बंगाल हा मोगल
साम्राज्यातील एक सधन व मोठा प्रांत होता. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर विविध ठिकाणचे
सुभेदार स्वतंत्र झाले. बंगालचा वर्चस्व होते. १७५६ मध्ये त्यांच्या मृत्यू झाला.
त्यांनतर त्याचा मुलगा सिराज उद्दौला हा बंगालचा नबाब झाला. याच्याच कारकिर्दीतचत
बंगालमध्ये इंग्रजांनी साम्राज्याचा पाया रोवला.
बंगालमध्ये
इंग्रजांचा व्यापार बराच वाढला होता. मोगल बादशहाने कंपनीस करमुक्त व्यापाराचे
फर्मान दिले होते. पण या फर्मानाचा वापर कंपनीचे अधिकारी आपल्या खासगी
व्यापारासाठी करत व कर देत नसत. तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सिराज उद्दौला याची
परवानगी न घेता आपल्या वखारींची तटबंदी करण्यास सुरुवात केली होती.
वारंवार आदेश
देऊनही इंग्रजांनी तटबंदी करण्याचे थांबवले नाही. म्हणून सिराज उद्दौला याने
त्यांच्यावर स्वारी करुन त्यांच्या कासिमबाजार व कलकत्ता येथील वखारी आपल्या
ताब्यात घेतल्या. याच वेळी कलकत्ता येथे १४६ इंग्रजांना अंधार कोठडीत डांबण्यात
आले व एका रात्रीत त्यांच्यापैकी १२३ जण मुत्यू पावले. या घटनेचा सूड घेण्यासाठी
मद्रास येथील इंग्रजांनी वॅटसन व क्लाइव्ह या दोन अधिकार्यांच्या हाताखाली आरमारी
सैन्य बंगालमध्ये पाठवले. त्यांनी कलकत्ता सहज जिंकून घेतले.
प्लासीचे
युध्द (२३ जून १७५७) :
रॉर्बट क्लाईव्हने
सिराज उद्दौलाचा सेनापती मीर जाफर यास आपल्या बाजूला वळवून घेतले व त्यास
बंगालच्या नबाब पदी बसवण्याचे आश्र्वासन दिले. मार्च १७५७ मध्ये इंग्रजांनी
चंद्रनगर आपल्या ताब्यात घेतले. त्यामुळे फ्रेंच व नबाब यांच्यातील कारस्थानांची
भीती नाहीशी झाली. क्लाईव्हने सिराज उद्दौला याच्याविरुध्द एक कटकारस्थान रचले, त्यात मीर जाफर, रायदुर्लक्ष व जगत शेठ यास येऊन
मिळाले. सिराजच्या धोरणात मुळीच निश्चितता नव्हती इंग्रजांचा रोष ओढावून देखील
त्याने फ्रेंचांना आपल्या राज्यात आश्रय दिला व अगदी अखेरीस त्याने त्यांना बाहेर
काढण्यास मान्यता दिली. या फ्रेंचांनी सिराजला क्लाईव्हच्या कारस्थानाची कल्पना
दिली. वास्तविक हा कट आता सर्वानाच माहिती झाला होता. एकटया सिराजला तो माहीत
नव्हता कारण सिराज आपल्या मंत्र्यावर अवलंबून होता. त्याने लढाईची तयारी केली व
मीर जाफरला सैन्याचे सेनापती केले. सर्व कारस्थान झाल्यावर क्लाईव्हने काहीतरी
आरोप करायचा म्हणून सिराजवर तहाचा भंग केल्याचा आरोप केला. लवकरच प्लासीच्या
रणमैदानावर सिराज उद्दौलाचे लष्कर व इंग्रज यांची गाठ पडली. युध्दाला सुरुवात
होताच सेनापती मीर जाफर प्रथम तटस्थ राहिला व नंतर इंग्रजांना जाऊन मिळाला. सिराज
उद्दौलाचा पुर्ण पराभव होऊन तो पळून गेला. (२३ जून १७५७) पुढे मीर जाफरचा पुत्र
मिराज याने त्याला पकडुन ठार केले. प्लासीच्या विजयानंतर इंग्रजानी मीर जाफरला
बंगालचा नबाब म्हणून जाहीर केले.
