उठावची प्रमुख केंद्रे

MPSC TECH
0


दिल्ली - प्रमुख
व्यक्ति

बहादूरशहा जफर व बख्त खां तारीख 11,12 मे 1857 


कानपुर - प्रमुख
व्यक्ति

नानासाहेब व तात्या टोपे - तारीख—5 जून 1857 


लखनौ - प्रमुख
व्यक्ति

बेगम हजरत महल - तारीख—4 जून 1857  


झांसी - प्रमुख
व्यक्ति

रानी लक्ष्मी बाई  - तारीखजून 1857 


इलाहाबाद - प्रमुख
व्यक्ति

लियाकत आली 


जगदीशपूर - प्रमुख
व्यक्ति

कूंवर सिंह


बरेली प्र मुख व्यक्ति खान बहादुर खां


फैजाबाद - प्रमुख
व्यक्ति

मौलवी अहमद उल्ला


फतेहपुर - प्रमुख
व्यक्ति

आजीमुल्ला 




मीरत मधील उठाव


बराकपूरच्या लष्करी
छावणीमध्ये मंगल पांडे यांस फाशी देण्यात आले.मंगल पांडेच्या फाशीची बातमी
देशभरातील लष्करी छावण्यात वणव्यासारखी पसरली.काडतूस प्रकरणामुळे हिंदी शिपायांत
संतापाची एकच लाट उसळली आणि यामधून
3 मे रोजी
लखनौ व
5 मे रोजी अयोध्या येथील लष्करी तुकाडयांनी काडतूसे
वापरण्यास स्पष्ट नकार दिला.ब्रिटिशांनी अशा शिपायांवर कठोर कारवाई केली. अनेकांना
सक्त मजुरीची शिक्षा झाली माीरतच्या छावणीमध्ये इ.स.
9 में 1857 रोजी 85 शिपायांनी काडतुसे वापरण्यास स्पष्ट नकार
दिला.लष्करी आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी या सर्व शिपायांना सक्त मजुरीची शिक्षा
झाली. त्यांनी
10 में 1857 रोजी
सायंकाळी उठावास सुरुवात केली.इंग्रज अधिकाऱ्या ना ठार केले लगेचच तुरुंग फ़ोंडून
भारतीय कैद्यांची मुक्तता केली.मीरत उठाववाल्यांच्या ताब्यात येताच कंपनी सरकारचे
राज्य खालसा झाल्याची घोषणा करण्यात आली.हिंदी सैनिकांनी दुसऱ्या च दिवशी चौसष्ठ
कि.मी. अंतर कापून दिल्ली गाठली. मार्गामध्ये हजारो नागरिक उठाववाल्यांना येऊन
मिळाले.


दिल्ली मधील उठाव


मीरतहून आलेली फौज
दिल्लीत प्रवेश करताच येथील इंग्रजांच्या छावणीतील हिंदी शिपाई उठाववाल्यांना येऊन
मिळाले. मोगल बादशहाचे साम्राज्य इंग्रजांनी घश्यात घातले होते. परंतु
भारतीयांच्या मनात त्या वैभवशाली साम्राज्यांच्या आठवणी अजून जाग्या
होत्या.त्यामुळे उठाववाल्यांनी उठावाच्या नेतृत्वाची धुरा बादशहा बहादूरशहाला धोका
वाटत असतानाही बंडवाल्यापुढे त्यांचा नाईलाज झाला.


11 में रोजी
बंडवाल्यांनी आपल्या दिल्लीतील आगमनाबरोबर दिल्लीतील इंग्रजांच्या कत्तलीस सुरुवात
केली.    उठाववाल्यांनी दिल्लीतील
दारुगोळयाच्या कोठाराकडे धाव घेतली पुढील धोका ओळखून ब्रिटिश शिपायांनी कोठारास आग
लावली. प्रचंड स्फोट झाला. या स्फोटात शेकडो लोक मृत्यूमुखी पडले. अवघ्या
24 तासात दिल्ली उठाववाल्यांचा ताब्यात आली. बादशहा बहादूरशहा यांस भारताचा
सम्राट म्हणून घोषित करण्यात आले.उठावाचे गांभीर्य लक्षात घेऊन गव्हर्नर जनरल
लॉर्ड  कॅनिंग याने ब्रिटिश साम्राज्यामधून
1 लक्ष 20 हजार सैनिक बोलावून घेतले.
तसेच भारतातही पंजाबी
, गुरखा, शीख,
रजपूत, यांची नव्याने भरती करून 3 लक्ष 10 हजार फौज तयार केली इंग्रजांनी दिल्ली
ताब्यात घेण्यासाठीच्या हालचाली सूरू केल्या तर बहादूरशहा व बंडवाले दिल्ली
इंग्रजांच्या ताब्यात जाऊ नये यासाठी दक्ष होत. 
इंग्रजांनी जून
1857 मध्ये 65
हजारांची फौज दिल्लीभोवती गोळा केली मानसशास्त्रीय दबाव ठेवण्यासाठी  जिंकणे 
इंग्रजांना आवश्यक वाटू लागले.


