्य स्थापन केले. राजकीय सत्तेला उद्भवणाऱ्या धोक्याचा शेवट
करण्याच्या हेतुने अनेक ठिकाणी लष्करी ठाणी उभारुन सरकारला मदत केली.


भारतातील ब्रिटिश
लष्काराचे उद्देश :


(अ) ब्रिटिश
प्रदेशातील व भारतीय संस्थानातील जनतेने उठाव केल्यास ते दडपण्यासाठी
संस्थानिकांना मदत करणे


(ब) चोर, लुटारु, दरोडेखोर, इ. रस्ते
सुरक्षित ठेवणे


(क) व्यापार्यांना
रक्षण देणे


(ड) भारतीय
राज्यकर्त्यानी कमी केलेल्या सैनिकांनी ब्रिटिश सैन्यात सामावून घेणे.






कंपनी लष्करातील
विभाग :


राजाचे लष्कर :-
इंग्लंडमधील ब्रिटिश लष्करातील एक हिस्सा कंपनीच्या मदतीसाठी भारतात पाठविण्यात
आला. त्या युरोपीय सैनिकांचा सर्व खर्च कंपनीने म्हणजे भारतीय महसूलातून केला जात
असे.


हिंदी लष्कर :


कंपनीचे स्वत:भारतीय
लोकांची भरती करुन निर्माण केंलेले लष्कर म्हणजे हिंदी लष्कर होय.


लष्करामध्ये भारतीयांना
प्रवेश देण्याचे कारण :


(१) कंपनीच्या
सेवेसाठी मोठे लष्कर इंग्लंडमधून आणणे शक्य नव्हते.


(२) युरोपियन फौजांचा
खर्चही फार मोठा होता.


(३) नेपोलियनमुळे
युरोपमध्ये युध्द सुरु असल्याने इंग्लंडच्या सुरक्षिततेसाठी मोठया लष्कराची गरज
होती.


(४)भारतात चांगल्या
दर्जाचे सैनिक मोठया संख्येने उपलब्ध होते. अनेक जातींच्या व टोळयांचा मुख्य
व्यवसाय सैनिकांचा होता.


(५) शिस्त, प्रशिक्षण, शूर असे भारतीय राज्यकर्त्याच्या
विसर्जित करण्यात आलेल्या लष्करातील लोक मोठया प्रमाणात होते.


दोन्ही लष्कर
विभागातील तफावत :


राजाचे लष्कर यामधील
अधिकारी स्वत:ला श्रेष्ठ समजत असत. त्यांना पगारही जादा असे यामध्ये युरोपीय सैनिक
असे हिंदी लष्करातील सैनिकांना दुय्यम स्थान असून पगारही कमी होती १८५६ मध्ये
कंपनीकडेही २
,७५,००० हिंदी
लष्कारात ३००रु पगाराचे फक्त ३ अधिकारी होते. १८५७ च्या उठावाच्यावेळी कंपनीकडे ३
,११,३७४ लष्करामध्ये फक्त ४५,५२२
एवढेच युरोपिय होते.


लष्कराची
पुर्नरचना आणि नियंत्रण :


सरकारी क्षेत्रात
उच्च पदावर व साधारण जबाबदारीच्या पदावर भारतीयांची नियूक्ती केली जाई. भारतीय सैन्याच्या
तुकडयांच्या निम्म स्तरावरील नेतृत्व पदही अतिसमान्य युरोपियांची नियूक्ती केली
जात असे. १७९०-९६ या काळात लष्काराची पुर्नरचना केली. त्यानुसार हिंदी शिपायांच्या
एका तुकडीवर ९ युरोपीय युरोपीय अधिकारी होते. घोडदलाच्या एका तुकडीवर २० युरोपीय
अधिकारी होते.


लष्करातील जबाबदाऱ्या
:


(अ) पोलिस
अंतर्गत क्षेत्रात गोंधळ
, उठाव,झाल्यास
लष्कराला जावे लागे.


(ब) सरकारी खजिना
किंवा अन्य मौल्यवान माल वाहतूक प्रसंगी संरक्षण देणे


(क) सर्वेक्षण करणे, लोहमार्ग,रस्ते, यांच्या
बांधकामासाठी मदत करणे
,


(ड) सार्वजनिक
आरोग्य जंगल जलसिंचन जमीन महसूल इ. विभागांना गरजेनुसार उपयोग करणे



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)