३ री पंचवार्षिक योजना

MPSC TECH
0




                                                       ३
री पंचवार्षिक योजना
Image result for panchwarshik yojana


कालावधी:
इ.स. १९६१ - इ.स. १९६६


प्राधान्य : कृषी व
मुलभुत उद्योग (१९६२ च्या चीन युद्धानंतर
'संरक्षण आणि
विकास
' याला प्राधान्य देण्यात आले) खर्च : प्रस्तावित खर्च-
७५०० कोटी रु.
, वास्तविक खर्च- ८५७७ कोटी रु.


प्रकल्प
:
१. Intensive Agriculture Area programme-1964-65 २. दांतवाला यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मुल्य आयोगाची स्थापना ३
वर्षांसाठी करण्यात आली.


(१९८५ मध्ये त्याचे नाव बदलून Commission for
Agricultural Costs and Prices करण्यात आले आणि त्याला कायमस्वरूपी
दर्जा देण्यात आला) ३.
Food Corporation of India (१९६५) ४.
१९६४ मध्ये
IDBI UTI ची स्थापना
करण्यात आली.


महत्वपूर्ण
घटना
: १. १९६२ चे चीन युद्ध. २. १९६५ चे पाकीस्थान
युद्ध. ३. १९६५-६६ चा भीषण दुष्काळ.


मूल्यमापन
-
तिसरी योजना हि पूर्णपणे अपयशी ठरली. अन्न धान्याचे
उत्पादन ८२ दशलक्ष टनावरून ७२ दशलक्ष टनापर्यंत कमी झाले. भारतीय अर्थव्यवस्था
दिवाळखोर बनली मदतीसाठी
IMF कडे जावे लागले. १९६६ मध्ये
रुपयाचे ३६.५ टक्क्यांनी अवमूल्यन घडवण्यात आले.


तीन
वार्षिक योजना


कालावधी:
इ.स. १९६६ - इ.स. १९६९


तिसऱ्या योजनेच्या
अपयशामुळे व निर्माण झालेल्या आर्थिक अस्थैर्यामुळे सरकारला चौथी योजना सुरू करता
आली नाही. हि सुटी १ एप्रिल
,१९६६ ते ३१ मार्च,
१९६९ दरम्यान राहिली.


या सुट्टीच्या
कालावधीत सरकारने तीन वार्षिक योजना राबवल्या ज्यांचे उद्दिष्ट स्वावलंबन हे होते.


१)
पहिली वार्षिक योजना (१९६६-६७) १९६६
च्या खरीप हंगामात
सरकारने हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा वापर केला. ६ जून १९६६ मध्ये रुपयाचे ३६.५
टक्क्यांनी अवमूल्यन घडवण्यात आले.


२)
दुसरी वार्षिक योजना (१९६७-६८)
हरित क्रांतीच्या
तंत्रज्ञानामुळे व पुरेशा मान्सूनमुळे अर्थव्यवस्थेची परिस्थिती सुधारण्यास सुरवात
झाली. १९६७-६८ मध्ये अन्नधान्यांचे उच्चांकी उत्पादन झाले.





३)
तिसरी वार्षिक योजना (१९६८-६९)
अन्नधान्य उत्पादन व किमती
स्थिरावल्या. व्यवहारतोल सुधारला व चौथी योजना सुरु करण्यास अनुकूल परिस्थिती
निर्माण झाली.





style="display:block"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="4356803321"
data-ad-format="auto"
data-full-width-responsive="true">

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)