15 सप्टेंबर 1857 रोजी बंडवाले व इंग्रज यांच्यामध्ये युध्दास तोंड फुटले बंडवाल्यांनी 10 दिवस निकराने झुंज दिली. परंतु ब्रिटिशांच्या पुढे त्यांचा निभाव लागला
नाही.
25 सप्टेंबर 1857 मध्ये दिल्ली
इंग्रजांच्या हाती आली.


दिल्ली ताब्यात येताच
दहशत बसविण्यासाठी इंग्रजांनी अमानुषपणे कत्तल सुरु केली ब्रिटिशांनी लाल
किल्ल्याचा ताबा घेतला. बादशहा बाहदूरशहा यास कैद करुन एका हुजऱ्या च्या कोठीत
डांबले.


कानपूर मधील उठाव


मीरत व दिल्ली येथील
उठावाच्या यशस्वी वाटचालीमुळे सर्वच लष्करी छावण्यात अस्वस्थता निर्माण झाली.अशाच
अस्वस्थ झालेल्या कानपूरमधील एका गोऱ्या 
शिपायाने
5 जून 1857 रोजी हिंदी शिपायांवर गोळया झाडल्या यामूळे कानपूरमधील हिंदी शिपायांनी
बंड पुकारले नानासाहेब येथील उठाववाल्यांचे नेते बनले कानपूरमधील इंग्रजांनी एका
खंदक असणाऱ्या  इमारतीचा आश्रय घेतला.


नानासाहेबांनी या
इमारतीस वेढा दिला इंग्रजांनी मोठया धैऱ्या ने
21
दिवस उठाववाल्यांचा प्रतिकार केला शेवठी नानासाहेबांशी करार करून इंग्रजांनी आपली
सुटका करुन घेतली.
1 जूलै 1857 रोजी
कंपनी राजवट संपुष्टात येऊन नानासाहेब पेशवा बनल्याचे घोषित करण्यात आले.
इंग्रजांना कानपूरमधील उठावाची बातमी समजताच कानपुरच्या दिशेने इंग्रज फौज धावू
लागली.
12 जुलै 1857 रोजी तुंबड युध्द
झाले इंग्रजांच्या तोफखान्यापुढे नानाचा निभाव लागला नाही.
17 जुलै रोजी इंग्रजांनी कानपुरवर ताबा मिळविला. अवध संस्थानच्या माध्यामातून
पुन्हा कानपुरवर ताबा मिळविण्यात नानासाहेब व तात्या टोपे यशस्वी झाले मात्र फार
काळ त्यांना कानपूर टिकविता आले नाही. ब्रिटिश अधिकारी जनरल कॅम्पबेलने पुन्हा
नानासाहेब व तात्या टोपे यांचा पराभव करुन कानपूर मिळविले.


          यानंतर नानासाहेब नेपाळमध्ये आश्रयासाठी निघून गेले तर मागे सेनापती
तात्या टोपे मात्र जवळ जवळ दहा महिने इंग्रजांविरुध लढत होते. पंरतु फिरतिमुळे
त्यांचाही घात झाला. इंग्रजांनी त्यांना पकडले व
18 एप्रिल 1859 रोजी फासावर लटकविले.


लखनौ मधील उठाव


लॉर्ड  डलहौसीने अयोध्या (औंध/अवध) संस्थान खलसा केले.
30 मे 1857 रोजी अयोध्या संस्थानात उठावास सुरुवात
झाली अयोध्या संस्थानच्या नवाबाच्या हजरत महल या बेगमने बंडवाल्याचे नेतृत्व केले
आपल्या अल्पवयीन मुलास गादीवर बसवून इंग्रज राज्य समाप्त झाल्याचे जाहीर केले.
ब्रिटिश सेनापती हॅव लॅक मोठी फौज घेऊन सप्टेंबर
1857 मध्ये
लखनैास आला.    बंडवाल्यांशी लढा देऊन
17 नोव्हेंबर 1857 रोजी बंडवालयांचा ब्रिटिश  रेसिडेन्सी 
भोवतीचा वेढा उठविला.


          इंग्रजांनी ताकद वाढत असतानाच ब्रिटिश सेनानी जनरल कॅम्बेल 20 हजारांची फौज घेऊन लखनौस पोहोचला. त्यांनी बंडवाल्याशी मुकाबला
दिला.  बेगम हजरत महल च्या नेतृत्वाखाली
बंडवाल्यांनी दिलेला लढा कौतुकास्पद आहे.   
शेवटी
22 मार्च 1857 रोजी
ब्रिटिशांनी लखनौ मिळविण्यात यश मिळविले.