सिराज उद्दौला याला
वठणीवर आणण्यासाठी इंग्रजांनी त्याच्या असंतुष्ट अधिकाऱ्यांना फोडण्याचा प्रयत्न
सुरू केला. मीर जाफर या त्याच्या प्रमुख सरदाराला नवाबपदाचे आमिष दाखवून त्यांनी
आपल्याकडे वळवून घेतले.
इंग्रज आपल्याविरुध्द
कारवाया करत आहेत, याची कल्पना नवाबाला आली. तेव्हा
मोठया सैन्यानिशी तो इंग्रजांवर चालून गेला. २३ जून, १७५७
रोजी प्लासी येथे लढाईला तोंड लागले. मीर जाफरच्या नेतृत्वाखालील नवाबाचे लष्कर
युद्धात उतरलेच नाही. मीर जाफरने विश्वासघात केल्याचे नवाबाच्या ध्यानात आले.
तेव्हा नाइलाजाने त्याला माघार घ्यावी लागली. शस्त्रबळाचा वापर न करता इंग्रजांनी
फितुरीने प्लासीची लढाई जिंकली.
प्लासीच्या
युध्दाचे महत्व :
(१) प्लासीचे
युध्द हे इंग्रजांच्या दृष्टीने भारतातील विजयाचे पहिले प्रतीक ठरले. या युध्दाने
इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला.
(२) या युध्दांत
इंग्रजांच्या शौर्याने त्यांना विजय मिळाला नसून क्लाईव्हच्या कारस्थानामुळे
इंग्रजांना विजय मिळाला.
(३) अॅडमिरल
वॅटसनच्या मते प्लासीचा विजय हा केवळ कंपनीलाच नव्हे, तर सर्व ब्रिटिश राष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा होता.
(४) ईस्ट इंडिया
कंपनीने उघडपणे एतद्देशीय सत्ताधीशांशी समना केल्याचा प्लासी हा पहिलाच प्रसंग
होता. (५) प्लासीच्या युध्दाने जरी भारत हातात आला नसला तरी तो हातात आणण्याची
गुरुकिल्ली इंग्रजांना मिळाली.
बक्सारची
लढाई (२२ ऑक्टोबर १७६४) :
मीर जाफर हा बंगालचा
नबाब झाला, पण तो राज्य करण्यास लायक नव्हता तो
क्लाईव्हच्या हातातील बाहुले होता. कंपनीच्या नोकरांना बरीच बक्षिसे दिल्यामुळे
त्याचा खजिना रिकामा झाला होता. सैनिकांचे पगार देणे अशक्य होऊ लागले. अशा
परिस्थितीत अधिक द्रव्यालोभाने प्रेरित होऊन इंग्रजांनी मीर कासीम यास १७६० मध्ये
बंगालचा नबाब म्हणून जाहीर केले. पण मीर कासीम हा मोठा कर्तबगार सुभेदार निघाला.
त्याने बंडखोर जमीनदारांना वठणीवर आणून कारभाराची घडी बसवण्याचा प्रयत्न सुरु
केला. इंग्रजाचे देणे त्याने देऊन टाकले. एवढेचे नव्हे तर इंग्रज अधिकाऱ्यांच्या
चोरटया व्यापारास आक्षेप घेतला मीर कासीम हा स्वतंत्र प्रवृत्तीचा होता ही गोष्ट
इंग्रजांना आवडली नाही म्हणून इंग्रजांनी पुन्हा मीर जाफर यास बंगालचा नबाब म्हणून
जाहीर केले. त्यामुळे मीर कासीम शुजाउद्दौला या अयोध्येच्या नबाबाकडे मदतीसाठी
गेला. मोगल बादशहा शहा आलम, शुजाउद्दौला व मीर कासीम या
तिघांनी मिळून इंग्रजांशी युध्द करण्याचे ठरवले. त्यानुसार या तिन्ही सत्ताधीशांच्या
फौजा एकत्र आल्या मेजन मन्रो या सेनानीच्या नेतृत्वाखाली इंग्रज सैन्याने या
सयुक्त सैन्याशी बक्सार येथे घनघोर युध्द केले. त्यात इंग्रजांनी प्रयत्नांची शर्त
करुन या संयुक्त सैन्याचा पराभव केला
इंग्रजांच्या
पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब बनला. इंग्रजांनी त्याच्याकडून अमाप पैसा
उकळला. व्यापारी सवलती मिळवल्या. शेतकऱ्यांची लूट केली. कारागिरांचे शोषण केले.
