लाळ ग्रंथि
स्त्रवण नियंत्रण व प्रमाण
पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांत
मुखगुहेत (तोंडाच्या पोकळीत) लाळेचे स्त्रवण करणाऱ्या ग्रंथींना लाला ग्रंथी
म्हणतात.
जीभ, तालू, व गाल
यांतील अनेक लहान लहान लाला ग्रंथींखेरीज मानवात प्रमुख लाला ग्रंथींच्या तीन
जोड्या असतात आणि सुविकसित वाहिन्यांद्वारे त्या मुखगुहेत उघडतात.
या प्रमुख ग्रंथींना त्यांच्या स्थानावरून पुढील
नावे दिली गेली आहेत : (१) अनुकर्ण ग्रंथी, (२) अधोहनु ग्रंथी आणि (३)
अधोजिव्हा ग्रंथी. लाल ग्रंथी प्राधान्याने लसी द्रव, श्लेष्मल
द्रव किंवा दोन्ही प्रकारच्या द्रवांचे मिश्रण स्त्रवणारी असते.
श्लेष्मल
द्रव दाट, स्वच्छ,
काहीसा चिकट व बुळबुळीत असतो. लसी द्रव स्त्राव अधिक द्रवरूप (पातळ)
व स्वच्छ असतो.
ग्रंथीमध्ये असलेल्या कोशिकांच्या (पेशींच्या)
प्रकारानुसार या ग्रंथी दोहोंपैकी एकच किंवा मिश्र स्वरूपाचा द्रव स्त्रवतात