बिहार मधील उठाव


पाटणजवळ दानापूर येथे
ब्रिटिशांनी फौज होती येथील ब्रिटिश अधिकारी लॉर्ड  याने आपल्या छावणीतील हिंदी शिपायांत उठावाची
लागण होऊ नये म्हणून त्याने शिपायांना निशस्त्र करण्याचा निर्णय घेतला हिंदी सैनिक
शस्त्रे खाली ठेवण्यास आणि गोऱ्या ची फौज तेथे येण्यास एकच गाठ पडली.आपणास
नि:शस्त्र करुन लॉईड आपली कत्तल करणार अशी भीती हिंदी शिपायांना वाटल्याने त्यांनी
हाती शस्त्रें घेतले व गोऱ्या  फौजेवर
गोळीबार सुरु केला.लॉर्ड ड हतबल झाला. त्यांची जमीनदार राणा कुंवरसिंग
ब्रिटिशांच्या विरोधात बंड करुन उठला. इंग्रजांकडून झालेल्या अन्यायाची संधीच
उठावाच्या रुपाने राणा कुवारसिंहाला चालून आली.उठाववाल्यांनाही कुंवरसिंहाच्या
रुपाने नेता मिळाला इंग्रजांशी त्यांनी दिलेला लढा तरुणांनाही लाजवेल असा होता.
ब्रिटिशांशी लढता लढता इ.स.
1857 मध्ये कुंवरसिंह मरण
पावला.


महाराष्ट्रात घडून
आलेले काही महत्वपूर्ण उठाव


रंगो बापुजी
गुप्ते सातारा  


साताऱ्या चा राजा
प्रतापसिंह याचा वकील. प्रतापसिंहचे सरकार खालसा होवू नये म्हणून प्रयत्न केला.
यासाठी सतत इंग्लंड मध्ये
12 वर्ष वास्तव्य इंग्रजांनी
मागणी मान्य न केल्यामुळे भारतात परतल्यावर इंग्रजांविरुद्ध सशस्त्रं उठावाची
योजना रंगो बापूजीने बनवली. मांग
, रामोशी, कोळी, यांना भरती करून छुपे सैन्य उभारले. सातारा व महाबळेश्वर
येथे उठावाची योजना होती. परंतु उठाव फसला
, योजना यशस्वी
झाली नाही.


कोल्हापुरातील उठाव


जुलै 1857,
21 व्या आणि 28 व्या रेजिमेंटमधील भारतीय
सैनिकांचा उठाव.
2. डिसेंबर 1857 – कोल्हापूर
छत्रपतीला लहान भाऊ चिमा साहेबाच्या नेतृत्वाखाली उठाव केला बेळगाव
, धारवाडा, कोन्हार परिसरातील हिंदी शिपायांनी योजना
आखली पण हा उठाव फसला वरील दोन्ही उठाव मोडून काढण्यात पोर्तुगीज सेनापती जेकबने
सहाय्य केले.


मुधोळमधील
बेरडांचा उठाव


1857 ल लागू
केलेल्या शस्त्रबंदी कायद्यानुसार भारतीयांना विनापरवाना शस्त्र वापरण्यास बंधी घातली.या
शस्त्रबंदी कायद्याच्या विरुद्ध मुधोळमधील बेरडांनी उठाव केला.बेरडांना सार्वजनिक
ठिकणी फाशी देण्याचे तंत्र इंग्रजांनी वापरले.


सुरगाणा संस्थान
मधील उठाव


सुरगाणा संस्थानचा
राजा नीळकंठराव भगवंतराव पवार यांनी भिल्ल व कोळी लोकांना हाताशी धरून उठाव घडवून
आणला. हा इंग्रजांनी उठाव मोडून काढला. व पेठच्या राजाला फाशी दिली.


खानदेशातील भिल्लाचा
उठाव


सातपुडा भागातील या
उठावाचे नेतृत्व काजीसिंग
, भागोजी नाईक, शंकरसिंह यांनी केले  या
मध्ये 
1500 पेक्षा
अधिक भिल्ल सहभागी झाले व सरकारी खजिना लुटला पण इंग्रजांनी उठाव मोडून काढला


औरंगाबादेतील उठाव


औरंगाबादेतील
घोडदळाच्या पलटणीत मुस्लिम बहसंख्य


मुघल बादशाहाविरुद्ध
उत्तरेकडे लढाईसाठी जाण्यास ब्रिटिश घोडदळातील मुस्लिम सैनिक नाखुन होते.त्यामुळे
उठाव केला.

नेतृत्व फिदाअली

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)