मीर जाफरने काहीसा विरोध करताना इंग्रजांनी त्याची उचलबांगडी केली आणि त्याचा जावई
मीर कासीम याला नवाब बनवले. इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला मीर कासीमने आळा
घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला पदच्युत करून इंग्रजांनी मीर जाफरला पुन्हा
नवाबपद दिले.
मीर कासीम अवधच्या
नवाबाच्या आश्रयाला गेला. बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी
अवधचा नवाब शुज उद्दोला, मीर कासीम व मुघल बादशाह
शाहआलम यांनी एकत्र मोहिम काढली. २२ ऑक्टोबर, १७६४ रोजी
बिहारमधील बक्सार येथे युद्ध झाले. त्यात इंग्रजांना विजय मिळाला. हा विजय
ऐतिहासिक महत्वाचा ठरला. पराभूत मुघल बादशाह व अवधचा नवाब यांच्याशी सन १७६५ मध्ये
इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने रॉर्बट क्लाईव्हने तह केला. हा तह अलाहाबादचा
तह म्हणून प्रसिध्द आहे. या तहान्वये बंगालच्या सुभाषांतरांवरूनयात महसूल गोळा
करण्याचा अधिकार इंग्रजांनी मिळवला. याला दिवाणी अधिकार असे म्हणतात.
बंगाल
सुभाषांतरांवरूनयाच्या दिवाणी अधिकाराप्रमाणे इंग्रजांनी बंगालच्या नवाबकडून
फौजदारी अधिकारीही मिळवले. यामुळे इंग्रज हे बंगालचे प्रत्यक्ष शासक बनले. नवाब
केवळ नामधारी शासक राहिला. इंग्लिश व्यापारी कंपनी राजकीय सत्ताधारी बनली.
भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया अशा प्रकारे बंगालमध्ये घातला गेला.
यानंतर इंग्रजांनी
आपली नजर दक्षिणेकडे वळविली. दक्षिण भारतात त्या वेळी मराठे, निजाम आणि हैदरअली अशा तीन प्रमुख सल्तनत होत्या. या तीन सल्तनत
आपल्याविरुध्द एकत्र आल्या तर आपला निभाव लागणार नाही हे इंग्रज जाणून होते. हे
संकट उभे राहू नये, म्हणून इंग्रजांनी भेदनीती वापरली.
हैदरअली व मराठे यांच्याविरुध्द निजामाला त्यांनी मदत देऊ केली, तसेच त्याला प्रादेशिक लाभाचे आमिष दाखवले. यामुळे निजामाने कधीच
इंग्रजांविरुध्द संघर्ष केला नाही.
बक्सारच्या लढाईचे
महत्व :
(१)
बक्सारच्या युध्दातील विजयामुळे पूर्व भारतात इंग्रजांची सल्तनत कायम झाली.
(२) प्लासीने अर्धवट
केलेले काम बक्सारने पूर्ण केले.
(३) अयोध्येचा वजीर व
स्वत: बादशहा कंपनीच्या हातात आला
(४) मीर जाफर पुन्हा
बंगालचा नबाब झाला.
(५) बंगालच्या
गोंधळात कंपनीच्या कारभाराने अधिक भर घातली.
(६) युरोपियन सेना
उत्कृष्ट असल्याचे इंग्रजानी सिध्द केले. में १७६५ मध्ये क्लाईव्ह दुसऱ्यांदा
बंगालचा गव्हर्नर म्हणून आला.
त्याने आपल्याबरोबर
बादशहा शहा आलम व अयोध्येचा नबाब शुजाउद्दौला यांच्याशी १६ ऑगस्ट १७६५ रोजी
अलाहाबादचा तह करुन त्यांना आपल्या वर्चस्वाखाली आणले या प्रसंगी बादशहाने
इंग्रजांना बंगाल, बिहार व ओरिसा प्रांताची
दिवाणी दिली, प्लासीच्या युध्दानंतर बंगालच्या नबाबकडून
इंग्रजांना बंगालची निझामत (लष्करी हक्क) मिळाली. व आता दिवाणी अधिकार पण मिळाले.
त्यामूळे इंग्रज बंगालचे खरे मालक बनले. नबाबाची सल्तनत केवळ नावापुरतीच शिल्लक
राहिली. यातुनच बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण झाली.