चिखलदरा

MPSC TECH
0




चिखलदरा :





अमरावती
जिल्ह्याच्या सातपुडा पर्वतक्षेत्रांतर्गत मेळघाट तालुक्यातील प्रसिद्ध थंड हवेचे
ठिकाण
, समुद्रसपाटीपासून उंची १,११५
मी. लोकसंख्या २
,४८६ (१९७१).





हे
अचलपूरच्या आणि अमरावतीच्या वायव्येस अनुक्रमे २६ किमी. व १०० किमी. असून
त्यांच्याशी उत्तम सडकांनी जोडलेले आहे.










नयनरम्य
वनश्रीने नटलेल्या या ठिकाणाचा शोध १८२३ साली लागला असला
, तरी त्याचा विकास महाराष्ट्र शासनाने हे गिरिविहारस्थान बनविल्यापासूनच
झाला.





प्रवाशांसाठी
येथे अनेक पॉइंट व बगीचे निर्माण करण्यात आले असून अनेक सोई केल्या आहेत.





परिसरातील
जंगल उत्पादनासाठी ही बाजारपेठ असून येथे कॉफी संशोधन केंद्र आहे.





येथून २
किमी. वर गाविलगडचा इतिहासप्रसिद्ध किल्ला असून चिखलदऱ्याच्या पश्चिमेस सु. ९
किमी. वर बैराट (१
,१७७ मी.) हे सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे.






Tags:

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)